शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
4
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
5
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
6
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
7
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
8
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
9
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
10
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
11
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
12
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
13
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
14
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
15
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
16
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
17
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
18
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
19
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
20
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो

साहित्य सहवास

By admin | Updated: January 24, 2016 00:58 IST

विंदा करंदीकर, य.दि. फडके, गंगाधर गाडगीळ, व.पु. काळे, अनंत काणेकर, नारायण आठवले, रमेश तेंडुलकर, शांता शेळके, गिरिजा कीर, सत्यजीत दुबे, रा.वि. जोशी अशा एक ना अनेक असामींनी

(विशेष) - स्नेहा मोरेविंदा करंदीकर, य.दि. फडके, गंगाधर गाडगीळ, व.पु. काळे, अनंत काणेकर, नारायण आठवले, रमेश तेंडुलकर, शांता शेळके, गिरिजा कीर, सत्यजीत दुबे, रा.वि. जोशी अशा एक ना अनेक असामींनी वांद्रे पूर्व येथील ‘साहित्य सहवास’ फुलले. फुलराणी, झपुर्झा, आनंदवन, शाकुंतल, अभंग अशा वेगवेगळ्या इमारतींचे गोफ ‘साहित्य सहवास’च्या वसाहतीने गुंफले. खाडीच्या दलदलीची पडीक जागा ते मुंबईच्या भाऊगर्दीत सांस्कृतिक-साहित्य क्षेत्राचे पावित्र्य जपणारी ‘साहित्य सहवास’ वसाहत अशी ओळख निर्माण केली. याच साहित्य सहवासाच्या पन्नाशीनिमित्त या काही मान्यवरांनी जागविलेल्या आठवणींचा धांडोळा.....आणि ‘साहित्य सहवास’चा जन्म झाला!आचार्य अत्रे आणि तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची घनिष्ठ मैत्री होती. एके दिवशी अनंत काणेकर यांच्यासोबत आचार्य अत्रे सचिवालयात गेले होते. त्या वेळी अनौपचारिक गप्पा सुरू असताना मुख्यमंत्र्यांना अत्रे म्हणाले, ‘आम्ही लेखक मंडळी श्रीमंत आहोत असं वाटलं की काय? आम्हाला जागा दिली नाहीत, कलाकारांना मात्र दिली.’ त्यावर लगेच यशवंतराव चव्हाण म्हणाले की, ‘तुम्ही मागितली कुठे? त्यांनी मागितली म्हणून त्यांना दिली.’ तेव्हा अत्रे-काणेकरांनी तिथलाच एक कागद घेतला आणि वर ‘साहित्य सहवास’ हे नाव लिहून विंदा करंदीकर, वसंत बापट, मंगेश पाडगावकर, रा.भी. जोशी, गंगाधर गाडगीळ अशी सुचतील तशी १०-१२ नावे लिहून तो अर्ज मुख्यमंत्र्यांच्या हातात दिला. तेथेच ‘साहित्य सहवास’ची स्थापना झाली. संस्थापक आचार्य अत्रे आणि प्रमोटर म्हणून अनंत काणेकरांच्या सह्या झाल्या.‘साहित्य सहवासा’च्या अस्तित्वाला शुभेच्छा १९६८ साली माझे पती मंगेश राजाध्यक्ष यांच्यासोबत साहित्य सहवासात राहायला आलो. आम्ही राहायला आलो त्या वेळी काही साहित्य क्षेत्रातली मंडळी येथे राहत होती. त्यामुळे कधीही परकेपणाची भावना आली नाही. सगळ्यांशी स्नेह जुळला; आणि तो आजवर कायम आहे. ‘साहित्य सहवासा’चे वातावरण एक माणूस म्हणून आणि साहित्यिक म्हणून कायमच समृद्ध करणारे ठरले. येथे साहित्यासोबतच संगीत, नाट्य, नृत्य या क्षेत्रांतील बारकावे जाणून घ्यायची संधी मिळाली. लेखनासाठीही परिपूर्ण वातावरण मिळाले आणि आज साहित्य सहवासाच्या पन्नाशीचे औचित्य साधून हे सांगण्यास अभिमान वाटतो की, माझ्या लिखाणाच्या प्रवासात कायमच ‘साहित्य सहवासा’ने सोबत दिली. पूर्वी विंदा करंदीकरांच्या घरी गप्पा रंगत असत. त्या वेळी विंदा यांच्याघरच्या गप्पा रंगल्या आहेत हे कळताच त्यांच्याकडची साहित्यप्रेमींची गर्दी वाढतच जायची. मात्र अशा प्रसंगीही, विंदांच्या पत्नी सुमाताई आवर्जून सर्वांचा पाहुणचार करीत असत. शिवाय, सुमाताई स्वत:च्या हातचा चहा दिल्याशिवाय कोणालाच सोडत नसत. विंदांच्या घरी येणाऱ्या प्रत्येकाचेच सुमातार्इंशी वेगळेच स्नेहाचे नाते जडले होते. आज मागे वळून पाहताना गेली अनेक वर्षे साथसोबत दिलेल्या ‘साहित्य सहवासा’च्या अस्तित्वाला मनोमन शुभेच्छा द्याव्याशा वाटतात.- विजया राजाध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिका‘साहित्य सहवासा’च्या अस्तित्वाला शुभेच्छा १९६८ साली माझे पती मंगेश राजाध्यक्ष यांच्यासोबत साहित्य सहवासात राहायला आलो. आम्ही राहायला आलो त्या वेळी काही साहित्य क्षेत्रातली मंडळी येथे राहत होती. त्यामुळे कधीही परकेपणाची भावना आली नाही. सगळ्यांशी स्नेह जुळला; आणि तो आजवर कायम आहे. ‘साहित्य सहवासा’चे वातावरण एक माणूस म्हणून आणि साहित्यिक म्हणून कायमच समृद्ध करणारे ठरले. येथे साहित्यासोबतच संगीत, नाट्य, नृत्य या क्षेत्रांतील बारकावे जाणून घ्यायची संधी मिळाली. लेखनासाठीही परिपूर्ण वातावरण मिळाले आणि आज साहित्य सहवासाच्या पन्नाशीचे औचित्य साधून हे सांगण्यास अभिमान वाटतो की, माझ्या लिखाणाच्या प्रवासात कायमच ‘साहित्य सहवासा’ने सोबत दिली. पूर्वी विंदा करंदीकरांच्या घरी गप्पा रंगत असत. त्या वेळी विंदा यांच्याघरच्या गप्पा रंगल्या आहेत हे कळताच त्यांच्याकडची साहित्यप्रेमींची गर्दी वाढतच जायची. मात्र अशा प्रसंगीही, विंदांच्या पत्नी सुमाताई आवर्जून सर्वांचा पाहुणचार करीत असत. शिवाय, सुमाताई स्वत:च्या हातचा चहा दिल्याशिवाय कोणालाच सोडत नसत. विंदांच्या घरी येणाऱ्या प्रत्येकाचेच सुमातार्इंशी वेगळेच स्नेहाचे नाते जडले होते. आज मागे वळून पाहताना गेली अनेक वर्षे साथसोबत दिलेल्या ‘साहित्य सहवासा’च्या अस्तित्वाला मनोमन शुभेच्छा द्याव्याशा वाटतात.- विजया राजाध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिका‘साहित्य सहवासा’चे बांधकाम सुरू झाले, तेव्हापासून माझे या मातीशी नाते जुळले आहे. याच्या बांधणीसाठी खडीकाम, सुतारकामपासून ते मातीकाम अशी सर्व कामे माझ्या आई-बाबांनी केली. इथल्या प्रत्येक भिंतीशी आणि दगडाशी माझे वेगळे ऋणानुबंध आहेत. ‘साहित्य सहवास’ पूर्ण झाल्यानंतर बाबांनी वॉचमनचे तर आईने धुणीभांडीचे काम इथे केले. इथल्या संस्कारांवरून प्रेरणा घेत आम्हाला शिक्षणाला प्रोत्साहन दिले. गेली अनेक वर्षे ही सर्व मंडळी आमच्या पाठीशी आहेत. ‘साहित्य सहवासा’च्या पन्नाशीत येथील मान्यवरांची दुसरी पिढी त्यांचा वारसा जपतेय, याचेही समाधान आहे. साहित्य सहवासात मला गेल्या काही वर्षांपूर्वी ध्वजारोहणाचा सन्मान देण्यात आला होता, ही गोष्ट माझ्यासाठी अविस्मरणीय ठरली. - सिद्धार्थ पारधे, ‘कॉलनी’कार, साहित्यिक ‘साहित्य सहवासा’च्या अस्तित्वाला शुभेच्छा १९६८ साली माझे पती मंगेश राजाध्यक्ष यांच्यासोबत साहित्य सहवासात राहायला आलो. आम्ही राहायला आलो त्या वेळी काही साहित्य क्षेत्रातली मंडळी येथे राहत होती. त्यामुळे कधीही परकेपणाची भावना आली नाही. सगळ्यांशी स्नेह जुळला; आणि तो आजवर कायम आहे. ‘साहित्य सहवासा’चे वातावरण एक माणूस म्हणून आणि साहित्यिक म्हणून कायमच समृद्ध करणारे ठरले. येथे साहित्यासोबतच संगीत, नाट्य, नृत्य या क्षेत्रांतील बारकावे जाणून घ्यायची संधी मिळाली. लेखनासाठीही परिपूर्ण वातावरण मिळाले आणि आज साहित्य सहवासाच्या पन्नाशीचे औचित्य साधून हे सांगण्यास अभिमान वाटतो की, माझ्या लिखाणाच्या प्रवासात कायमच ‘साहित्य सहवासा’ने सोबत दिली. पूर्वी विंदा करंदीकरांच्या घरी गप्पा रंगत असत. त्या वेळी विंदा यांच्याघरच्या गप्पा रंगल्या आहेत हे कळताच त्यांच्याकडची साहित्यप्रेमींची गर्दी वाढतच जायची. मात्र अशा प्रसंगीही, विंदांच्या पत्नी सुमाताई आवर्जून सर्वांचा पाहुणचार करीत असत. शिवाय, सुमाताई स्वत:च्या हातचा चहा दिल्याशिवाय कोणालाच सोडत नसत. विंदांच्या घरी येणाऱ्या प्रत्येकाचेच सुमातार्इंशी वेगळेच स्नेहाचे नाते जडले होते. आज मागे वळून पाहताना गेली अनेक वर्षे साथसोबत दिलेल्या ‘साहित्य सहवासा’च्या अस्तित्वाला मनोमन शुभेच्छा द्याव्याशा वाटतात.- विजया राजाध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिका

‘साहित्य सहवासा’चे बांधकाम सुरू झाले, तेव्हापासून माझे या मातीशी नाते जुळले आहे. याच्या बांधणीसाठी खडीकाम, सुतारकामपासून ते मातीकाम अशी सर्व कामे माझ्या आई-बाबांनी केली. इथल्या प्रत्येक भिंतीशी आणि दगडाशी माझे वेगळे ऋणानुबंध आहेत. ‘साहित्य सहवास’ पूर्ण झाल्यानंतर बाबांनी वॉचमनचे तर आईने धुणीभांडीचे काम इथे केले. इथल्या संस्कारांवरून प्रेरणा घेत आम्हाला शिक्षणाला प्रोत्साहन दिले. गेली अनेक वर्षे ही सर्व मंडळी आमच्या पाठीशी आहेत. ‘साहित्य सहवासा’च्या पन्नाशीत येथील मान्यवरांची दुसरी पिढी त्यांचा वारसा जपतेय, याचेही समाधान आहे. साहित्य सहवासात मला गेल्या काही वर्षांपूर्वी ध्वजारोहणाचा सन्मान देण्यात आला होता, ही गोष्ट माझ्यासाठी अविस्मरणीय ठरली. - सिद्धार्थ पारधे, ‘कॉलनी’कार, साहित्यिक

‘साहित्य सहवास’ या सोसायटीने पन्नाशीचा टप्पा गाठला याचा आनंद आहेच, पण ही आमच्यासाठी कधीच सोसायटी नव्हती. हा आमचा परिवार आहे, या परिवाराच्या सोबतीनेच आयुष्याचा रहाटगाडा सुरू आहे. ‘साहित्य सहवासा’च्या आठवणी इतक्या आहेत की, नुसते नाव उच्चारले तरी फ्लॅशबॅक डोळ्यांसमोरून झर्रकन जातो. गंगाधर गाडगीळांसोबत त्या काळात प्रेमविवाह झाला; आणि मग त्यांच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी खांद्याला खांदा देऊन जशी मी त्यांची साथ दिली; त्याचप्रमाणे, ‘साहित्य सहवास’ही आमच्यासाठी खंबीरपणे उभे राहिले. आता इथले जुने सदस्य फार कमी आहेत. सध्या ‘साहित्य सहवासा’ची धुरा नवी पिढी सांभाळत आहे, मात्र त्यांचा उत्साह आजही आमच्या तरुणपणाची आठवण देतो. येथे आम्हीच पहिल्यांदा पुढाकार घेऊन झेंडावंदन, आनंदमेळा आणि क्रीडा यांसारखे कार्यक्रम आयोजिले होते. तेव्हापासून साहित्य सहवासातील सर्व ‘व्यक्ती-वल्ली’ एकत्र येण्यास आरंभ झाला, आणि आजतागायत ही परंपरा सुरू आहे.- वासंती गाडगीळ, ज्येष्ठ साहित्यिक गंगाधर गाडगीळ यांच्या पत्नी४५ वर्षांचे ऋणानुबंधगेली ४५ वर्षे ‘साहित्य सहवास’मध्ये राहतोय. अहमदनगर येथील महाविद्यालयात इंग्रजीचा प्राध्यापक म्हणून कार्यरत होतो. पण अभिनय क्षेत्रात करिअर करायचे म्हणून राजीनामा देऊन मुंबई गाठली. अभिनयात स्ट्रगल सुरू असताना मी आणि मोहन गोखलेंनी एकत्र राहायचे ठरवले. त्यासाठी विलेपार्ले येथे जागा बघून पैसेही दिले. मात्र मला ती जागा फारशी आवडली नव्हती. त्याच दरम्यान ‘साहित्य सहवास’विषयी कानावर पडले. अधिक चौकशी सुरू केली आणि मग एकेदिवशी मोहन येथे घेऊन आले. पाहताच क्षणी इथल्या शांततामय वातावरणाने आणि निसर्गाच्या कुशीने भुरळ घातली. मग काहीही करून सहवासात राहायला यायचे असे म्हणून विलेपार्ले येथील जागेच्या मालकाची कशीबशी समजूत घालून पैसे परत घेतले; आणि येथे घर घेतले. त्यानंतर साहित्य सहवासाने धरलेला हात कधीच सोडला नाही. विशेष म्हणजे, अनेकदा दौरे, शूटिंग अशा व्यस्त दिनक्रमात अडकलेलो असताना माझ्या कुटुंबीयांना साहित्य सहवासाच्या परिवाराने एकटेपण जाणवू दिले नाही. ४५ वर्षांत येथे माणूस म्हणून माझी वेगळी जडणघडणही झाली. - प्रा. मधुकर तोरडमल, ज्येष्ठ अभिनेतेअत्रेंना ‘सहवास’ लाभलाच नाही..!‘साहित्य सहवास’चे आचार्य अत्रे आणि अनंत काणेकर हे संस्थापक सदस्य होते. साहित्य सहवासमध्ये त्यांनी दोन घरे आपल्या कन्यांच्या नावे लिहून ठेवली. मात्र अत्रेंना ‘साहित्य सहवास’चा सहवास कधीच लाभला नाही. शिवाय, त्यांच्या कन्याही साहित्य सहवासात वास्तव्यास कधीच आल्या नाहीत. त्यानंतर यातील एक घर ज्येष्ठ अभिनेते मधुकर तोरडमल यांनी घेतले तर दुसरे घर ज्येष्ठ समीक्षक अशोक रानडे यांनी घेतले.