शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

जिवाला जीव देणारी माणसं मिळवणारा माणूस!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2022 14:49 IST

ते सर्वांना बरोबरीने वागवायचे. कोणाहीबद्दल त्यांच्या तोंडून कधीही चुकीचा शब्द गेला, असं मला आठवत नाही. राजकीय जीवनात बाबूजींनी पक्षनिष्ठेला  अत्यंत महत्त्व दिलं. पंडितजी, इंदिराजी, राजीवजी या सर्वांनाच नव्हे, तर काँग्रेसच्या विचाराला साथ देऊन ते काँग्रेसच्या विचारांचा आधार बनले.

शिवराज पाटील-चाकूरकर, लोकसभेचे माजी अध्यक्ष, माजी केंद्रीय गृहमंत्री 

जवाहरलाल दर्डा यांच्यामध्ये व्यवहारज्ञान, राजकीय ज्ञान, तंत्रज्ञान आणि आध्यात्मिक ज्ञान अशा चारही ज्ञानांचा सुरेख संगम मला सतत पाहायला मिळालेला आहे. जग बदलतंय, झपाट्यानं  पुढे जातंय. ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञान आत्मसात करून घेतलं नाही, तर आपण काळाच्या बाहेर फेकले जाऊ, याची त्यांना पूर्ण जाणीव होती. पण, त्याचवेळी अध्यात्माने ज्या गोष्टी शिकवल्या आहेत, त्या गोष्टी त्यांनी मनस्वी आत्मसात केलेल्या होत्या. बाबूजी राजकीय नेते होते, मंत्री होते, ‘लोकमत’चे संस्थापक संपादक होते; पण त्यांनी कधीही मोठेपणाचा आव आणला नाही, मिरवला नाही आणि आपल्यासमोरचा दुसरा कोणी लहान आहे, असं त्यांनी कधीही मानलं नाही. ते सर्वांना बरोबरीने वागवायचे. कोणाहीबद्दल त्यांच्या तोंडून कधीही चुकीचा शब्द गेला, असं मला आठवत नाही. राजकीय जीवनात बाबूजींनी पक्षनिष्ठेला  अत्यंत महत्त्व दिलं. पंडितजी, इंदिराजी, राजीवजी या सर्वांनाच नव्हे, तर काँग्रेसच्या विचाराला साथ देऊन ते काँग्रेसच्या विचारांचा आधार बनले. यासाठी त्यांनी अत्यंत जवळचे मित्र, महाराष्ट्राचे त्यावेळचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची राजकीय साथही सोडली; पण, काँग्रेसचा विचार सोडला नाही. यात त्यांची फार मोठी दूरदृष्टी होती. मी त्यांच्याच यवतमाळ गावी, त्यांच्याच घरी काँग्रेस प्रवेश केला होता. त्यावेळी हेमवतीनंदन बहुगुणाजी आले होते, त्यावेळपासून मी पाहातो आहे, या नेत्यानं कोणालाही नावं ठेवली नाहीत. त्यांची ही जीवननिष्ठा होती. बाबूजींनी सुरू केलेल्या ‘लोकमत’मधून कोणाचीही बदनामी अकारण त्यांनी केली नाही. त्याचमुळे ‘लोकमत’ सामान्यांचं वृत्तपत्र झालं.  त्यांच्यासोबत काम करणारे सहकारी जिवाला जीव देऊन काम करीत होते. अशा प्रकारचे सहकारी तयार करणं आणि त्यांना सांभाळण ही सोपी गोष्ट नव्हे, पण दर्डाजींना ते सहज जमलं होतं. ही कंपनी आपलीच आहे असं वातावरण  तयार करण्याची क्षमता दर्डाजींमध्ये होती आणि हा संस्कारही अध्यात्माचा संस्कार आहे, असं मी मानतो. या संस्कारांमध्ये मानवता प्राधान्याने असते. त्या बळावरच उभे राहाते ते नेतृत्व अक्षय असते.विजय दर्डा माझ्यासोबत राज्यसभेत होते. ते आणि त्यांचे बंधू राजेंद्र यांच्यावरील बाबूजींच्या संस्कारांचा ठसा मी सातत्याने पाहात आलो आहे. दर्डाजींच्या जन्मशताब्दीनिमित्ताने त्यांना मन:पूर्वक अभिवादन! 

टॅग्स :Jawaharlal Dardaजवाहरलाल दर्डाShivraj Patil Chakurkarशिवराज पाटील चाकूरकरLokmatलोकमत