शहरं
Join us  
Trending Stories
1
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
2
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
3
"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा
4
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत, थेट बेडरुमध्ये घुसून हेरगिरी? आरोपामुळे खळबळ
5
भररस्त्यात पाठलाग, कारची काच फोडली... महिला पत्रकारावर मध्यरात्री हल्ला! अखेर दोघांना अटक
6
'मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…’, आजारी संजय राऊत यांच्यासाठी सुषमा अंधारे यांची खास पोस्ट
7
सरदार पटेल यांना त्यांच्या 150व्या जयंतीनिमित्त शशी थरूर यांचं अभिवादन, महात्मा गांधींच्या नातवाच्या शब्दांत अर्पण केली श्रद्धांजली
8
Mumbai Hostage Case: ‘त्याने फटाके वाजवले आणि बाहेर गोळीबार सुरू असल्याचे सांगितले’; रोहित आर्या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी वृद्ध महिलेचा खुलासा
9
ट्रम्प यांनी अण्वस्त्र टेस्टिंगचा आदेश देताच रशियाची थेट प्रतिक्रिया, दिला अल्टीमेटम!
10
मित्रांचा आग्रह जीवावर बेतला, पार्टीत बॅक टू बॅक पाजले पेग; २६ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू
11
पवईतील आरोपी रोहित आर्यला दीपक केसरकरांनी इतकी मोठी रक्कम का दिली?; सामाजिक कार्यकर्त्यांचा सवाल
12
मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडली दोन सिल्वर गिबन; कस्टम अधिकारीही झाले अवाक्
13
वाघ अगदी जवळून पाहायचाय? मग, भारतातील 'या' ६ व्याघ्र प्रकल्पांना नक्की भेट द्या!
14
गोळीबार, आग आणि धमकीचं पत्र, फरार कैद्याने आणले पोलिसांच्या नाकी नऊ, नेमकं प्रकरण काय?
15
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी बुडाले; सर्वात जास्त कुठे?
16
Extra Marital Affairs:मुलाचं लग्न ठरलं आणि होणाऱ्या सूनेच्या बापावरच जडला महिलेचा जीव; लग्नाआधीच दोघे गेले पळून
17
Rain Alert: कमी दाबाचे क्षेत्र कायम, या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; महाराष्ट्रात कुठे-कुठे पाऊस पडणार?
18
शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमाफी करा; उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी
19
धोनीची गुंतवणूक असलेली कंपनी बाजारात! ६ नोव्हेंबरला उघडणार IPO; प्राइस बँडसह तपशील जाणून घ्या
20
खात्यात ८ लाख जमा केले अन् प्राप्तिकर विभागाची 'टॅक्स' नोटीस; ६ वर्षांच्या लढ्यानंतर करदात्याचा विजय!

अवयवदानाचा संकल्प करूया; गरजूंचे आयुष्य उजळूया!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2020 04:33 IST

- डॉ. दिलीप म्हैसेकर, कुलगुरू, आरोग्य विज्ञान विद्यापीठ शरीर निरोगी असेल, तर आयुष्य सुखदायक होते; परंतु काही कारणाने शरीराचा एखादा ...

- डॉ. दिलीप म्हैसेकर, कुलगुरू, आरोग्य विज्ञान विद्यापीठशरीर निरोगी असेल, तर आयुष्य सुखदायक होते; परंतु काही कारणाने शरीराचा एखादा अवयव बाधीत झाला, तर संबंधिताचे जगणे अवघड होते. एखाद्याची किडनी आजाराने नादुरुस्त झाल्यास त्याला सतत डायलीसीसवर अवलंबून राहावे लागते. त्याला दुसऱ्याची किडनी मिळाली, तर त्याचे आयुष्य पूर्णपणे बदलून जाते. आपल्या देशात अवयव प्रत्यारोपणाच्या गरजू रुग्णांची संख्या लाखांमध्ये आहे. कोणाला डोळ्यांची, तर कोणाला किडनी, यकृत, तसेच हृदयाची गरज आहे. मात्र, जनजागृतीअभावी अवयवदात्यांची संख्या तुलनेत खूपच कमी आहे. अपघाती वा नैसर्गिक मृत्यू होणाऱ्यांचे अवयव प्रत्यारोपणासाठी वापरात आले, तर एखाद्याची गरज भागू शकते.

आपल्याकडे मृत्यूनंतर विधीवत अंत्यसंस्कार करून पार्थिवाची विल्हेवाट लावली जाते. अंत्यसंस्कारानंतर मानवी शरीरातील जे अवयव गरजूंना पुनर्जन्म देऊ शकतात, असे लाखमोलाचे अवयव पंचतत्त्वात विलीन होतात. यासाठी रुग्णालयात होणाºया मृत्यूनंतर अवयवदानाचे प्रमाण वाढले, तर गरजू रुग्णांचे जीवन सुकर होऊन त्यांना नवसंजीवनी मिळू शकते. संपूर्ण भारतात अवयवदानाचे महत्त्व व तशी चळवळ उभी राहणे काळाची गरज आहे. भारतासारख्या अफाट लोकसंख्येच्या देशात अवयवदानाचे प्रमाण इतर देशांच्या तुलनेत सर्वांत कमी आहे. देशात अवयवदानाचे प्रमाण १० लाख लोकांमागे ०.०८ एवढेच आहे. इंग्लंडमध्ये हे प्रमाण १४.८, अमेरिकेत २६.३, तर स्पेनमध्ये जगात सर्वाधिक म्हणजे ३४.२ इतके आहे. हृदय प्रत्यारोपणाची गरज असलेल्या रुग्णांची संख्या भारतात ५०,००० असून, प्रत्यक्ष हृदय प्रत्यारोपणाचे प्रमाण फक्त १५ टक्केच आहे. ३०,००० यकृत प्रत्यारोपणाची गरज असताना १,५०० जणांना यकृत प्रत्यारोपण केले जाते. २,००,००० मूत्रपिंड प्रत्यारोपणाची गरज असताना प्रत्यक्ष प्रत्यारोपण ६,००० आहे, तर ३०,००,००० डोळे प्रत्यारोपणाची गरज असताना प्रत्यक्ष प्रत्यारोपण केवळ १,५०,००० इतके होत असल्याचे वरील आकडेवारीवरून दिसून येते.
मे २०१९ पर्यंत ५,२६८ मूत्रपिंड प्रत्यारोपणाची गरज होती, पैकी २३८ जणांनी जिवंतपणी, तर १११ व्यक्तींनी मृत्यूनंतर मूत्रपिंड दान केले. १,०५४ यकृत प्रत्यारोपणाची गरज असताना ५४ व्यक्तींनी जिवंतपणी, तर ६५ व्यक्तींनी मृत्यूनंतर यकृत दान केले. ५८ हृदय प्रत्यारोपणाची गरज असताना मृत्यूनंतर हृदय दान करणाºयांची संख्या १५ आहे. ५ स्वादुपिंड प्रत्यारोपणाची गरज असताना मृत्यूनंतर एकाने स्वादुपिंड फुप्फूस दान केले. अवयवदानाबाबतचा कायदा, त्याच्या तरतुदी व फायदे यांची फारशी माहिती जनमानसात नसल्याने देशात हे प्रमाण अत्यंत कमी आहे. अवयवदानासंबंधी गैरसमज व अज्ञान दूर करण्यासाठी पुरेसे प्रयत्न होणे गरजेचे आहे. बहुतांश साक्षर व सुशिक्षित वर्गातसुद्धा याबाबत जागरूकता दिसून येत नाही. एक मस्तिष्क स्तंभ मृत व्यक्ती अवयवदान करून ८ जिवंत व्यक्तींना जीवनदान करू शकते व २१ लोकांच्या जीवनात सुधारणा घडवून आणू शकते. यासाठी जनजागृतीची गरज आहे. मस्तिष्क स्तंभासाठी मृतांच्या नातेवाइकांचे समुपदेशन गरजेचे असते. समाजात विविध स्तरांतील लोकांच्या मनावर अवयवदानाचे महत्त्व बिंबविण्याची गरज आहे. त्यासाठी दूरचित्रवाणी, रेडिओ, वर्तमानपत्रे, शाळा, महाविद्यालये, शासकीय, अशासकीय रुग्णालये व शासकीय कार्यालये यांद्वारे जागृती करणे आवश्यक आहे. पूर्वी रक्तदानाबाबत जनता अनभिज्ञ होती; परंतु रक्तदान किती आवश्यक आहे, यासाठी सर्व स्तरावरून रक्तदान अभियान जनजागृती केल्यामुळे आज रक्ताचा पुरवठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत आहे.
महाराष्ट्रापुरता विचार केल्यास गत काही वर्षांपासून अवयवदानाची मोठ्या प्रमाणात जनजागृती झालेली दिसून येते. नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ तसेच शासकीय विभागांमार्फत अवयवदानसंदर्भात रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, प्रभात फेरी, मानवी साखळी, चर्चासत्रे, व्याख्याने, पथनाट्ये, यांसारख्या उपक्रमांच्या माध्यमांतून जनजागृती केली जात आहे, तसेच शासनाच्या माध्यमातून वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत सदर उपक्रम निरंतर सुरू आहे. अवयवदान जनजागृतीकरिता उपक्रम राबविलेत. याचा परिपाक म्हणून गत काही वर्षांत अवयव प्रत्यारोपणात महाराष्ट्राचा देशात अव्वल क्रमांक आहे. मानवी अवयवांची तस्करी व काळाबाजार थांबविण्यासाठी शासनाने मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा १९९४ संमत केला. त्यानव्ये मानवी अवयव प्रत्यारोणास कायदेशीर परवानगी दिली आहे. या कायद्यात आवश्यकतेनुसार सुधारणा करून मानवी अवयवांची तस्करी थांबविण्यासाठी कायदेशीर तरतुदींच्या अंतर्भाव केला आहे. या कायद्यात अवयवदान कोण करू शकतो, मस्तिष्क स्तंभ मृत मृत्यू कोण घोषित करू शकतो.कोणते रुग्णालय अवयव काढण्यासाठी आणि प्रत्यारोपणासाठी सक्षम आहेत. मान्यताप्राप्त रुग्णालयातील शासनमान्य डॉक्टर्स अवयव काढणे व प्रत्यारोपणाचे काम करू शकतात, अशा तरतुदी या कायद्यात आहेत. मस्तिष्क स्तंभ मृत मृत्यू घोषित करण्यापूर्वी शासनमान्य डॉक्टर्सची ४ सदस्यांची समिती संबंधित रुग्णाची ६-६ तासांच्या अंतराने तपासणी करून मस्तिष्क स्तंभ मृत मृत्यूबाबतचा अहवाल सादर करतात. अवयवदानाचा संकल्प करून देशात विज्ञानाच्या साथीने ही चळवळ यशस्वी करूया. गरजूंचे आयुष्य उजळूया...

टॅग्स :Organ donationअवयव दान