शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

प्रतिमा भंजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 21:31 IST

काळाची पावले ओळखत धुळे बदलत गेले. भौगोलिक लाभ होऊन दळणवळणाचे मोठे माध्यम ठरलेले तब्बल ७ राष्टÑीय महामार्ग कार्यरत आहेत. दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडोरच्या दुसऱ्या टप्प्यात समावेश असल्याने औद्योगिक क्षेत्राचे चित्र आशादायी आहे.

मिलींद कुलकर्णीखान्देशातील धुळे हे शहर सांस्कृतिक, साहित्यिक, पुरोगामी, औद्योगिक विकासाकडे वाटचाल करणारे शहर म्हणून लौकिकप्राप्त आहे. मु.ब.शहा, मुकुंद धाराशिवकर, पुरुषोत्तम पाटील, अनिल सोनार, कॉ.शरद पाटील, झेड.बी.पाटील, पी.डी.दलाल, डॉ.एन.के.ठाकरे यांच्यासारख्या विविध क्षेत्रात कार्यरत अनेक व्यक्ती, श्री समर्थ वाग्देवता मंदीर, राजवाडे संशोधन मंडळ, गरुड वाचनालय, जयहिंद शिक्षण संस्था, कमलाबाई विद्यालय यासारख्या अनेक संस्था, सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष, नर्मदा बचाव आंदोलन, अंधश्रध्दा निर्मूलन समिती या पुरोगामी चळवळींना मिळालेले जनसमर्थन हे सगळे धुळ्याचे वैभव आहे. काळाची पावले ओळखत धुळे बदलत गेले. भौगोलिक लाभ होऊन दळणवळणाचे मोठे माध्यम ठरलेले तब्बल ७ राष्टÑीय महामार्ग कार्यरत आहेत. दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडोरच्या दुसऱ्या टप्प्यात समावेश असल्याने औद्योगिक क्षेत्राचे चित्र आशादायी आहे. मनमाड-इंदूर रेल्वे मार्गाच्या कामाला मिळालेली चालना उत्साहवर्धक आहे. या आशादायी वातावरणात भूतकाळात घडलेले भास्कर वाघ प्रकरण, तेलगी प्रकरण विस्मृतीत जात असताना पुन्हा धुळ्याला कुणाची तरी दृष्ट लागली आहे. ११ महिन्यांमध्ये खुनाच्या तब्बल ६ घटना घडल्या. पारोळा रस्त्यासारख्या गजबजलेल्या ठिकाणी सकाळी हॉटेलमध्ये १५-२० लोक येऊन शस्त्रांचा बेछूट वापर करीत खून करुन पळून जातात. देवपूरसारख्या भागात सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास ७-८ लोक शस्त्र घेऊन बाप-बेट्याचा निर्दयी खून करतात. कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देणा-या या घटना आहेत. नाशिकचे विशेष पोलीस महानिरीक्षक असलेल्या विनयकुमार चौबे यांनी गेल्या महिन्यात अवैध शस्त्र आणि गुंडांविरुध्द मोहीम राबविण्याचे आदेश दिल्याने खान्देशात सर्वत्र मोठा शस्त्रसाठा जप्त झाला. तडीपार गुंडांना अटक करण्यात आली. याचा अर्थ बिनबोभाटपणे अवैध व्यवसाय सुरु होते. चौबे यांनी लक्ष दिले नसते, तर ते सुरुच राहिले असते. ही मोहीम राबविल्यानंतरही खून होतो, या गुन्हयात तलवारी, कुकरी, चाकू अशा शस्त्रांचा वापर होतो. त्यातून या मोहिमेच्या यशाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण होते. जिल्हा परिषदेच्या आवारातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना, महामार्ग चौपदरीकरणाचे काम करणा-या ठेकेदार कंपनीच्या व्यवस्थापकाला घरात घुसून मारहाण या घटना पोलीस दलाच्या क्षमतेविषयी शंका उपस्थित करणाºया आहेत. वर्षाखेर होणाºया जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकांवर डोळा ठेवून तर वातावरण दूषित केले जात नाही ना, अशी शंका घेण्याला वाव आहे. सत्ताधारी आमदार मुख्यमंत्र्यांकडील गृहखात्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी कृती, महिलांना स्वसंरक्षणार्थ काठ्या वाटप करतात, त्यात सारे आले असेच म्हणावे लागेल.

टॅग्स :DhuleधुळेCrimeगुन्हा