शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

जनरेशन झेड बाजारहाट कसा करते, याची रंजक ‘सिक्रेट्स’

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 07:20 IST

भारतात निम्म्याच्या वर लोकसंख्या ३० वर्षांपेक्षा लहान आहे आणि चौदा ते अठ्ठावीस वर्षांचे जेन-झी या बाजारपेठेसाठी महत्त्वाचा ग्राहकवर्ग आहेत. 

राही श्रु. ग.सीनिअर रिसर्च फेलोजवाहरलाल नेहरू विद्यापीठ

स्विगी, झोमॅटो, मिंत्रा, ॲमेझॉन, ब्लिंकिट, झेप्टो… जेन झींचा बाजारहाट म्हटल्यावर मोबाइल ॲप्सवरून फटाफट ऑर्डर करणारी तरुण मुलंमुली डोळ्यासमोर येत असली तरी या ऑर्डर घरोघर पोचवणारे ‘डिलिव्हरी पार्टनर’सुद्धा बहुतेक वेळा जेन झीच आहेत. भारतात निम्म्याच्या वर लोकसंख्या ३० वर्षांपेक्षा लहान आहे आणि त्यामुळे आज १४ ते २८ वर्षांचे असलेले जेन-झी हे या बाजारपेठेसाठी महत्त्वाचा ग्राहकवर्ग आहेत.

जगभरात लोकसंख्येच्या सर्व गटांच्या स्वभावाचा, मूल्यांचा आणि वागणुकीचा अभ्यास बाजारपेठ मोठ्या उत्साहाने सातत्याने करत असते.  विशिष्ट वयोगटातल्या लोकांपर्यंत ग्राहक म्हणून कसं पोचायचं हे ठरवताना हा अभ्यास तत्त्वाचा ठरतो. त्या दृष्टीने उपभोक्ते म्हणून जेन झी कसे आहेत याचा अभ्यास सतत होतो. जेन झीमधले सर्वांत लहान सदस्य अजून शाळेत असले तरी या पिढीतले सर्वांत मोठे सदस्य आज महत्त्वाचे आर्थिक निर्णय घेत आहेत.

एकीकडे मोठ्या प्रमाणातली बेरोजगारी, अस्थिर नोकऱ्या आणि गरिबीला तोंड देणारी ही पिढी असली तरी  याच पिढीतला एक छोटा हिस्सा महागडे कपडे, टेक्नॉलॉजी आणि खाणंपिणं यांचा उपभोक्ता आहे. साधारणपणे खर्च करताना मालमत्ता, वस्तूंच्या मालकीपेक्षा ही पिढी ‘अनुभवां’ना अधिक प्राधान्य देते. प्रवास, पर्यटन, नाचगाण्याचे जलसे, थरारक खेळ, नवनवे खाद्यपदार्थ यावर खर्च करायला या पिढीला आवडतं. कर्जाचं ओझं ते शक्यतो टाळू पाहतात. पाश्चात्त्य जगात ‘जेन झी मालमत्ता खरेदी करायला तयार नाही, त्यामुळे अर्थव्यवस्थेचं नुकसान होतं आहे’, अशी तक्रार सुरू झालीय. गंमत म्हणजे पाश्चात्त्य जगात जेन-झीने दारू खरेदी करण्यात मोठी घट केल्यामुळे तिथल्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. अर्थात यातल्या प्रत्येक बदलाला अनेक सामाजिक आर्थिक पदर असतात. खरेदीच्या बाबतीत सोशल मीडिया हा जेन -झीच्या माहितीचा प्रमुख स्रोत आहे. मिळकत असलेले जेन-झी गुंतवणुकींबाबतचे निर्णय घेतानाही सोशल मीडिया आणि यू-ट्यूबचा सल्ला घेतात. जेन- झी एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक करतात.  ग्राहकांची मतं, बाजारात उपलब्ध असलेल्या इतर उत्पादनांसोबत तुलना आणि तज्ज्ञांचे सल्ले विचारात घेऊन जेन- झी खरेदी करतात. आयुष्यातल्या इतर निर्णयांप्रमाणेच खरेदीच्या बाबतीतही आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना ते आपल्यासोबत घेतात. 

‘ओरिजनल’, खरं, अस्सल आणि नवं शोधण्याचा त्यांना ध्यास असतो. त्याचवेळी परंपरांचाही हात त्यांनी घट्ट धरून ठेवला आहे. आकर्षक दृश्यप्रतिमा त्यांना खेचून घेतात. त्यांना महत्त्वाच्या वाटणाऱ्या सामाजिक समस्यांवर उत्तरं शोधण्यासाठी वेळ आणि पैसा खर्च करायला ते तयार असतात.

वरवर विरोधाभासी वाटणारे असे हे जेन-झीचे ग्राहक म्हणून गुणधर्म आहेत. चंगळवादाला मोकळं रान असणाऱ्या जगात वाढणारे जेन-झी नवउदार जगातल्या भांडवली बाजारपेठेचे उपभोक्तेही आहेत आणि बळीही. बहुसंख्य जेन-झीवर त्यांच्या मोबाइलच्या स्क्रीनवरून अखंड रंगीबेरंगी जाहिरातींचा मारा तर होत असतो; पण त्याला तोंड द्यायला हातात पुरेसे पैसे नसतात. स्क्रीनवर दिसणारं मोहवणारं, भ्रमित करणारं जग आणि वास्तवातले अभाव यांचा भागाकार शोकात्म असतो. या विषम ओढाताणीमध्ये जेन-झी बाजारपेठेत उभे आहेत, तिला घडवत आहेत आणि स्वतः घडत-बिघडत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Decoding Generation Z: How they shop and influence the market.

Web Summary : Gen Z prioritizes experiences over ownership, influenced by social media. They seek authenticity, value social causes, and invest via SIPs. Caught between consumerism and economic realities, they shape the market while being shaped by it.
टॅग्स :Shoppingखरेदी