शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

...किमान गरिबांच्या ताटातील घास हिरावू नका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 14:07 IST

मिलिंद कुलकर्णी युध्द, साथीचे आजार, महापूर, दुष्काळ अशा आपत्तीच्या काळात समाजातील दोन प्रवृत्ती ठळकपणे दिसून येतात. सद्प्रवृत्ती आणि दुष्प्रवृत्ती. ...

मिलिंद कुलकर्णीयुध्द, साथीचे आजार, महापूर, दुष्काळ अशा आपत्तीच्या काळात समाजातील दोन प्रवृत्ती ठळकपणे दिसून येतात. सद्प्रवृत्ती आणि दुष्प्रवृत्ती. आपल्या ताटातील अर्ध्या भाकरीचा निम्मा तुकडा मुक्या प्राण्याला देणारा निर्धन व्यक्ती जसा असतो, तसा गरिबांसाठी असलेले धान्य हिसकावून त्याचा काळाबाजार करणारे श्रीमंत देखील असतात. सभोवताली असेच चित्र दिसून येत आहे.चित्रपटाची आवड असलेल्या मंडळींना जुन्या काळातील कृष्णधवल चित्रपटातील काही प्रसंगाची पुनरावृत्ती ‘कोरोना’च्या संकटकाळात होत असल्याची अनुभूती आली असेल. चित्रपटातील व्यापारी गरिबांसाठी असलेले अन्नधान्य गोदामात साठवून ठेवतो आणि चित्रपटातील नायक गोदाम फोडून त्याचे वाटप करतो, अनाथ, निर्धनांना दिलदार मनाचा गरीब नायक आधार देतो असे प्रसंग हृदयाला जाऊन भिडतात. डोळ्यांच्या कडा पाणावतात. अगदी तसे घडताना दिसत आहे. एकीकडे जिवाची पर्वा न करता आरोग्य, पोलीस या विभागाचे कर्मचारी त्यांची सेवा इमाने इतबारे करीत आहे तर काही विभाग मात्र सेवा बजावण्याऐवजी मेवा कसा मिळेल, याची चिंता करीत आहे.लॉकडाऊनच्या काळात गुटख्याचा साठा, अवैध दारुचे कारखाने उध्वस्त केल्याच्या कारवाई होत आहे. दारु दुकानांच्या गोदामाचे सील उघडून सर्रास दारुविक्री केली जात आहे. तब्बल १२ हजार बाटल्यांची विक्री केवळ एका गोदामातून झाल्याचे जळगावात उघड झाले. नंदुरबारातील दसरा चौकातील गोदामात अवैध दारुचा कारखाना चालविला जात असल्याचे आढळून आले. नंदुरबारात उत्पादन शुल्क विभागाचे गोदाम फोडून सव्वा पाच लाखांची विदेशी दारु चोरट्यांनी लांबवली. एकीकडे जिवाला धोका असताना काही मात्र संकटकाळातही स्वार्थी प्रवृत्तीला लगाम घालू शकत नाही.हीच स्थिती स्वस्त धान्य दुकानांबाबतीत आहे. देशातील ८० कोटी लोकांना सरकारने तीन महिन्यांचे अन्नधान्य देण्याची घोषणा केली आहे. मात्र हक्काचे धान्य जनतेला मिळत नाही. भ्रष्टाचाराची साखळी आपत्तीकाळातही सक्रीय आहे. त्याचा उद्रेक मग समाजमाध्यमाच्या रुपाने किंवा तहसील कार्यालयात आंदोलनाच्या कृतीने होत आहे. महिना झाला हाताला काम नाही, जमापुंजी संपत आलेली असताना दोन वेळेच्या जेवणासाठी किमान अन्नधान्य सहजपणे मिळायला काय हरकत आहे? रावेर तालुक्यातील वाघोडच्या एका तरुणाने व्हीडिओ तयार करुन रेशन दुकानदाराची मनमानी उघड केली. तेव्हा कुठे त्या दुकानदाराचा परवाना रद्द झाला. जळगावात तहसील कार्यालयात रेशनकार्ड परत करण्याच्या मागणीसाठी २०० लोक जमा झाले. त्यांना समाधानकारक उत्तराऐवजी त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला. सामान्यांना त्यांच्या हक्काचे धान्य मिळण्यासाठी एवढा खटाटोप का करावा लागत आहे. जनधन खात्यातील पाचशे रुपये काढण्यासाठी आठवडाभर बँकांच्या बाहेर ४० अंश तपमानात पाच -पाच तास उभे राहिले की गरिबांची गरज आणि निकट कळेल. अन्यथा सामान्यांसाठी प्रशासन हे ब्रीदवाक्य केवळ भिंतीवर शोभेल.देशभरातील असंख्य मजूर पायी, मिळेल त्या वाहनाने आपल्या गावाकडे परतत आहे. हजारो कि.मी.ची पायपीट करीत आहे. निवारागृहात त्यांची व्यवस्था प्रशासनाने केली आहे. किमान त्यांची निवास आणि भोजन व्यवस्था सुखकर राहील, याची काळजी प्रशासनाने घ्यायला हवी. घरदार सोडून जिवाच्या भितीने फिरणाऱ्या या मंडळींचा क्वारंटाईनचा हा काळ चांगला जावा, म्हणून स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घ्यायला हवा. काही ते करीत आहे, पण प्रमाण खूप कमी आहे. यवतमाळच्या एका मातेने पिंपळनेरला कन्येला जन्म दिला, काय स्वप्न पाहिली असतील बाळंतपणाची आणि काय घडले, हे आपण पहात आहोत. माणुसकी, संवेदना हे काही फक्त शब्द नाही, जगण्याचा मंत्र आहे, तो जितक्या लवकर आम्हाला उमगेल तो आमच्या माणूसपणाचा विजय असेल.

टॅग्स :Jalgaonजळगाव