शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
5
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
6
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
7
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
8
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
9
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
10
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
11
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
12
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
13
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
14
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
15
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
16
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
17
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
18
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
19
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
20
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू

इंडिया आघाडीला एक नेता नव्हे, एक घोषणा हवीय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2024 11:10 IST

इंडिया आघाडीकडे एकमेवाद्वितीय असा नेता नाही, त्याचप्रमाणे जनसमुदायाला संमोहित करणारी घोषणाही त्यांच्याकडे नाही.

प्रभू चावला, ज्येष्ठ पत्रकार -

‘इंडिया’ आणि ‘भारत’ यांच्यातील दरी काही केवळ सांस्कृतिक किंवा सामाजिक स्वरूपाची नाही. शब्दबाजीने धुंद झालेल्या या ऱ्हासपर्वात वर्ग, जात, समुदाय आणि सद्सद्विवेक या साऱ्यांमधील एका राजकीय दरीही त्यातून सूचित होते. या दरीमुळे खुद्द इंडिया आघाडीतील तडेही अधिकच रुंदावले आहेत. गेल्याच आठवड्यात ते सारे अशा विभाजित अवस्थेतच आपल्याला दिसले.

पंतप्रधानपदाची महत्त्वाकांक्षा हाच त्यांच्यातील मुख्य तिढा बनला आहे. अभिजनवर्गीय राहुल गांधी विरुद्ध उर्वरित विरोधी पक्ष अशी ही रस्सीखेच चाललेली आहे. गेल्या आठवड्यात विरोधी पक्षांच्या नेत्यांची मांदियाळी दिल्ली येथे चौथ्यांदा एकत्र जमली. कशासाठी?..

उद्दिष्ट : २०२४ च्या निवडणुकीत भाजपचा सपशेल पराभव करून नरेंद्र मोदींना सिंहासनावरून पायउतार व्हायला भाग पाडणे.निष्पत्ती : अजिंक्य वाटणाऱ्या मोदींचा प्रतिस्पर्धी म्हणून कोणाचे नाव समोर आणायचे यावर कोणतेही एकमत होऊ शकले नाही.निर्णय : पुन्हा एकत्र भेटू.

ही बैठक म्हणजे मतभेदामागे दडलेल्या आकांक्षांचा देखणा शब्दोत्सव होता. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचा अपवाद वगळता नाव घ्यावे असा प्रत्येक महत्त्वाचा नेता व्यासपीठावर येऊन बोलता झाला. हे सारेच नेते नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या मानहानीकारक पराभवामुळे हादरून गेल्याचे त्यांच्या सुरातून स्पष्ट जाणवत होते. तथापि, विरोधकांच्या या रुबिक्स क्यूबमध्ये सुसंगत पंक्तिबद्धता मुळीच नाही. त्यात सारा रंगांधळेपणा भरलाय. काँग्रेसचा असा पराभव म्हणजे सहकारी पक्षांच्या दृष्टीने एक छुपे वरदानच ठरले. दणका बसल्यामुळे भानावर येऊन अगदी नवख्या, छोट्या पक्षांचे म्हणणे ऐकायला काँग्रेस पक्ष सिद्ध झाला. भाजपच्या खालोखाल देशातील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष हे आपले स्थान डळमळू नये म्हणून काही त्याग करण्याचीही काँग्रेसची मानसिक तयारी झाली. राष्ट्रीय निवडणुकीची धामधूम सुरू व्हायला आता जेमतेम दोन महिनेच उरलेले असले तरी मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपला पर्याय म्हणून विरोधी पक्षांनी अद्याप कोणतीही एकसंध आणि विश्वासार्ह अशी मांडणी सादर केलेली नाही. त्यांच्या या स्वभावसिद्ध संभ्रमावस्थेपायी आज अनेक प्रश्न आपल्यासमोर उभे ठाकले आहेत.

इंडिया आघाडी एनडीएपेक्षा बलाढ्य आहे का? इंडिया आघाडी बहुमत प्राप्त करू शकेल का? विरोधी पक्षांना एक नेता आवश्यक आहे का? -हे ते प्रश्न...

देशाच्या विविध भागांतील परिस्थिती डोळ्यासमोर आणा. इंडिया आघाडीकडे अधिक बळ नक्कीच आहे. परंतु काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत पसरलेले इंडिया आघाडीतील सुमारे दोन डझन पक्ष म्हणजे प्रामुख्याने जातीवर आधारित आणि विशिष्ट कुटुंबाकडून चालवल्या जात असलेल्या संघटना आहेत. उत्तर प्रदेश आणि बिहारमधील फुटकळ पक्ष सोडले तर भाजपने मात्र कोणताही महत्त्वाचा साथीदार जोडीला घ्यायचे टाळले आहे. काँग्रेस वगळता इंडिया आघाडीतले इतर सारे वीस-बावीस पक्ष मिळून देशभरात सव्वाशेहून अधिक जागा जिंकू शकत नाहीत हाच या आघाडीसमोरचा मुख्य पेच आहे. केवळ तृणमूल काँग्रेस, डीमके, शिवसेना (उद्धव ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि समाजवादी हेच पक्ष लोकसभेत दोन आकडी संख्या गाठू शकतात. भूमिका नव्हे तर सोय हाच इंडिया आघाडीतील सहसंबंधाचा मूलाधार आहे. 

इंडिया आघाडी बहुमत प्राप्त करणे कठीण आहे, पण अशक्य मुळीच नाही. हे घडायचे तर काँग्रेसला किमान १४० जागा जिंकाव्या लागतील. त्यासाठी त्यांना भाजपला उत्तरेकडे, आसामात आणि कर्नाटकातही पराभूत करावे लागेल. भाजपबरोबर किमान ४५० मतदारसंघात सरळ लढती होतील यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणे ही काँग्रेसची रणनीती आहे. इतर राज्यात काही अधिक जागा पदरात पाडून घेण्यासाठी काँग्रेसला उत्तरेकडील आपल्या काही जागा मित्रपक्षांसाठी सोडाव्या लागतील. 

विरोधी पक्षांना एक नेता हवा तर आहे, पण त्यांना तो याक्षणी मिळू शकत नाही. स्वत:ला पंतप्रधानपदाचे उमेदवार समजणारे अनेक नेते इंडिया आघाडीत आहेत. या आघाडीकडे एकमेवाद्वितीय असा नेता नाही, त्याचप्रमाणे जनसमुदायाला भुरळ पाडेल अशी एखादी संमोहित करणारी घोषणाही त्यांच्याकडे नाही. मोदी सरकारविरुद्ध प्रस्थापित सत्ताविरोधी अशी एखादी लहरही वातावरणात जाणवत नाही. अशा परिस्थितीत इंडिया आघाडीला एका जबरदस्त घोषणेची नितांत आवश्यकता आहे. वृत्तपत्रांच्या मथळ्यात मिरवेल आणि जनतेच्या मनामनात रुजेल अशी आकर्षक घोषणा! ‘मोदी की गॅरंटी’चा दणदणाट देशभर घुमतो आहे. राष्ट्रीय विकासाची हमी केवळ मोदीच देऊ शकतात हा संदेश ही घोषणा चहूबाजूंनी पसरवत आहे. इंडिया आघाडीला आपल्या घोषणेतून या दणदणाटाला तोंड देता आले पाहिजे.

इंडिया आघाडीतील एक घटक मल्लिकार्जुन खरगे या ८० वर्षीय योद्ध्याला मोदींविरुद्ध उभे करू पाहात आहे. कारण? - ते दक्षिण भारतीय तसेच दलित असून त्यांना प्रचंड राजकीय अनुभव आहे. शिवाय ममता आणि केजरीवाल यांच्याकडून आलेल्या या प्रस्तावामागे दुसरीही एक राजनीती होती. राहुल पंतप्रधानांच्या शर्यतीत नाही हे घोषित करणे काँग्रेसला भाग पाडावे असा त्यांचा व्यूह होता. आपल्याला पंतप्रधानपदाच्या चेहऱ्याची काही आवश्यकता नाही, पण कुणी गांधी त्या पदाच्या शर्यतीत नाही अशी घोषणा मात्र हवी असे इंडिया आघाडीतील काही साथीदारांना वाटते. भारत जोडो यात्रेने जे साध्य केलं ते आता नजरेआड गेलं आहे. राहुल आता भारत जोडो यात्रेचे दुसरे पर्व सुरू करत आहेत. इंडिया आघाडीचे सर्व नेते गांधी कुटुंबीयांची अपरिहार्य आवश्यकता पुरेपूर जाणून आहेत. तरीही त्यांना संयुक्त प्रचार मोहिमेत या कुटुंबाची भूमिका शक्य तितकी मर्यादित ठेवायची आहे. 

मोदींनी शहरी मध्यमवर्ग आणि महिलांवर मोहिनी टाकली आहे. इंडिया आघाडी त्यांच्यापुढे नेटके आव्हान उभे करू शकते. त्यासाठी त्यांनी मोदी या व्यक्तीवर केंद्रित केलेला झोत बाजूला ठेवून ‘रोटी, कपडा, मकान’ यावर भर दिला पाहिजे. मात्र ‘इंडिया’ आणि ‘भारत’ यांच्यातील दरी मिटवल्याशिवाय हे करता येणार नाही.

टॅग्स :INDIA Opposition Allianceइंडिया आघाडीcongressकाँग्रेसPoliticsराजकारणlok sabhaलोकसभाElectionनिवडणूक