शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
2
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
3
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
4
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
5
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
6
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
7
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
8
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
9
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
10
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
11
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
12
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
13
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
14
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
15
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)
16
Sonam Raghuvanshi : राजाच्या चेहऱ्यावर हसू अन् सोनमच्या डोक्यात हत्येचं प्लॅनिंग? लग्नातला 'तो' Video तुफान व्हायरल
17
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
18
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
19
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 

किम जोंगची लहान बहीण जास्त खतरनाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 08:12 IST

उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन हे एक माथेफिरू, मनाला येईल ते करणारे एक हेकट गृहस्थ आहेत, असं जगभरात मानलं जातं.

उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन हे एक माथेफिरू, मनाला येईल ते करणारे एक हेकट गृहस्थ आहेत, असं जगभरात मानलं जातं. याचं कारण त्यांनी अनेक वेळा त्याचं प्रत्यंतरही दिलं आहे. आपल्याला जे वाटेल तेच करताना अनेकदा त्यांनी अमेरिकेलाही अंगावर घेतलं आहे आणि त्याला डिवचलं आहे. आपल्यावर त्याचे काय परिणाम होतील, याचा विचार त्यांनी तेव्हाही केला नव्हता आणि आता डोनाल्ड ट्रम्पसारखा त्यांच्याइतकाच हट्टी नेता अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाल्यावरही त्यांनी त्याचा फारसा विचार केलेला नाही. एक हेकेखोर व्यक्ती म्हणून आजवर जगभरात किम जोंग उन यांचं नाव घेतलं जात असलं तरी त्यांच्याच घराण्यात त्यांच्याइतकीच आणखी एक खतरनाक व्यक्ती आहे. उत्तर कोरियाच्या राजकारणात आणि देशाच्या संदर्भात कोणतेही निर्णय घेण्यात बऱ्याचदा त्यांचा निर्णय अंतिम असला तरी त्यांचं नाव मात्र माध्यमांमध्ये, जगभरच्या लोकांमध्ये फारसं परिचित नाही. ही व्यक्ती म्हणजेच किम जोंग उन यांची लहान बहीण किम यो जोंग. नुकतीच त्यांनीही अमेरिकेला थेट धमकी दिली आहे. 

दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया यांच्यातून विस्तवही जात नाही, हे अख्ख्या जगाला माहीत आहे. या दोन्ही सख्ख्या शेजारी देशांची कायम एकमेकांवर मात करण्यासाठी अहमहमिका सुरू असते. आपला कट्टर वैरी, शत्रू म्हणूनच किम भावंडं दक्षिण कोरियाकडे पाहातात. त्यामुळे दक्षिण कोरियाशी कोणताही व्यवहार, कुठल्याही प्रकारचे संबंध ठेवणाऱ्यांवर त्यांचं बारीक लक्ष असतं. उत्तर कोरियाच्या शाळकरी मुलांनी दक्षिण कोरियन चित्रपट सीडी, डीव्हीडीवर पाहिल्यामुळे त्यांना तुरुंगात टाकण्यापासून तर फासावर लटकवण्यापर्यंतचे प्रकार किम यांनी केले आहेत. दक्षिण कोरियाशी इतकं हाडवैर असताना अमेरिकेनं त्यांना विमानवाहू युद्धनौका दिल्यानं आणि त्यांना लष्करी मदत केल्यानं किम जोंग उन यांची बहीण किम यो जोंग यांचा पुरता तीळपापड झाला. ‘अमेरिकेनं असं काही केलं तर त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत आणि तुम्हाला अद्दल घडवू’ अशी थेट धमकीच किम यो जाेंगनं अमेरिकेला दिली आहे. ‘त्या बोलतात कमी आणि करतात जास्त’, अशी उत्तर कोरियात त्यांची ख्याती आहे. आता तर त्या थेट बोलल्याही आहेत, त्यामुळे त्याचे परिणाम काय होतील, याचा कयास अख्ख्या जगभरात लावला जात आहे. या धमकीनंतर उत्तर कोरिया आता आपल्या शस्त्रास्त्र चाचण्यांना आणखी गती देईल आणि अमेरिकेच्या विरोधात आपली संघर्षाची भूमिका आणखी तेज करेल, असं मानलं जातंय. 

या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प काय करतील हादेखील अनेकांसाठी औत्सुक्याचा विषय आहे. डोनाल्ड ट्रम्प कायम तोऱ्यात असतात, जगाला अद्दल घडवण्याची भाषा बोलत असतात आणि आपल्या विरोधात जाणाऱ्यांच्या विरोधात तर ते सतत आपली तलवार परजत असतात, अशावेळी ट्रम्प यांची उत्तर कोरिया, किम भावंडांसोबतची भूमिका काय असेल याविषयी तर्ककुतर्क लढवले जात आहेत. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी सामंजस्याची भूमिका घेतली असून, दोन्ही देशांचे संबंध चांगले राहावेत यासाठी किम भावंडांना आपण भेटू असं त्यांनी जाहीर केलं आहे. 

टॅग्स :Kim Jong Unकिम जोंग उनnorth koreaउत्तर कोरिया