शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

‘पार्थची भूमिका, भाषा हीच अधिकृत’ असा आदेश काढा!

By अतुल कुलकर्णी | Updated: April 12, 2026 13:22 IST

NCP News: तुम्हाला जे योग्य वाटेल ते घ्या गोड मानून... अगदी हल्ली तुमच्या पक्षात जे काही चालू आहे, ते तुम्ही जसे गोड मानून घेत आहात अगदी तसेच..! काही म्हणा, पण पार्थ पवार शब्दाला पक्का ठरला. ‘बारामतीमधील काँग्रेसची उमेदवारी मागे घेण्यासाठी आपण कोणालाही भेटणार नाही, कोणाला बोलणार नाही, जे व्हायचे ते होईल...’ असे त्याने ठणकावून सांगितले होते.

- अतुल कुलकर्णी (संपादक, मुंबई)

प्रिय सुनील तटकरे जीनमस्कार म्हणायचे की जय महाराष्ट्र की जय श्रीराम...?तुम्हाला जे योग्य वाटेल ते घ्या गोड मानून... अगदी हल्ली तुमच्या पक्षात जे काही चालू आहे, ते तुम्ही जसे गोड मानून घेत आहात अगदी तसेच..! काही म्हणा, पण पार्थ पवार शब्दाला पक्का ठरला. ‘बारामतीमधील काँग्रेसची उमेदवारी मागे घेण्यासाठी आपण कोणालाही भेटणार नाही, कोणाला बोलणार नाही, जे व्हायचे ते होईल...’ असे त्याने ठणकावून सांगितले होते. तसेच तो वागला. शिवाय ‘काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू झाला आहे,’ अशी भविष्यवाणीही करून टाकली होती. तुम्ही इतकी वर्षे राजकारणात आहात; पण तुम्हाला कधी अशी भविष्यवाणी करता आली नाही. ती हिंमत पार्थने दाखवली. त्यासाठी अभ्यास लागतो. त्यामुळे त्याचे खरे तर तुम्ही अभिनंदन केले पाहिजे. जे त्याच्या आजोबांना, त्याच्या वडिलांना जमले नाही, ते त्याने करून दाखवले. तुम्हाला कोणालाही पार्थचे यश आणि त्याचे पुढे जाणे कदाचित आवडले नसेल. त्यामुळे त्याच्याविरोधात तुम्ही उलट-सुलट प्रतिक्रिया देत आहात. उलट तुम्ही तर काँग्रेसने मोठेपणा दाखवून योग्य निर्णय घेतला, असे सांगितले. त्यासाठी काँग्रेस हाय कमांडचे आभारही मानले. अजित पवार यांच्या निधनानंतर भावनिक आणि राजकीय स्थैर्य राखणारे पाऊल या निमित्ताने उचलले गेले असे सूचित केले. पार्थसारखा करारीपणा तुम्हाला दाखवता आला नाही. काँग्रेसने उमेदवारी मागे घेतल्यामुळे काँग्रेसचा डाउनफॉल सुरू झाला, असे तुम्ही म्हणू शकला असतात. त्यामुळे पार्थची बाजू उचलून धरता आली असती; पण ते तुम्ही केले नाही. तुमचे चुकलेच.

कोणी कसे वागावे, कोणी काय बोलावे, हा ज्याचा-त्याचा प्रश्न आहे. पार्थच्या परस्पर रोहित पवार यांनी काँग्रेस पक्षाची माफी मागितली... रोहितने माफी मागितल्याचे खासदार सुप्रियाताईंनी सांगून थेट ‘हा शेवटी संस्कारांचा भाग आहे,’ असे स्पष्ट केले... पार्थच्या आई सुनेत्रा पवार यांनी काँग्रेसने उमेदवारी मागे घ्यावी म्हणून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी संपर्क साधला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपकाळ यांना फोन केला. काँग्रेसने सुनेत्रा पवार यांच्या विरोधातील उमेदवारी मागे घेतल्याबद्दल पार्थचे बंधू जय पवार यांनी काँग्रेसला धन्यवाद दिले. या सगळ्याचा आणि पार्थचा काय संबंध? त्याने माफी मागितली का? नाही ना... त्याने काँग्रेसला धन्यवाद दिले का...? नाही ना... पार्थच्या या धोरणी आणि दूरदृष्टीच्या राजकारणाबद्दल तुम्ही त्याचे जाहीर अभिनंदन करायला हवे. उलट तुम्ही काँग्रेसला धन्यवाद देऊन मोकळे झाला. पुढे चालून काँग्रेसमध्ये जायचा तर विचार नाही ना..?

तुम्ही असे वागता आणि तिकडे तुमचे मोठे साहेब आणि आमच्या पार्थचे आजोबा वेगळेच काहीतरी बोलतात. हातात चॅनलचे बूम घेऊन अमुक नेत्याने असे विधान केले आहे, त्यावर तुमचे काय मत आहे, असे तमुक नेत्याला विचारणाऱ्यांनी थेट शरद पवार यांनाच पार्थच्या विधानावर प्रतिक्रिया विचारली, तेव्हा त्यांनीसुद्धा ‘पार्थ यांच्यात किती परिपक्वता आहे, हे मी आज सांगू शकत नाही,’ असे विधान केले. आपला नातू एवढी धडपड करत असताना, इतकी ठाम भूमिका घेत असताना, आजोबांनी तरी असे बोलण्याची गरज होती का? ‘पार्थ ज्या पक्षाचा सदस्य आहे, त्या पक्षाचे तुम्ही प्रदेशाध्यक्ष आहात. त्यामुळे आमच्या पक्षाच्या अंतर्गत विषयात अन्य पक्षाच्या नेत्यांनी बोलायची गरज नाही,’ असे तुम्ही सांगू शकला असतात. पण तुम्ही तसे काही म्हटल्याचे आमच्या ऐकिवात नाही. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर आपली अडचण होऊ नये, असे तर वाटले नाही ना तुम्हाला..?

आजच्या तरुण पिढीला पार्थची भाषाच आवडते आणि समजते. जुन्या नेत्यांना तुम्ही हीच भाषा आत्मसात करायला सांगा. त्यामुळे कोणाचा तरी एकाचा डाऊनफॉल नक्की होईल आणि पार्थचे शब्द खरे ठरतील. ते शब्द खरे ठरवण्यासाठी तरी तुम्ही तुमच्यासह पक्षातील सगळ्या नेत्यांना ‘पार्थचीच भाषा यापुढे अधिकृत भाषा मानली जाईल,’ असा आदेश काढा. बाकी तुम्ही कसे आहात? नॅपकिनवाले भरतशेठ काय म्हणतात... तुम्हीदेखील नॅपकिन आणले की नाही..? असो. - तुमचाच, बाबूराव

English
हिंदी सारांश
Web Title : Order: Parth's stance and language are the only official ones!

Web Summary : Atul Kulkarni questions Sunil Tatkare's silence on Parth Pawar's bold statements and political moves. He suggests Tatkare should embrace Parth's approach and declare it the party's official language, highlighting inter-family disagreements on the matter.
टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसparth pawarपार्थ पवारsunil tatkareसुनील तटकरे