शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

तुमचाही डीपफेक व्हिडीओ व्हायरल झाला तर....?, कशी काळजी घ्यायची, जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2023 07:48 IST

कृत्रिम बुद्धिमत्ता, प्रोग्रामिंग अल्गोरिदमचा वापर करत डीपफेक प्रणालीमध्ये एखाद्या व्यक्तीचे असंख्य फोटो, व्हिडिओ अपलोड केले जातात.

-ऋषिराज तायडे

मुद्द्याची गोष्ट : सोशल मीडियावर तुम्हाला अचानक तुमचीच आक्षेपार्ह चित्रफीत व्हायरल झाल्याचे दिसले तर... एवढेच नव्हे, तर त्या माध्यमातून तुम्हाला खंडणी मागण्याचा प्रयत्न झाला तर... सध्या चर्चेत असलेल्या डीपफेक तंत्रज्ञानाचा त्यासाठीच सर्रास वापर केला जात आहे. अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या नावाने नुकताच व्हायरल झालेला व्हिडीओही त्याचाच प्रकार होता. जाणून घेऊ या. काय असतो हा प्रकार...

कृत्रिम बुद्धिमत्ता, प्रोग्रामिंग अल्गोरिदमचा वापर करत डीपफेक प्रणालीमध्ये एखाद्या व्यक्तीचे असंख्य फोटो, व्हिडिओ अपलोड केले जातात. त्यावर प्रोसेसिंग केल्यानंतर ते दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरावर जोडले जातात. या तंत्रज्ञानाची किमया इतकी खास आहे, की संबंधित व्यक्तीच्या चेहऱ्यावरील हावभाव, त्वचेचा रंग, चेहऱ्यावरील डाग किंवा सुरकुत्या, एवढेच नव्हे बोलताना चेहऱ्याची होणारी हालचाल अगदी हुबेहूब तयार केली जाते. आतापर्यंत केवळ चेहऱ्याची केलेली अदलाबदल ही सहजपणे लक्षात येत होती; मात्र डीपफेक तंत्रज्ञानामुळे चेहरा तर सहजपणे बदलला जातोच, पण त्याच्या शरीराच्या आकृतीतदेखील बदल केला जातो आणि ते सहजासहजी ओळखताही येत नाही.

किती आहे धोका? 

डीपफेक तंत्रज्ञानाचा सर्वाधिक धोका आहे तो कायदा, माध्यम व राजकीय क्षेत्राला. एखाद्या खटल्यात पक्षकारांकडून पुरावा म्हणून सादर केलेले व्हिडीओ डीपफेकद्वारे तयार केल्यास थेट न्यायव्यवस्थेचीच फसवणूक केली  जाऊ शकते.राजकीय नेते तर या तंत्रज्ञानाला सहज बळी पडू शकतात, कारण त्यांची अनेक भाषणे, छायाचित्रे इंटरनेटवर सहज उपलब्ध आहेत. त्याचाच वापर करून एखाद्या नेत्याची उणी-दुणी काढायची असल्यास त्याचा बनावट व्हिडिओ सहजपणे बनवता येतो. सध्या मर्यादित लोकांच्या हाती असलेले हे तंत्रज्ञान जर सर्वसामान्यांच्या हाती लागले तर काय होईल? जेवढी ऊर्जा हे तंत्रज्ञान तयार करायला खर्ची घातली, तेवढीच ऊर्जा डीपफेक तंत्राने तयार केलेल्या चित्रफीत ओळखण्यासाठी लागणार आहे. त्यामुळे याचा गैरवापर अधिक झाल्यास धोका अधिक आहे.

स्वतः कशी काळजी घ्याल? सोशल मीडियावर खासगी फोटो-व्हिडीओ शेअर करू नये.सोशल मीडिया अकाऊंटचा पासवर्ड सुरक्षित ठेवणे.सुरक्षित अँटिव्हायरसचा वापर करणे.फोटो व व्हिडीओला वॉटरमार्क करणे.

कसा ओळखणार डीपफेक व्हिडीओ?

व्हिडीओत चेहऱ्याचे हावभाव व आवाजात गडबड असणेव्यक्तीचा आवाज आणि त्याच्या लिपसिंकमध्ये गोंधळव्हिडीओमध्ये वारंवार पॉज आणि डिस्टर्बन्स दिसतो.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल