शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

Lesbians: आता समलैंगिक महिलाही बाळाला जन्म देणार !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2021 05:49 IST

Lesbians: ‘आई’ बनणं हे प्रत्येक महिलेचं स्वप्न असतं, मातृत्वाची ओढ तिला कायमच असते. पण हीच महिला जर एकटी असेल, तिनं लग्न केलेलं नसेल, तर तिचं हे स्वप्न पूर्ण होण्यात मात्र आजही अनेक अडचणी येतात. त्यातही ही महिला समलैंगिक (लेस्बियन) असेल, शिवाय ‘एकटी’ असेल, तर तिच्यासाठी मातृत्वाचं दिव्य महाकठीण.

‘आई’ बनणं हे प्रत्येक महिलेचं स्वप्न असतं, मातृत्वाची ओढ तिला कायमच असते. पण हीच महिला जर एकटी असेल, तिनं लग्न केलेलं नसेल, तर तिचं हे स्वप्न पूर्ण होण्यात मात्र आजही अनेक अडचणी येतात. अनेक पुढारलेल्या देशांतही महिलांना वा विषमतेचा सामना करावा लागतो. त्यातही ही महिला समलैंगिक (लेस्बियन) असेल, शिवाय ‘एकटी’ असेल, तर तिच्यासाठी मातृत्वाचं दिव्य महाकठीण. कारण अनेक देशांतील कायदा त्यासाठी मान्यताच देत नाही. समलैंगिक महिलांना काही देशांत मूल दत्तक घेण्याचा अधिकार आहे, पण स्वत:च मूल जन्माला घालण्याचा अधिकार मात्र त्यांना नाही. अर्थात या मानसिकतेत हळूहळू बदल होत आहे आणि याबाबतचे कायदे ‘जेंडर न्यूट्रल’ होताहेत. जगभरातील ‘एलजीबीटी’ समूहाला त्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागला. फ्रान्समधील या समूहाच्या मागणीला नुकतंच एक मोठं यश आलं आहे. फ्रान्स सरकारनं आता नवा कायदा लागू केला आहे. त्यानुसार समलैंगिक महिला आणि एकल महिलांनाही ‘आयव्हीएफ’ तंत्रज्ञानाच्या मदतीनं आई होता येईल. हा निर्णय झाला खरा, पण यासाठीचा संघर्ष सोपा नव्हता. खुद्द संसदेतही याबाबत दोन परस्परविरोधी मतं होती आणि एका गटाचा या कायद्याला कडवा विरोध होता. गेल्या दोन वर्षांपासून फ्रान्स संसदेत त्यावरून खडाजंगी सुरू होती. या कायद्याच्या मसुद्यात तब्बल १५०० पेक्षा जास्त दुरुस्त्याही करण्यात आल्या, पण अखेर  ३२६ विरुद्ध ११५ मतांनी हा कायदा आता संमत झाला आहे. ‘एलजीबीटी’ गटानं एक मोठी लढाई जिंकली असली, तरीही त्यांच्यापुढील अडचणींचा डोंगर मात्र अजूनही संपलेला नाही.मुळात फ्रान्समध्ये ‘स्पर्म डोनर्स’ आणि स्पर्म बँकांची संख्या अतिशय कमी आहे. शिवाय फ्रान्समध्ये कायद्यानुसार ‘स्पर्म’ आयात करायलाही परवानगी नाही. त्यामुळे मूल हवं असेल तर अनेक महिलांना परदेशात जावं लागतं. फ्रान्सच्या एकल महिला त्यासाठी मुख्यत्वे बेल्जिअम आणि स्पेनची वाट धरतात. पण त्यासाठीचा  प्रचंड खर्च सर्वसामान्यांना  परवडणं शक्य नाही. या कायद्याला विरोधकांनी प्रचंड विरोध केला, अनंत अडचणी आणल्या, तरीही २०२१च्या अखेरपर्यंत समलैंगिक महिलांनी ‘आयव्हीएफ’ तंत्राद्वारे आपल्या बाळाला जन्म दिलेला असेल, अशी आशा आरोग्यमंत्री ऑलिव्हर वेरन यांनी व्यक्त केली आहे.यासंदर्भात लॉरी या महिलेचं म्हणणं आहे, यापूर्वी दोन वेळा मी गर्भवती राहिले, पण दोन्ही वेळा मला माझं बाळ गमवावं लागलं. वैद्यकीय मदतीनंच मी आई होऊ शकेन, असं निसर्गानंच कदाचित ठरवलं असावं. मी आजारी असले, कोणी ‘जोडीदार’ मला मिळाला नाही, तरी मी आता आई होऊ शकते, हा आनंद फार मोठा आहे.दुसरी एक समलैंगिक महिला पत्रकार लुसी म्हणते, फ्रान्समध्ये विवाह समानतेला मान्यता मिळून अनेक वर्षे झाली असली, तरी ‘आयव्हीएफ समानतेसाठी’ तब्बल २०२१पर्यंत आम्हाला थांबावं लागलं. या समानतेसाठी इतका प्रदीर्घ काळ लागल्यानं हा विजय कडवट झाला असला, तरी यापुढे अनेक महिलांना त्याचा उपयोग होईल. नव्या कायद्यामुळे फ्रान्समधील समलैंगिक आणि एकल महिलांना मातृत्वासाठी आता ‘आयव्हीएफ’ तसेच इतरही तंत्रज्ञानाचा आधार घेता येईल. ४३ वर्षांच्या आतील महिलांना याचा लाभ घेता येईल आणि त्याच्या खर्चाचा सर्व भारही फ्रान्सच्या आरोग्य विभागाकडून उचलला जाईल. फर्टिलिटी क्लिनिक्ससाठी फ्रान्स सरकारनं मोठ्या रकमेची तरतूदही केली आहे. या कायद्यामुळे आणखी एक महत्त्वाची गोष्ट घडली आहे, ती म्हणजे या तंत्रज्ञानातून जन्माला आलेल्या मुलाला मोठं झाल्यानंतर आपला ‘बाप’ कोण, हे जाणून घेण्याचा अधिकारही  मिळू शकेल. फ्रान्सच्या कायद्यानुसार अगोदर स्पर्म डोनरचं नाव गुप्त ठेवलं जात होतं. एवढंच नाही, समलैंगिक महिला जोडप्यांची नावंही ‘पालक’ म्हणून बाळाच्या जन्मदाखल्यावर नोंदवली जातील. अशा प्रकारचा कायदा आणणारा फ्रान्स हा युरोपातला तेरावा देश ठरला आहे. याआधी ब्रिटन, बेल्जियम, स्पेन याशिवाय  डेन्मार्क, फिनलंड, आयर्लंड, लक्झेम्बर्ग,  नेदरलॅण्ड्स, पोर्तुगाल आणि स्वीडन, आइसलँड आणि नॉर्वे या देशांनी असा कायदा आणला आहे. ‘स्पर्म’ दान हे पुण्याचं काम !या कायद्यामुळे समानतेच्या दृष्टीनं फ्रान्समध्ये एक मोठा बदल घडून आला असला तरी अनेक महिलांना लगेचंच या कायद्याचा लाभ घेता येणं शक्य नाही, असं तज्ञांचं म्हणणं आहे. कारण फ्रान्समध्ये मुळातच स्पर्म डोनर्सची संख्या तुटपुंजी आहे. शिवाय या निर्णयामुळे आता त्यांची मागणी वाढेल. स्पर्मसाठीची वेटिंग लिस्टही मोठी होत जाईल. जास्त वयाच्या समलैंगिक महिलांसाठी ते जास्तच कठीण असेल, कारण ‘स्पर्म’च्या वेटिंग लिस्टसाठी त्यांना जास्त काळ थांबावं लागेल. त्यामुळे त्यांना आजही परदेशाचाच सहारा घ्यावा लागेल. ‘बायोमेडिसिन’ या सरकारी संस्थेच्या प्रवक्ता हेलन ड्यूइट म्हणतात, ‘स्पर्म’ दान करणं हे खूप मोठं पुण्याचं काम आहे. त्यासाठी अधिकाधिक पुरुषांनी पुढे आलं पाहिजे.

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयFamilyपरिवार