शहरं
Join us  
Trending Stories
1
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
2
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
3
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
4
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
5
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
6
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
7
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
8
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
9
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
10
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
11
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
12
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
13
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
14
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
15
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
16
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
17
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
18
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
19
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
20
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

जनमन - डोक्यावर हेल्मेट असले तरी रस्त्यावरच्या खड्ड्यांचे काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2022 06:30 IST

पावसाळ्याच्या तोंडावर हेल्मेटसक्ती घोषित करून खड्ड्यांच्या मूळ प्रश्नाला बगल देण्यात आली आहे, असे वाटते. बाह्यतः दिसायला दुचाकीस्वारांची काळजी; पण खरे कारण खड्ड्यांचे आहे!

दुचाकीवरील सहप्रवाशालाही मुंबईत हेल्मेटचा वापर  करावा लागणार आहे. हे झाले मुंबईचे आणि राज्याचे काय?  ‘गंभीर इजा न होणे’ हा  केंद्रबिंदू लक्षात घेतला, तर नियम सर्वांसाठी समान का नाही? दुचाकीवरील दोघांनाही हेल्मेटसक्ती यापूर्वीही होती, ती मध्येच सोडून दिली, आता पुन्हा हेल्मेटसक्तीचे भूत. हा निव्वळ खुळचटपणा आहे. पावसाळ्यातल्या खड्ड्यांचा सर्वाधिक फटका दुचाकीस्वारांना बसतो.  हेल्मेटसक्ती आहे;  पण ज्या खड्ड्यांमुळे दुचाकीस्वारांना प्रचंड मनस्ताप होतो त्याची जबाबदारी कोण घेणार? पाऊसच इतका पडतो की, रस्त्यांवर खड्डे हे पडणारच, असा कोडगेपणा अंगी भिनला असल्याने केवळ वरवरचे उपाय शोधून लोकांच्या तोंडाला पाने पुसली जातात. खड्ड्यांमुळे दुचाकी स्वारांसंदर्भात काही दुर्घटना घडल्यास त्यावरून रणकंदन माजू नये, या भीतीपोटी पावसाळ्याच्या तोंडावर हेल्मेटसक्ती घोषित करून खड्ड्यांच्या मूळ प्रश्नाला बगल देण्यात आली आहे, असे वाटते. बाह्यतः दिसायला दुचाकीस्वारांची काळजी; पण खरे कारण खड्ड्यांचे आहे!  

राज्यात सर्वत्र  हेल्मेटचा वापर न करणारे दुचाकीवाले वाहतूक पोलिसांच्या पुढून ये-जा  करतात.  अशाने हेल्मेटसक्तीचे सूत्र कसे अमलात आणले जाईल? जिथे दुचाकीस्वार एका हेल्मेटचाही उपयोग करत नाहीत, तिथे ते दोन हेल्मेटचा उपयोग करतील का? या प्रश्नाचे ‘हो’, असे खात्रीपूर्वक उत्तर वाहतूक पोलिसांच्या कारवाईवर अवलंबून असणार आहे. हेल्मेट न घातल्यास तीन महिन्यांसाठी चालक अनुज्ञप्ती निलंबित करण्याची तरतूद आहे. मात्र, त्या दुचाकीस्वाराला कुठल्याही पेट्रोल पंपावर तीन महिने पेट्रोल मिळणार नाही. यासाठी काय उपाययोजना करता येईल?  हेल्मेटसक्तीचे सूत्र आज जरी पुन्हा चर्चेत आले असले तरी भरधाव वेगाने दुचाकी चालवणे ही अत्यंत गंभीर समस्या वाढत चालली आहे. जी स्वतःसह दुसऱ्याचेही नाहकपणे प्राण घेणारी ठरत आहे.- जयेश राणे, मुंबई

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकMumbaiमुंबई