शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
3
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
4
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
5
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
6
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
7
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
8
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
9
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
10
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
11
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
12
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
13
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
14
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
15
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
16
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
17
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
18
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
19
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
20
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी

किलोभर बटाटे १,९६५ रुपये! गाझा बेहाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 09:33 IST

Israel-Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धामुळे गाझा पट्टीतील हजारो, लाखो लोक भुकेनं अक्षरश: तडफडताहेत. जीवनावश्यक गोष्टी एकतर त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत, पोहोचल्या तर गरजूंना त्या मिळत नाहीत. मधल्या मध्ये हडप होतात आणि त्याच वस्तू नंतर प्रचंड महाग किमतीत विकल्या जातात.

बिस्किट म्हटलं की आजही लहान-मोठ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं. सकाळी चहा-कॉफीबरोबर अनेकांना बिस्किटंच हवी असतात. त्याशिवाय त्यांची सकाळ पूर्ण होत नाही. त्यातही भारतात तर ‘पार्ले-जी’ बिस्किटांचा फारच बोलबाला आहे. इतक्या वर्षांत ना त्यांचा स्वाद बदलला, ना किमतीत फारसा बदल झाला! लहान मुलांपासून ते कष्टकऱ्यांपर्यंत आजही चवीसाठी आणि भुकेसाठी अनेकांची या बिस्किटांना पसंती असते. या बिस्किटांच्या एका पुड्याची किंमतही आहे फक्त पाच रुपये! 

पाच रुपयांचा बिस्किटाचा हा पुडा गाझा पट्टीत किती रुपयांना मिळावा? इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धामुळे गाझा पट्टीतील हजारो, लाखो लोक भुकेनं अक्षरश: तडफडताहेत. जीवनावश्यक गोष्टी एकतर त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत, पोहोचल्या तर गरजूंना त्या मिळत नाहीत. मधल्या मध्ये हडप होतात आणि त्याच वस्तू नंतर प्रचंड महाग किमतीत विकल्या जातात.

गाझातील एका पालकानं सोशल मीडियावर नुकतीच टाकलेली एक पोस्ट सध्या प्रचंड व्हायरल होते आहे. त्यात म्हटलं आहे, महत्प्रयासांनी का होईना, माझ्या लाडक्या मुलीला; रऊफला अखेर पार्ले-जी बिस्किटांचा पुडा मिळाला! ती आणि मी, आम्ही दोघंही त्यामुळे प्रचंड खूश आहोत! फक्त या पुड्यांचा बॉक्स आम्हाला दीड युरोऐवजी २४ युरोला विकत घ्यावा लागला! म्हणजे त्यासाठी या पालकाला किती रुपये मोजावे लागले? जो बिस्किटचा पुडा आपल्याकडे पाच रुपयांना मिळतो, त्यासाठी त्याला चक्क जवळपास २४०० रुपये मोजावे लागले!

एका बिस्किटाच्या पुड्यासाठी गाझामध्ये तब्बल पाचशे पट जास्त रक्कम मोजावी लागल्याच्या या घटनेमुळे सगळीकडे आश्चर्य व्यक्त केलं जात असतानाच गाझातील लोकांच्या हलाखीची परिस्थितीही त्यामुळे अधिकच अधोरेखित झाली आहे. युद्धामुळे गाझा पट्टीतील लोक अक्षरश: दाण्या-दाण्याला मौताद झाले आहेत. रोजच्या रोज तिथे भूकबळी जाताहेत. विविध देशांतून तिथे मानवीय मदतही पाठवली जातेय; पण ती लोकांपर्यंत पोहोचते का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. २०२३पासूनच गाझा पट्टीत महागाई आकाशाला पाेहोचली आहे. प्रत्येक गोष्टीची कमतरता आहे. त्यामुळे ज्याच्याकडे जी वस्तू असेल, ती तो मनमानी किमतीला विकतो आहे. आत्ताही २ मार्च ते १९ मे पर्यंत पॅलेस्टिनी लोकांना संपूर्ण नाकाबंदीचा सामना करावा लागला. आंतरराष्ट्रीय मदत तर येत होती; पण, ती गाझा पट्टीतील लोकांपर्यंत पोहोचतच नव्हती. आंतरराष्ट्रीय दबावानंतर त्यातले काही ट्रक गाझात सोडण्यात आले. त्यांचीही मोठ्या प्रमाणात लुटालूट झाली.

गाझामध्ये राहणारे सर्जन डॉ. खालिद अलशवा यांचं म्हणणं आहे, हा प्रश्न जीवनावश्यक वस्तूंच्या निर्यातीचा किंवा त्यांच्यावरील टॅक्सचा नाही. कारण या वस्तू तर मुख्यत: येथे फुकटच येतात; पण, लगेच त्यांची लूटमार होते. गरजवंतांची संख्या लाखोंच्या घरात आणि वस्तू येतात हजारांच्या घरात, अशावेळी ‘बळी तोच कानपिळी’! ज्याच्या हातात या वस्तू पडतात, तो काळ्या बाजारात त्या विकतो!

काय असाव्यात या किमती?.. एक किलो साखर ४,९१४ रुपये, एक किलो गोडेतेल ४,१७७ रुपये, एक किलो बटाटे १,९६५ रुपये, एक किलो कांदे ४,४२३ रुपये आणि एक कप कॉफी १,८०० रुपये! 

टॅग्स :Israel-Hamas warइस्रायल - हमास युद्धInternationalआंतरराष्ट्रीय