शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
2
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
3
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
4
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
5
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
6
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
7
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
8
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
9
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
10
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
11
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
12
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
13
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
14
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
15
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!
16
भरधाव ट्रकमागे दुचाकीस्वाराचा थरार, जीवघेणा स्टंट पाहून तुमच्याही अंगावर येईल शहारा! VIDEO व्हायरल
17
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
18
सूर्य नक्षत्र परिवर्तन २०२५: २७ सप्टेंबरला सूर्य बदलणार नक्षत्र आणि 'या' ७ राशींचे भाग्य; बाकी राशींचे काय?
19
71st National Awards : 'श्यामची आई' ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, महाराष्ट्राची शान नऊवारी साडीत स्वीकारला पुरस्कार!
20
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...

Independence Day: ‘वो सुबह कभी तो आएगी’

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2020 05:08 IST

फैज अहमद फैज यांची प्रसिद्ध कविता ‘स्वातंत्र्याची पहाट’ ७३ वर्षांनंतरही आपले स्वातंत्र्याचे मूल्य जोखण्याचा संदेश देत असते.

- योगेंद्र यादव, अध्यक्ष, स्वराज इंडियाफैज अहमद फैज यांची प्रसिद्ध कविता ‘स्वातंत्र्याची पहाट’ ७३ वर्षांनंतरही आपले स्वातंत्र्याचे मूल्य जोखण्याचा संदेश देत असते. ब्रिटिश राजवट संपल्यानंतर ते म्हणाले होते,‘ये दाग-दाग उजालायह शब गजीदा सहरवो इंतजार था जिसकाये वो सहर तो नहीं’तेव्हा तर नाही पण आज तरी ती पहाट उगवली आहे जिची आम्हाला प्रतीक्षा होती? १५ आॅगस्ट रोजी ब्रिटिश राजवट गेली आणि देश स्वतंत्र झाला. परंतु जे लोक स्वातंत्र्याच्या या औपचारिक आनंदोत्सवात आनंदी होऊ शकणार नाहीत त्यांनी यंदाच्या स्वातंत्र्यदिनी या ९ प्रश्नांवर विचारमंथन अवश्य करावे.१. कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्यानंतर शेकडो किलोमीटर पायपीट करणाऱ्या कामगारांचे दृश्य भारतातच का बघायला मिळाले? स्वतंत्र देशातील स्वतंत्र नागरिकांचे हे चित्र होते का?२. मोठ्या भटक्या समाजाला असूचित करुन ७० वर्षे झाली तरी आजही हा समाज तिरस्कार, उपेक्षा, हिंसाचार आणि शोषणाच्या दंशातून मुक्त झाला आहे काय?३. ज्या तीन लाखावर शेतकऱ्यांनी आत्महत्या केली त्यांच्यापैकी कुणाच्या तरी घरी जा, त्यांच्या विधवा किंवा मुलांना विचारा, ‘स्वातंत्र्य म्हणजे काय?’ धाडस असेल तर भारत सरकारने कृषीबाबत जे तीन नवे अध्यादेश काढले ते वाचा आणि विचारा, खरेच शेतकरी स्वतंत्र झाला ?४. लैंगिक हिंसाचाराला बळी ठरलेल्या आणि पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार करण्याची हिंमत नसलेल्या त्या लाखो महिलांना विचारा स्वातंत्र्याचा अर्थ. महिलाच स्वतंत्र नाही मग देश कसा स्वतंत्र ?५. दलित वस्तीत भेट देवून पहा त्यांचा मानसिक छळ होतोय की नाही? याला स्वातंत्र्य म्हणायचे काय?६. या देशात सर्व धर्माच्या लोकांना समान स्वातंत्र्य आहे का?७. देशातील प्रत्येक नागरिकाला आपल्या जीवनाच्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्याची समान संधी उपलब्ध आहे काय? की ज्याच्या खिशात जेवढे जास्त पैसे तो तेवढा स्वतंत्र?८. नव्या शैक्षणिक धोरणाच्या निमित्ताने मातृभाषेवर झालेल्या चर्चेचेच बघा ना! इंग्रजी माध्यमांच्या शाळांऐवजी भारतीय भाषांमध्ये शिक्षणाच्या विचाराने पसरलेली दहशत बघा. इंग्रज तर निघून गेले पण इंग्रजीची गुलामीे संपली आहे काय?९. गेल्या काही वर्षात जेवढे मठ आणि बाबा आले ते बघता हे विचारायलाच हवे की आम्ही आपले आराध्य, आपल्या आत्म्याशी समरस होण्यास तरी स्वतंत्र आहोत काय?१५ आॅगस्टचा हा दिवस केवळ भूतकाळातील स्वातंत्र्य संग्रामाच्या धुसर आठवणी ताज्या करण्याचाच दिवस नाही. देशात एका नव्या स्वातंत्र्याच्या आंदोलनाचा हा प्रारंभ असला पाहिजे. तरच आम्ही सर्व मिळून साहिर लुधियानवींचे ते स्वप्न साकार करु शकू, ‘वो सुबह कभी तोे आएगी... ’

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिन