शहरं
Join us  
Trending Stories
1
International: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
2
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
3
सार्वजनिक निधीचा वापर नेत्यांच्या पुतळ्यांसाठी करता येणार नाही- सर्वोच्च न्यायालय
4
रशियाने भारताला SU-57 लढाऊ विमानांची ऑफर दिली, त्याचे फिचर अन् महत्त्व जाणून घ्या
5
PAK v SL: २१८० दिवस... श्रीलंका त्याचाच फायदा घेणार, पाकिस्तान आज आशिया कपमधून बाहेर होणार?
6
कोणी बिजनेसवुमन तर कोणी बॉलिवूड स्टार! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या नवदुर्गा काय करतात?
7
Aadhaar App :'आधार कार्ड'मध्ये बदल करणे होणार सोपे, नवीन अ‍ॅप लाँचच्या तयारीत;मिळणार खास फीचर
8
हाय गर्मी! उष्णतेचा प्रकोप जीवघेणा; युरोपमध्ये ६२,७०० जणांचा मृत्यू, वाढत्या तापमानाचा जगाला धोका
9
९४ मिनिटांचा थरार! विमानांच्या चाकांमध्ये लपून दिल्लीत आलेल्या अफगाणी मुलासोबत पुढे काय घडलं?
10
'चॅटजीपीटी'कडून बनावट नोटा तयार करण्याचे धडे; ५०० रुपयांच्या नोटा बनवल्या आणि बाजारातही वापरल्या
11
महिंद्रा, PNB आणि L&T... दिवाळीपूर्वी मोठी कमाईची संधी! बाजारातील 'हे' ५ शेअर्स ठरू शकतात गेमचेंजर
12
Ladki Bahin Yojana: २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
13
VIRAL : एका झटक्यात महिला झाली कोट्यधीश; ChatGPTने पालटलं नशीब! वाचून व्हाल हैराण
14
३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला...
15
घराशेजारच्या किराणा दुकानांमध्ये ‘GST बचत उत्सवा’चा लाभ नाहीच; ग्राहकांचा झाला अपेक्षाभंग
16
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घ्या’ काँग्रेसची मागणी  
17
Ghaziabad Encounter: गाझियाबाद एन्काउंटरची इतिहासात नोंद, असं वेगळं काय घडलं? 
18
अर्जुन तेंडुलकर राहुल द्रविडच्या मुलाला भिडला; समित द्रविड पहिल्यांदाच खेळला, पण... 
19
मराठी माणसाचं दुकान हडपल्याचा गुन्हा; 'त्या' परप्रांतीयाला शिंदेसेनेकडून जबाबदारी, पक्षात नाराजी
20
"गरबा कार्यक्रमांच्या प्रवेशद्वारावर गोमूत्र ठेवावं, गैर-हिंदूंना..."; धीरेंद्र शास्त्रींचं मोठं विधान

वारकऱ्यांचा आधार, वाळूमाफियांचा कर्दनकाळ; भेटा सोलापूरच्या 'सिंघम'ला

By राजा माने | Updated: June 20, 2018 12:32 IST

राज्यभरातील लाखो वारकऱ्यांचे पंढरी दर्शन सुकर करणारा, वाळू माफियांच्या मुसक्या आवळण्याबरोबरच १५५ गुन्हेगारांना हद्दपार करणारा तसेच ‘समाधानी व स्वयंपूर्ण गाव’सारखे उपक्रम राबविणारा खाकी वर्दीतील आगळा ‘प्रभू’...

राज्यभरातील लाखो वारकऱ्यांचे पंढरी दर्शन सुकर करणारा, वाळू माफियांच्या मुसक्या आवळण्याबरोबरच १५५ गुन्हेगारांना हद्दपार करणारा तसेच ‘समाधानी व स्वयंपूर्ण गाव’सारखे उपक्रम राबविणारा खाकी वर्दीतील आगळा ‘प्रभू’...पोलीस आणि खाकी वर्दी या विषयीची मते व्यक्तिपरत्वे बदलतात. खाकी वर्दीतल्या माणसाशी मैत्रीही नको अन् पंगाही नको असे म्हणणारे आपल्याला पदोपदी भेटतात. पोलिसांविषयीच्या अशाच मतप्रवाहांना छेद देण्याचे काम सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक के. विरेश प्रभू या अधिका-याने आपल्या कर्तबगारीने केले आहे.महाराष्ट्राच्या समाज जीवनाचा अविभाज्य घटक असलेल्या आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपुरात दाखल होणा-या लाखो वारक-यांच्या आगळ्यावेगळ्या सेवेनेच प्रभू यांनी आपल्या वेगळेपणाची सोलापूर जिल्ह्याला झलक दाखविली. केवळ बडगा आणि अरेरावीची भाषा असेल तरच गर्दीला शिस्त लावता येते हा समज त्यांनी मोडून काढला.पोलीस कर्मचा-यांमधील समन्वय राखत असताना त्यांचा उत्साह जतन करणारी कार्यपद्धती त्यांनी आषाढी वारी बंदोबस्त नियोजनात अवलंबिली. त्याचाच परिणाम म्हणून गेल्या तीन वर्षांपासून पंढरीत दाखल होणा-या प्रत्येक वारक-याला शहरातील प्रवेशापासून दर्शन रांगेत आनंदाने थांबून शिस्तबद्ध दर्शनाची नैसर्गिक सवय लावली.आषाढीसारख्या उत्सवात पोलीस केवळ बंदोबस्तातच न राहता त्याचा येणा-या वारक-यांशी संवादही झाला पाहिजे असा प्रयत्न त्यांनी केला. त्या प्रयत्नाला व्यसनमुक्ती, महिला सबलीकरण आणि जलसंवर्धनाच्या उपक्रमांचे अधिष्ठान प्राप्त करून दिले. त्यासाठी वारक-यांना विरंगुळा व करमणुकीबरोबरच ग्रामविकासाचा नवा विचार देणारे समूह विकसित केले. हे समूहच आषाढी वारी कालावधीत वारक-यांशी नाते जोडण्याचे काम करीत असतात.सोलापूर जिल्ह्याला धार्मिक-अध्यात्मिक तसेच स्वातंत्र्य समृद्ध चळवळीची जशी परंपरा आहे तशीच दुर्दैवाने गुंडगिरी टोळ्या आणि त्यांच्या कारवायांची देखील अनिष्ठ परंपरा आहे. ही परंपरा खंडित करण्याचे ऐतिहासिक काम प्रभू यांनी केले, याबद्दल सोलापूरकरांना त्यांचे विशेष कौतुक वाटते. तीन वर्षांच्या कारकिर्दीसाठी जिल्ह्यात येणा-या अधिका-यांना गुंड आणि त्यांच्या टोळ्यांना नेस्तनाबूत करण्याची इच्छा नसते.प्रभू यांनी मात्र अगदी पहिल्या दिवसापासून अवैध धंद्याच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली. टोळ्या आणि त्यांच्या म्होरक्यांना शिस्तबद्ध पद्धतीने कायद्याच्या चौकटीत जेरबंद केले. ७४ लोकांवर मोक्कासारखी कारवाई करतानाच १५५ गुंडांना जिल्ह्यातून हद्दपार करण्याची हिंमत दाखविली. त्याचाच परिणाम म्हणून सामान्य माणसापासून ते पोलीस दलातील प्रत्येक सदस्याचे मनोबल उंचावले.एकीकडे अवैध धंदे आणि गुन्हेगारी प्रवृत्तीला चाप लावत असताना दुसरीकडे ग्रामीण विकासाचा नवा कृतिशील विचार खाकी वर्दीत त्यांनी रुजविला. ‘समाधानी व स्वयंपूर्ण गाव दत्तक योजना’ यासारखा पोलिसी संस्कृतीच्या बाहेरचा उपक्रम हाती घेतला. पोलीस अधिकारी भुजंग तथा नाना कदम यांच्या माध्यमातून उपरोक्त दत्तक योजना गतिमान केली. ग्रामसभा घेणे, शिक्षण आणि आरोग्यविषयी प्रबोधन करणे, जलयुक्त शिवार योजनेसह ग्रामविकासाला पायाभूत ठरणाºया उपक्रमांची अंमलबजावणी करण्याचे काम कदम यांनी केले.गाव समाधानी राखण्याचा प्रयत्न करीत असतानाच प्रभू यांनी वाळू माफियांच्याही मुसक्या आवळल्या. तब्बल ३४ कोटी रुपयांची अवैध वाळू हस्तगत केली. अशी कामे करणारा हा माणूस खाकी वर्दीतील आगळा ‘प्रभू’च नाही काय?