शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

हे ज्ञानदीप अविरत उजळत राहो!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 03:17 IST

शिक्षकाचा जगभरात होणारा हा गौरव केवळ एक दिवसाचा न राहता शिक्षकरूपी हे ज्ञानदीप अविरत उजळत राहू दे !

‘एखाद्या राष्ट्राची उंची त्या देशातील शिक्षकांच्या ज्ञानात्मक उंचीइतकीच असते,’ असे म्हटले जाते. म्हणूनच शिक्षकाकडे अवघा समाज एक आदर्श व्यक्ती म्हणून पाहतो. आपल्या भारतीय समाजातच नाही तर जगभरातील संस्कृतींकडे पाहिले की गुरूकडे, शिक्षकाकडे अत्यंत आदराने पाहिले जात होते. भारतात याच भावनेतून माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन या हाडाचे शिक्षक असलेल्या व्यक्तिमत्त्वाचा शिक्षणक्षेत्रातील कार्याचा गौरव करण्याच्या हेतूने ५ सप्टेंबर हा दिवस १९६२ पासून शिक्षक दिन म्हणून उत्साहाने साजरा होतो. जागतिक स्तरावरही शिक्षणाप्रति जागरूकता वाढावी म्हणून युनेस्कोतर्फे १९९४ पासून दरवर्षी ५ आॅक्टोबर हा दिवस ‘जागतिक शिक्षक दिन’ साजरा केला जातो. भावी पिढ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी, सुसंस्कृत समाजनिर्मिती व्हावी या उद्देशाने शंभरहून अधिक देशांत हा दिवस साजरा होतो. विकसित, विकसनशील देश एकत्र येऊन शिक्षणासंदर्भात भरीव असे काही करण्यासाठी विचारांचे, कृतीचे आदानप्रदान करीत असताना भारतानेही या दिवसाकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. कारण जगभरातील विकसनशील राष्ट्रांत शिक्षणावर राष्ट्रीय उत्पन्नाच्या १० टक्के खर्च केला जात असताना तोच खर्च भारतात केवळ तीन ते पाच टक्क्यांच्या आसपास आहे. आजची सामाजिक परिस्थिती पाहता भौतिक विकास होऊनसुद्धा आपला नैतिक विकास होत आहे का, हा प्रश्न निर्माण झाला आहे. मूल्यव्यवस्था कोलमडत असताना समाज शिक्षकाकडेच आशेने पाहत आहे. शिक्षणक्षेत्रात शिक्षकच केंद्रवर्ती घटक आहे.‘आदर्श राज्याच्या निर्मितीत शिक्षकांचा सहभाग हा अत्यंत महत्त्वाचा असतो’, असे मानणारा प्लेटो शिक्षकांवर मनापासून प्रेम करायचा. कविवर्य कुसुमाग्रजांनीही, ‘जेथे जेथे शिक्षकाचा होतो बहुमान तो देश ठरतो महान’ असे म्हटले होते. उगवत्या पिढीला कोणतं शिक्षण दिलं जातं, ते देण्याची पद्धत काय, यावर राष्ट्राचं भवितव्य अवलंबून असतं. यादृष्टीने शिक्षणक्षेत्रात शिक्षक, विद्यार्थी व पालक हे तीन प्रमुख घटक आहेत. पण या सर्वात शिक्षक हा केंद्रवर्ती घटक आहे. आजच्या युवाशक्तीला योग्य दिशा देणारा शिक्षक पाहिजे आहे. शिक्षण हे समाजपरिवर्तनाच्या प्रक्रियेतील असे साधन आहे, की ज्यामुळे माणूस नवीन होतो. नवराष्ट्र उभारणीसाठी विज्ञाननिष्ठा, समता, धर्मनिरपेक्षता, चारित्र्य ही मूल्ये नव्या पिढीत रुजविणे शिक्षकाला शक्य आहे. विचार करणे म्हणजे प्रश्न सोडविण्याचे सामर्थ्य प्राप्त करणे. म्हणूनच समाज परिवर्तनाचे, राष्ट्रीय एकात्मतेचे व आंतरराष्ट्रीय सामंजस्याचे साधन म्हणजे शिक्षण आहे. अमेरिकन शिक्षण शास्त्रज्ञ जॉन ड्युई म्हणतो, ‘शिक्षक हा मित्र, तत्त्वज्ञ आणि मार्गदर्शक असतो. विद्यार्थ्यांच्या विकासासाठी योग्य त्या वातावरणनिर्मितीची कुशलता शिक्षकाजवळ असते. त्याला सामाजिक समस्यांची, गरजांची तसेच जबाबदारीची जाणीव असते.’ अशा या शिक्षकाचा होणारा हा गौरव केवळ एक दिवसापुरता राहू नये. तर ‘अविवेकाची काजळी। झाडूनि विवेकदीप उजळी। योगिया पाहे दिवाळी । निरंतर॥’ असे संत ज्ञानेश्वरांनी म्हटल्याप्रमाणे हा शिक्षकरूपी ज्ञानदीप अविरत उजळत राहायला हवा.- विजय बाविस्कर

vijay.baviskar@lokmat.com

टॅग्स :Teacherशिक्षक