शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात हिंदू नेत्याची अपहरण करून निर्घृण हत्या, भारताने केला तीव्र निषेध
2
सावध व्हा,  आलाय नवीन स्कॅम! तुम्ही तीर्थयात्रेचे पॅकेज ऑनलाइन बुक केले आहे का?
3
लग्न झालं, वधूच्या डोक्यावरचा पदर उचलला, पाहतो तर काय, आत होती नवरीची विधवा आई, तरुणाची फसवणूक 
4
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? आम्हाला काहीच फरक पडणार नाही : शिंदेसेना
5
आजचे राशीभविष्य - २० एप्रिल २०२५, सर्व दृष्टींनी लाभदायी दिवस, सामाजिक क्षेत्रात सक्रीय राहाल
6
मालेगाव बॉम्बस्फोट खटला; निकाल लागणार ८ मे रोजी, अनेक अडथळे पार करत १७ वर्षांनंतर सुनावणी पूर्ण
7
जमीन मोजणी हरकतीवर आता केवळ दोनच अपील, मोजणी नकाशे अपलोड झाल्यानंतरच अंतिम निकाल
8
जेलमधून बाहेर येताच त्याने युवतीला पुन्हा पळवून नेले, तलवारी-रॉडने घरावर केला हल्ला
9
राजची साद अन् उद्धवचा प्रतिसाद; मराठीच्या धुरळ्यात ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची चर्चा
10
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण: हॉस्पिटलच्या व्यवहारातून बेदखल केल्याने होता तणाव
11
मित्राला वाचविताना दोन सख्ख्या भावांनी गमावला जीव; वेळास समुद्रकिनाऱ्यावर तिघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू
12
अवघ्या १७ दिवसांत ८३१ टन हापूस निर्यात; अमेरिकेला सर्वाधिक आंबा रवाना, युरोपाचीही पसंती
13
अवयवदात्याची स्वॅप रजिस्ट्री तयार करा, केंद्राच्या ‘नोटो’कडून सर्व राज्यांना सूचना
14
पावणेपाच लाखांचा घोटाळा; मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीत बनावट कागदपत्रे, रुग्णनोंदी आढळल्या
15
अँटालिया स्फोटके प्रकरण: पोलिस अधिकारी काझीच्या दोषमुक्ततेस कोर्टाचा नकार, गुन्हेगारी कटाचा आरोप
16
कॅनडात बस स्टॉपवर भारतीय तरुणीची गोळीबारात हत्या; हल्लेखोरांना दुसऱ्यावर चालवायची होती गोळी
17
"ऑफर देणारे, अटी ठेवणारेही तेच, त्यामुळे मी..."; राज-उद्धव एकत्र येण्यावर CM फडणवीसांनी व्यक्त केला आनंद
18
"जाऊ दे यार, कामाचं बोला"; राज-उद्धव एकत्र येण्याच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे चिडले
19
मला स्टार्क वैगेरे व्हायचं नाही; ऑस्ट्रेलियन स्टारशी तुलना केल्यावर आवेश खाननं असा दिला रिप्लाय
20
शेकापच्या संतोष पाटलांच्या दोन्ही मुलांचा वेळास बीचवर एकाच वेळी मृत्यू; बहिणीचा मुलगाही सुमद्रात बुडाला

भारतीय अवकाश संशोधनाचे जनक: डॉ. विक्रम साराभाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2019 04:21 IST

रशियाने त्यांचे स्फुटनिक यान अवकाशात सोडले होते, तेव्हा साराभाईंनी भारत सरकारला अवकाश संशोधनाचे महत्त्व पटवून दिले होते.

- जोसेफ तुस्कानो, ज्येष्ठ विज्ञानलेखकसध्या आपल्या भारत देशाचे चांद्रयान-२ चंद्राच्या दिशेने यशस्वीपणे झेपावत आहे. त्या आधी १५ फेब्रुवारी, २०१७ रोजी श्रीहरीकोटा तळावरून एकाच वेळी १०४ देशी-परदेशी उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केले. या घटनांनी भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रोने) आकाशाला गवसणीच घातली. इस्रोची स्थापना (१९६३) हा डॉ. विक्रम साराभाईच्या कारकिर्दीचा कळस होता. रशियाने त्यांचे स्फुटनिक यान अवकाशात सोडले होते, तेव्हा साराभाईंनी भारत सरकारला अवकाश संशोधनाचे महत्त्व पटवून दिले होते.

ते सांगत, विकसनशील देशाला अवकाश संशोधनासंबधी लष्कराच्या भाकऱ्या भाजण्याची गरज काय, असा सूर जगभर सर्वत्र निघतो आहे, पण आमचा हेतू पारदर्शक आहे. आम्हाला चंद्रस्वारी किंवा अन्य ग्रहावर याने पाठवून, तसेच मानवसहित याने पाठवून विकसित देशांशी आर्थिक स्पर्धा मुळीच करायची नाही. एक गोष्ट आम्हाला स्पष्टपणे जाणवते, ती म्हणजे मनुष्य आणि समाज विकसित करायचा असेल, तर आमचा देश अवकाश संशोधनात पिछाडीवर राहून चालणार नाही. आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरेपूर लाभ उठवून, आम्हाला आमच्या देशाचे प्रश्न सोडवायचे आहेत.
विक्रम साराभाई यांचा जन्म अहमदाबाद येथील एका सधन कुटुंबात १२ ऑगस्ट, १९१९ रोजी अंबालाल आणि सरलाबेन या दाम्पत्याच्या पोटी झाला होता. तो पारतंत्र्याचा काळ होता व स्वातंत्र्याची चळवळ जोम घेऊ लागली होती. विक्रमच्या कुटुंबाचे स्वातंत्र्य चळवळीशी संबंध होते, त्यामुळे रवींद्रनाथ टागोर, महात्मा गांधी, जे. कृष्णमूर्ती, व्ही. एस. श्रीनिवासशास्त्री, मोतीलाल व जवाहरलाल नेहरू, सरोजिनी नायडू, मौलाना आझाद, सी.एफ.अँड्रूज; या ज्येष्ठ-श्रेष्ठ मंडळीची त्यांच्या घरी ऊठबस होत असे. या थोर व्यक्तीच्या सहवासाचा नि विचारांचा तरुण विक्रमच्या व्यक्तिमत्त्वावर मोठा प्रभाव पडला. विक्रम यांचे प्रारंभीचे शिक्षण घरीच झाले. त्यांच्या मातोश्री सरलाबेन मोंटेसरी शिक्षण पद्धतीवर द रिट्रीट शाळा चालवत, तिथेच ते शिकले. त्यांचे पुढचे शिक्षण गुजरात कॉलेजमध्ये झाले. नंतर, ते इंग्लंडला गेले व केंब्रिज विद्यापीठातील सेंट जोन्स कॉलेजातून ते १९३९ साली रसायन आणि भौतिक या विषयातील ट्रायपास परीक्षा उतीर्ण झाले. तद्नंतर, १९४० साली,तेथील बी.ए. व त्याच्या दोन वर्षांनंतर एम. ए. पदव्या पदरात पाडून घेतल्या.
डॉ. होमी भाभा आणि डॉ. विक्रम सारभाईंनी आपल्या देशातले पहिले रॉकेट लौंचिंग केंद्र बांधण्यासाठी केरळातील तिरुअनंतपुरममधील थुंबागाव निवडले होते. त्या प्रदेशावरून विषुववृत जाते व अवकाशयाने सोडण्यास तीच जागा योग्य होती. शिवाय, तिरुअनंतपुरम विमानतळ पंधरा-वीस मिनिटांच्या अंतरावर होता. समुद्रकिनारा व रेल्वेलाइन्स यात पसरलेला थुंबाचा तो ६०० एकरचा पट्टा या कामी उपयोगी होता. थुंबा गावातील मेरी माग्दलेनच्या चर्चमध्ये अवकाश संशोधन करणारी प्रयोगशाळा थाटायची होती, पण त्या थुंबा गावात गरीब ख्रिस्ती कोळी लोकांची वस्ती होती. त्रिवेंद्रमचे बिशाप राइट रेव्हरंड डॉ.पीटर बर्नड परेरा त्यांचे मेंढपाळ (आध्यात्मिक नेते) होते. त्रिवेंद्रमचे कलेक्टर के. माधवन बिशाप परेरांना भेटले आणि त्यांच्याकडे थुंबागावाची मागणी केली. बिशाप परेरा आध्यात्मिक नेते होते, तरीही त्यांची वृत्ती विज्ञानवादी होती. त्यांनी आपल्या भाविकांना विश्वासात घेऊन त्या प्रकल्पाला मान्यता दिली व त्या शास्त्रज्ञाचा मार्ग सुकर झाला झाला होता. तेथूनच २१ नोव्हेंबर, १९६३ रोजी सोडियम बाष्प पेलोड तंत्र वापरून भारताचे पहिले रॉकेट यशस्वीरीत्या आकाशात रवाना झाले होते.
डॉ.विक्रम साराभाई यांनी देश-विकासासाठी विविध क्षेत्रांत केलेली कामगिरी अचंबित करणारी आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील नाना संस्थांच्या उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा होता. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, ऑपरेशन रिसर्च ग्रुप, तिरुअनंतपूरचे विक्रम साराभाई स्पेस सेंटर, अहमदाबादमधील त्यांच्या स्वत:च्या सहा संस्थांचे विलीनीकरण करून उभारलेले स्पेस अ‍ॅप्लिकेशन सेंटर, कल्पकम येथील फास्टर ब्रीडर टेस्ट रिएक्टर, कोलकोतातील व्हेरियबल एनर्जी सायक्लोट्रोन प्रोजेक्ट, हैद्राबादमधील इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, बिहारमधील जादूगुडा येथे उभारलेली युरेनियम कार्पोरेशन ऑफ इंडिया इ. संस्थाच्या निर्मितीत ते आघाडीवर होते. अशाप्रकारे त्यांनी सुरू केलेल्या भारतीय अवकाश संशोधन कार्यक्रमाला जागतिक कीर्ती लाभली. ३० डिसेंबर, १९७१ रोजी तिरुअनंतपुरम इथे ही महान विभूती झोपेत असताना वयाच्या अवघ्या ५२व्या वर्षी अनंतात विलीन झाली.

टॅग्स :isroइस्रो