शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

Independence Day 2021: योग्य पाऊल उचललं अन् भारतानं झेप घेतली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2021 08:54 IST

Celebrating Happy Independence Day 2021: सुरुवातीच्या पहिल्या २०-२५ वर्षांमध्ये आपण या ठळक धोरणासंदर्भात विचारविनिमय करत त्या आणल्या आणि राबविल्याही. ही सगळी क्षेत्रे आपल्यासाठी नवीन होती तरीही पहिल्या २० वर्षात आपण प्राथमिक स्तरावर का असेना उत्तम काम केले.

- विनायक पात्रुडकर

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपण काय काय केले; तर सगळ्यात पहिल्यांदा १९४९ साली रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयीकरण केले. १९५० साली योजना आयोग, १९५१ साली आयआयटी खरगपुर आणि पहिली पंचवार्षिक योजना, १९५३ साली एअर इंडियाचे राष्ट्रीयकरण, १९५६ साली एलआयसी आणि १९६५ साली हरितक्रांती; आणि या सगळ्या नंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे १९६९ साली झालेले १४ बँकांचे राष्ट्रीयीकरण. सुरुवातीच्या पहिल्या २०-२५ वर्षांमध्ये आपण या ठळक धोरणासंदर्भात विचारविनिमय करत त्या आणल्या आणि राबविल्याही. ही सगळी क्षेत्रे आपल्यासाठी नवीन होती तरीही पहिल्या २० वर्षात आपण प्राथमिक स्तरावर का असेना उत्तम काम केले. यानंतर देशाने सर्वात मोठे पाऊल टाकले ते म्हणजे १९९१ साली; या काळात आपण आर्थिक उदारीकरण स्वीकारले. ही घटना आपल्यासाठी मैलाचा दगड ठरली. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी उचललेल्या या पावलामुळे आपण दूरदर्शी ठरलो. आर्थिक उदारीकरणाने देशाची कवाडं खुली झाली आणि अनेक पातळीवर देशाने आणि सोबतच देशवासीयांनी मोठी झेप घेतली आहे. 

टेलिकॉम रिव्होल्यूशनमाजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी आणलेल्या टेलिकॉम रिव्होल्यूशनमुळे डिजिटलायजेशन मोठ्या प्रमाणात होऊ लागले. सुरुवातीच्या काळात आपली प्रगती धीमी होती, असे म्हणणे योग्य नाही. कारण माहिती तंत्रज्ञानाचे युग १९९४ नंतर सुरू झाले. तेथूनच आपल्या खऱ्या प्रगतीची सुरुवात झाली. 

डिजिटल इंडियापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधार कार्ड आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा घेतलेला आधार महत्त्वाचा ठरत आहे. डिजिटल इंडिया कार्यक्रम देशाच्या प्रगतीला पूरक ठरला. 

स्टार्टअप इंडियागेल्या २० वर्षात आणखी एक महत्त्वाचे काम झाले ते म्हणजे स्टार्टअप. याला तंत्रज्ञानाची जोड मिळाली. त्यामुळे तरुणांकडून स्वयंरोजगार निर्माण झाला. आता सरकार या तरुणांना मोठ्या प्रमाणावर मदत करत आहे.     (संदर्भ सहकार्य : नितीन पाेतदार, काॅर्पाेरेट लाॅयर) 

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिन