शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
3
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
4
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
5
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
6
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
7
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
8
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
9
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
10
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
11
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
12
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
13
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
14
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
15
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
16
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
17
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
18
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
19
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
20
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!

फटाक्यांना ‘नाही’ म्हणत ‘फटाका’सुराचा वध केलाच पाहिजे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2023 07:38 IST

आपण जेव्हा फटाके फोडतो तेव्हा मोठ्या कष्टाने कमावलेला पैसा जाळत असतो. त्याचवेळी आपले आरोग्य, पर्यावरणाचेही आपण तीन तेरा वाजवत असतो!

डॉ. रवींद्र भुसारी, सामाजिक पर्यावरणवादी कार्यकर्ते

फटाके कारखान्यास आग.. बारा मृत्युमुखी.. फटाक्यांच्या दुकानाला आग.. पाच जखमी.. फटाक्यांमुळे भाजून जखमी.. फटाक्यांमुळे आग लागून लाखोंचे नुकसान.. अशा बातम्या दिवाळीच्या काळात आणि नंतर मोठ्या प्रमाणात वाचायला आणि ऐकायला मिळतात. तरीसुद्धा फटाके फोडून आम्ही विकृत आनंद व्यक्त करीत राहतो. पैसा जाळून आपण कसा आनंद व्यक्त करू शकतो? आनंद व्यक्त करण्याची ही कसली घातक आणि प्रदूषक रीत आपण शोधली आहे? 

आपण जेव्हा फटाके जाळतो तेव्हा कठोर कष्टाने कमावलेला पैसा जाळीत असतो. आजही आपल्या देशातील अनेक जण बेघर आहेत. अशी बेघर शहरे आणि गरिबांची लोकसंख्या सतत वाढते आहे. बेरोजगारीचा प्रश्न बिकट बनला आहे. महात्मा गांधी म्हणाले होते, आपल्याला माहीत असलेला सर्वात गरीब आठवा आणि त्याचा चेहरा नजरेसमोर आणा. नंतर आपण जी कृती करणार त्याने त्या गरीब माणसाला काय फायदा होणार आहे, याचा विचार करा. मग नक्कीच आपल्याला योग्य निर्णय घेण्यास मदत होईल.

फटाक्यांच्या ज्वलनामुळे हवेत मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. दमा, डोळे चुरचुरणे, आग होणे, श्वसन मार्गाचा दाह, घसा खाजणे, असे प्रदूषित वायूमुळे अनेक दुष्परिणाम होतात. प्रचंड आवाजामुळे अकाली बहिरेपणाकडे होणारी वाटचाल ठरू शकते. निद्रानाश, चिडचिडेपणा, डोकेदुखी, सततची सर्दी, खोकला यामुळे आम्ही आमचे आयुष्य कमी करतो. फटाक्यांच्या स्फोटांमुळे होणारी आवाजाची तीव्रता ११५ ते १२० डेसिबल्सपेक्षाही अधिक असते. साधारणतः ३० सेकंदांपेक्षा जास्त काळ एवढा मोठा आवाज कानावर पडल्यास कानांना तात्पुरती किंवा कायमची इजा होऊ शकते. अचानक मोठा फटाका खूप जवळ फुटल्यास कानांचे पडदे फाटण्याचीही शक्यता असते.

ध्वनिप्रदूषण नियमानुसार तसेच पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार निवासी भागात दिवसा ५५ डेसिबल्स तर रात्री ४५ डेसिबल्सपर्यंत आवाज मर्यादा आहे. त्यापेक्षा दहा डेसिबल्स  इतका आवाज जास्त झाला तरी पोलिसांना स्वतःहून कारवाई करण्याचे अधिकार आहेत. मोठा आवाज करणाऱ्या फटाक्यांवर पूर्ण बंदी घालण्यात आलेली आहे. फटाके उडविणे किंवा फोडणे त्यामुळे वायू आणि ध्वनिप्रदूषण दोन्ही होत असल्याने हा आरोग्यासाठी अधिक धोकादायक प्रकार आहे. दिवाळी या प्रकाशाच्या सणाला आम्ही आवाजाच्या गोंगाटाचे स्वरूप दिले, ते बदलायला हवे.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ दिवाळीच्या काळात होणाऱ्या ध्वनिप्रदूषण पातळीचा अहवाल तयार करीत असतात. दरवर्षी दिवाळीच्या काळात ध्वनिप्रदूषण पातळी दुपटीने वाढते. फटाक्यांच्या कारखान्यांमध्ये काम करणारी लहान मुले, बालमजूर..यांचे चेहरे आपल्या डोळ्यासमोर आणले तर, फटाके उडवून आम्ही विकृत आनंद घेतो, हे सहज लक्षात येईल. आपण जेव्हा दिवाळीत फटाके उडवीत असतो तेव्हा फटाक्यांमध्ये बारुद भरणारे हात कुठेतरी मृत्यूशी झगडत असतात. दवाखान्यांमध्ये मरणासन्न अवस्थेत झुंजत असतात. 

दिवाळीच्या वेळी सर्वांना सुटी असते. परगावी शिकायला आणि नोकरी निमित्ताने बाहेर असणारे कुटुंबातील सदस्य घरी येतात; पण नेमके अशाच वेळी आम्ही फटाक्यांचे कर्णकर्कश दणादण आवाज आणि हवेचे प्रदूषण करतो. मुलांना फटाके फोडण्यात आनंद मिळतो, असं कारण अनेक जण सांगतात. परंतु त्यांना फटाक्यांच्या दुष्परिणामांबद्दल आम्ही एकदा तरी समजावून सांगतो का? मंगलतेबरोबर दंगल आणि गोंगाट चुकीचा आहे. माणुसकीशी आणि निसर्गाशी नाते जोडायचे असेल तर, फटाक्यांना ‘नाही’ म्हणावेच लागेल. आता फटाकासुराचा वध झालाच पाहिजे. तेव्हाच आम्ही सात्विक आनंदाचे जीवन जगू शकतो.

 

टॅग्स :environmentपर्यावरणHealthआरोग्य