शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

भारताच्या पुत्राचा पोर्तुगाल विजय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2019 16:53 IST

भारतीय वंशाचे पहिले युरोपियन पंतप्रधान झालेले आंतोनियो कॉश्ता यानी प्रचंड मतांनी पोर्तुगालमधली सार्वत्रिक निवडणूक जिंकली

- एड्गर वालीस

भारतीय वंशाचे पहिले युरोपियन पंतप्रधान झालेले आंतोनियो कॉश्ता यानी प्रचंड मतांनी पोर्तुगालमधली सार्वत्रिक निवडणूक जिंकली आहे. त्या देशात ६ ऑक्टोबर रोजी निवडणुका पार पडल्या.आंतोनियो कॉश्ता यांच्या समाजवादी पक्षाला ३६.६५ टक्के मते मिळाली. पक्षाचे १०६ उमेदवार राष्ट्रीय संसदेत निवडले गेले. कॉश्ता यांचे राजकीय प्रतिस्पर्धी गणले जाणारे रुई रियो यांच्या नेतृत्त्वाखालील सोशल डेमोक्रेटिक पक्षाला २७.९० टक्के मिळाली असून त्या पक्षाचे ७७ सदस्य संसदेत पोहोचले आहेत. असे असले तरी कॉश्ता याना संपूर्ण बहुमत मिळालेले नाही. त्यामुळे त्याना कम्युनिस्ट पक्ष आणि ब्लोको दी इस्केर्दा या डाव्या पक्षांच्या मतदीने  सरकार चालवावे लागेल. भारताप्रमाणेच पोर्तुगालमध्येही सरकार चालवताना संसदेचा बहुमताचा पाठिंबा असावा लागतो. कॉश्ता याना बहुमतासाठी आणखी दहा आमदारांची आवश्यकता होती. ती संख्या त्यांच्या पक्षाला स्वबळावर गाठता न आल्याने त्याना अन्य पक्षांची मदत घेऊनच सरकार चालवावे  लागणार आहे.विजयोत्सव साजरा करताना जनतेला उद्देशून केलेल्या भाषणात कॉश्ता यानी काही महत्त्वाच्या मुद्द्यांना स्पर्श केला आहे. ‘‘ पोर्तुगीज जनतेला माझे सरकार आणि आमची धोरणे आवडली आणि आपल्याला सक्षम समाजवादी पक्ष असल्याचे जनतेने निवडणुकीतून दाखवून दिलेय.’’ ‘‘लोकशाहीवादी पोर्तुगालमध्ये उजव्या विचारसरणीच्या पक्षांना दारूण पराभवाला सामोरे जावे लागलेय.’’ आणि, ‘‘मी नेहमीच सांगत आलोय, राजकीय स्थैर्य हे अनिवार्य असे मूल्य असते.’’काय आहे कॉश्ता यांच्या या विजयामागचे रहस्य? गेल्या चार वर्षांच्या कालावधीत पोर्तुगालले अन्य युरोपियन देशांच्या तुलनेत भरीव अशी आर्थिक प्रगती केली आहे. गुंतवणूक वाढलीय, निर्यात वाढलीय. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतली आपली वित्तीय पत त्या देशाने पुन्हा प्राप्त केली आहे. आता तो देश आपल्या देणेकऱ्याना ०.५ टक्के दराने व्याज देतो; चार वर्षांआधी त्याला ४ टक्के दराने व्याज द्यावे लागत असे. २०१५ साली बेरोजगारीचे प्रमाण १२.६ टक्के होते; आज ते ६.६ टक्क्यांवर आलंय. सरकारने वेतन कपात आणि पेन्शन कपातीचे सत्र आवरते घेतले आणि त्यामुळे राष्ट्रीय किमान वेतनाचा स्तर उंचावला. गरीब जनतेचे राहणीमान सुधारले आहे तसेच गरीब आणि श्रीमंतांमधली दरी अरूंद झालेली आहे. महत्त्वाचे म्हणजे देशाने गमावलेला आत्मविश्वास पुन्हा प्राप्त केला आहे.याच यशाच्या पार्श्वभूमीवर कॉश्ता यानी निवडणूकपूर्व प्रचारात आपल्या नेतृत्त्वाखाली देशाने केलेल्या भरीव प्रगतीलाच प्रचाराचा मुद्दा बनवले. २०१५ सालच्या पोर्तुगालपेक्षा आजचा पोर्तुगाल कसा सरस आहे हे त्यानी सांगितले. २०१५ साली सोशल डेमोक्रॅट पक्षाला स्वबळावर बहुमत प्राप्त करता आले नव्हते. परिणामी कॉश्ता यांच्याकडे पंतप्रधानपदाची जबाबदारी देण्यात आली होती. कॉश्ता आणि त्यांच्या समाजवादी पक्षाच्या विजयाला आणखी एक महत्त्वाची किनार आहे. डावे सरकार सत्तेवर असलेले युरोपात अवघेच देश आहेत. बहुतेक देशांत पुराणमतवादी पक्षांची सरकारे सत्तारूढ असून फाजील लोकानुनयाचे सत्र सर्वत्र जारी आहे. खुद्द पोर्तुगागलगद णदेूोलमध्ये ‘चेगा’ ( या शब्दाचा अर्थ: ‘आता बास्स’) या पक्षाचा एक सदस्य संसदेसाठी निवडला गेलाय.पोर्तुगाल प्रजासत्ताकाचे अध्यक्ष मार्सेलो रिबेलो डिसोझा यानी कॉश्ता यांची पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली असून आता ते आपले सरकार स्थापन करण्यात गुंतले आहेत.  आपण जुन्याच मंत्र्याना पुन्हा जबाबदारी देणार असून जनतेच्या हिताचेच निर्णय आपले सरकार घेईन अशी ग्वाही कॉश्ता यानी दिली आहे.  

टॅग्स :Portugalपोर्तुगालgoaगोवा