शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
3
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
4
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
5
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
6
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
7
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
8
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
9
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
10
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
11
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
12
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
13
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
14
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
15
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
16
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
17
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
18
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
19
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
20
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

जयभीम-लालसलाम धर्मांधताविरोधी धर्मनिरपेक्ष राजकारणाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2017 01:12 IST

दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा विद्यार्थी नेता कन्हैयाकुमार ७ आॅगस्ट रोजी औरंगाबादेत येऊन गेला.

-बी.व्ही.जोंधळेदिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा विद्यार्थी नेता कन्हैयाकुमार ७ आॅगस्ट रोजी औरंगाबादेत येऊन गेला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या मिलिंद महाविद्यालयास त्याने यावेळी जशी भेट दिली, तसेच शहरातील २६ विविध संघटनांच्या वतीने आयोजित केलेल्या संविधान संघर्ष बचाव परिषदेतही त्याचे भाषण झाले. त्याने लिहिलेल्या ‘बिहार टू तिहार’ या इंग्रजी पुस्तकाचा प्रा. सुधाकर शेंडगे यांनी मराठी अनुवाद केलेल्या ‘बिहार ते तिहार’ या पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रमही झाला. कन्हैयाकुमारच्या प्रत्येक कार्यक्रमास दलित समाजातील तरुण-तरुणींनी प्रचंड गर्दी केली होती आणि प्रत्येक कार्यक्रमात उपस्थित असलेल्या समुदायाला अभिवादन करताना कन्हैयाकुमार ‘जयभीम-लालसलाम’ अशी घोषणा देत होता.कन्हैयाकुमारच्या कार्यक्रमास उपस्थित असलेली दलित युवकांची मोठी गर्दी पाहून काही जणांनी असा प्रश्न उपस्थित केला की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कम्युनिस्टांच्या राजकीय भूमिकेवर टीका केलेली असताना समतेच्या संदर्भात ‘बुद्ध की मार्क्स’ अशी तुलना करताना मार्क्सच्या मार्गाबाबत मतभिन्नता नोंदविली आहे. कम्युनिस्टांनी बाबासाहेबांचा १९५२ च्या मुंबई निवडणुकीत पराभवही केला, तेव्हा दलित पोरे कन्हैयाच्या मागे कशी? अर्थात भूतकालीन गोष्टी उकरून काढून असा प्रश्न उपस्थित करणे हाच एक उथळपणा आहे. कारण असा प्रश्न उपस्थित करणारे हे समजूनच घेत नाहीत की, भाजपच्या राज्यात हिंदुत्ववाद्यांच्या धर्मांध कारवाया वाढल्या असून दलित-अल्पसंख्याक समाजात एक दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. माजी उपराष्टÑपती हमीद अन्सारी यांनीसुद्धा देशातील मुस्लीम समाजात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे, असे मत नुकतेच एका मुलाखतीत व्यक्त केले आहे. तेव्हा भारतीय संविधान, लोकशाही धर्मनिरपेक्षता, अभिव्यक्ती स्वातंत्र्य दलित-शोषितांचे प्रश्न घेऊन संघ-भाजपच्या एकाधिकारशाहीवादी धर्मांध राजकारणाच्या विरोधी कन्हैया बोलत असेल, तर ती एक प्राप्त राजकीय परिस्थितीची गरज म्हणून दलित युवक कन्हैयाभोवती गर्दी करीत असतील तर नवल ते कोणते?‘जयभीम-लालसलाम’ या घोषणेमुळे बिचकून जावे असे काहीही नाही. ‘जयभीम’ ही घोषणा एका जातीविहीन समाजासाठी आंबेडकरी चळवळीतून पुढे आली आहे, तर लालसलाम ही समतामूलक समाजाचे स्वप्न पाहणाºया डाव्या चळवळीची घोषणा आहे. भाजप-संघाच्या जाती-धर्मावर आधारित धर्मांध फॅसिस्ट राजकारणाचा पराभव कोणतीही एकटी-दुकटी संघटना करू शकत नाही. लोकशाही, समाजवाद, धर्मनिरपेक्षतेवर विश्वास असणाºया डाव्या-पुरोगामी पक्ष संघटनांनी म्हणूनच एकत्र येऊन संघ-भाजपच्या धर्मांध नीतीविरुद्ध रणशिंग फुंकण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. यासंदर्भात ‘जयभीम-लालसलाम’ या घोषणेचे महत्त्व लक्षणीय आहे. जयप्रकाश नारायण यांनी भ्रष्टाचार आणि आणीबाणीविरोधी उभ्या केलेल्या जनांदोलनात संघ परिवार-समाजवादी आदी डावे-उजवे पक्ष सहभागी झाले होते. ती जशी त्यावेळी तत्कालीन राजकारणाची एक गरज होती तशीच दलित-अल्पसंख्याकविरोधी भाजप सरकारविरुद्ध लढण्यासाठी आता डाव्या पक्ष-संघटनांची एकजूट होण्याची गरज आहे. अशा एकजुटीतून होणाºया संभाव्य लोकलढ्याची प्रतीकात्मक घोषणा म्हणजेच ‘जयभीम-लालसलाम’ होय.देशात आज दलित, अल्पसंख्याकांविरोधी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. ‘सबका साथ, सबका विकास’ अशी घोषणा देऊन तीन वर्षांपूर्वी मोदी सरकार सत्तेवर आले; पण विकास तर बाजूलाच राहिला; मात्र मोदी सरकारच्या काळात हिंदुत्ववादी संघटनांच्या धर्मांध राजकारणाला बरकत आली. पंतप्रधान एकीकडे दलितांना मारण्याऐवजी मला मारा असे म्हणतात, गोरक्षकांच्या धुमाकुळाबाबत तीव्र नापसंती व्यक्त करतात, देशाचा कारभार मनुस्मृतीनुसार नव्हे तर संविधानानुसार चालेल, अशीही ग्वाही देतात; मात्र दुसरीकडे लोकांचे बुनियादी प्रश्न बाजूलाच पडून दलित-अल्पसंख्यकांत दहशत निर्माण करणाºया धर्मांध कारवाया सुरूच राहतात. कुणावरच कुठलीच कारवाई होत नाही, यास तरी काय म्हणावे? सुसंगती का विसंगती?दलित समाजाच्या विकासाबाबत भाजप सरकार फार प्रामाणिक आहे असेही दिसत नाही. सरकार दलित विकास योजनांची तरतूद कमी करीत आहे. उदा. सफाई कामगारांच्या मुलांनी स्वयंरोजगार निवडण्यासाठी माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या सरकारने २०१३-१४ सालच्या अर्थसंकल्पात ५५७ कोटी रुपयांची तरतूद केली होती. भाजप सरकारने मात्र २०१४-१५ सालच्या अर्थसंकल्पात फक्त ४७ कोटी रुपयांची तरतूद केली. मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती रकमेतही कपात करण्यात आली. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या अर्थसंकल्पात २.४९ टक्के तरतूद असायची. भाजप सरकारच्या काळात २०१४-१५ साली ती १.७२ टक्के झाली. तात्पर्य आता दलित समाजाची चोहोबाजूने ससेहोलपट सुरू आहे. अत्याचार हे तर त्यांच्या पाचवीलाच पुजले आहेत.देशात आज संघविचाराचे पंतप्रधान, राष्टÑपती, उपराष्टÑपती, लोकसभाध्यक्ष प्रमुख पदावर आहेत. भाजप-संघाचा हिंदुराष्टÑवादी अजेंडा उघड आहे. संघास भारतीय संविधान मान्य नाही हेही स्पष्ट आहे. गोळवलकर गुरुजींचे विचारधन मुस्लीम-ख्रिश्चन व कम्युनिस्टांच्या देशनिष्ठेविषयी साशंक आहे. लोकसभेत आज भाजप बहुमतात आहे. १८ राज्यांत त्यांची सत्ता आहे. राज्यसभेतही त्यांचे बहुमत होऊ घातले आहे. आंबेडकरानुयायांना म्हणूनच अशी साधार भीती वाटते की, भविष्यात भारतीय संविधान तर बदलले जाणार नाही ना? कारण घटना पुनर्विलोकनाचा प्रयत्न माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात झाला होता; पण भाजपला तेव्हा बहुमत नव्हते. अन्य पक्षांचा पाठिंबा घेऊन वाजपेयी सरकार सत्तारूढ झाले होते. आता भाजप बहुमतात आहे. भारतीय राज्यघटनेतील समता, स्वातंत्र्य, बंधुभाव, न्याय, लोकशाही, समाजवाद, धर्मनिरपेक्षता ही मानवी मूल्यांचा पुरस्कार करणारी तत्त्वे दलित समाजाचे एक सुरक्षा कवच आहे; आज तीच संकटात सापडल्यासारखी स्थिती आहे. दुसरीकडे बाबासाहेबांचे दैवतीकरण करून त्यांचे क्रांतिकारी विचार मारून टाकण्याचे काम जोरात सुरू आहे. भाजपच्या भूलभुलैयात अडकून दलित मतदार भाजपला मतदान करीत आहे. आंबेडकरी चळवळीच्या दृष्टीने ही सारीच स्थिती चिंताजनक आहे. फुले-शाहू-आंबेडकरांचा समतावाद टिकविण्यासाठी दलित-शोषित समाजाने म्हणूनच जागरूक राहण्याची गरज निर्माण झाली आहे. ‘जयभीम-लालसलाम’ या घोषणेकडे म्हणूनच अशा व्यापक दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे, असे म्हटले तर गैर ठरू नये.