शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

२०१९ ची गाडी सुटली तर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 00:27 IST

संघटनेच्या बळावर निवडणुका जिंकण्याचे टायमिंग साधणाऱ्या नागपुरातील भाजप कार्यकर्त्यांची गुरुवारी मुंबईची गाडी सुटली. नियोजित वेळेच्या आधी गाडी सोडण्याचा स्मार्टपणा रेल्वेने दाखविल्याने केवळ २४ कार्यकर्त्यांना घेऊन भाजपाच्या स्थापना दिनाचा सोहळा गाठण्यासाठी स्पेशल गाडी मुंबईकडे रवाना झाली.

संघटनेच्या बळावर निवडणुका जिंकण्याचे टायमिंग साधणाऱ्या नागपुरातील भाजप कार्यकर्त्यांची गुरुवारी मुंबईची गाडी सुटली. नियोजित वेळेच्या आधी गाडी सोडण्याचा स्मार्टपणा रेल्वेने दाखविल्याने केवळ २४ कार्यकर्त्यांना घेऊन भाजपाच्या स्थापना दिनाचा सोहळा गाठण्यासाठी स्पेशल गाडी मुंबईकडे रवाना झाली. मात्र पक्षाच्या स्थापना दिनी नागपुरातून केवळ २४ कार्यकर्तेच मुंबईला गेल्याची नोंद झाली तर,पक्षश्रेष्ठींना काय मॅसेज जाईल? अशी चर्चा नागपुरातील रेल्वेस्थानकावर रंगली. याचवेळी रेल्वेस्थानकावर उपस्थित असलेल्या दीड हजारांहून अधिक भाजपा कार्यकर्त्यांनी ‘स्वच्छ भारत मिशन’ला सुरुंग लावत गाडी नियोजित वेळेच्या आधी सोडणाºया रेल्वे अधिका-यांना निलंबित करण्याची मागणी केली. मुळात मुंबईसाठी नागपुरातून जाणा-या स्पेशल गाडीचे बुकिंग हे मुंबईतूनच करण्यात आले होते. यात नागपूर रेल्वे स्थानकावरून गाडी सुटण्याची वेळ ८.१५ अशी नमूद करण्यात आली होती. मात्र असे असतानाही स्थानिक भाजप कार्यकर्त्यांना पक्षाने रेल्वे स्थानकावर १० वाजता येण्याची वेळ दिली होती. त्यामुळे ‘टायमिंग’ रेल्वेचे चुकले की भाजपचे यावर सध्या खल सुरू आहे. हा विषय केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्यापर्यंत पोहोचविण्याचा संकल्प नागपुरातील पक्ष कार्यकर्त्यांनी केला आहे. पहिल्या स्पेशल गाडीचे टायमिंग चुकल्यानंतर स्थानिक कार्यकर्त्यांना घेऊन दुसरी गाडी गुरुवारी दुपारी ३.२४ वाजता नागपूर रेल्वेस्थानकावरून मुंबईकडे रवाना झाली. मात्र ती गुजरातमार्गे मुंबईला पोहोचल्याने शुक्रवारी नव्या वादाला रेल्वे प्रशासनाला तोंड द्यावे लागले. संघाच्या शिस्तीत वावरणाºया नागपुरातील भाजप कार्यकर्त्यांचा स्थापना दिनाचा सोहळा गाठण्याचे टायमिंग चुकविणाºया रेल्वे प्रशासनाला हे निश्चितच महागात पडेल! मात्र रेल्वेने ८.१५ वाजताची वेळ दिली असताना कार्यकर्त्यांना १० वाजता रेल्वे स्थानकावर येण्यास सांगण्याचा स्मार्टपणा कुणी दाखविला? कार्यकर्त्यांचे ‘टायमिंग’ कुणी चुकविले यावर शिस्तप्रिय भाजपात निश्चितच मंथन होईल. मात्र भाजप कार्यकर्त्यांची गाडी चुकल्याने आणि ती गुजरातमार्गे मुंबईला पोहोचल्याने विरोधकांच्या मनात निश्चितच गुदगुल्या झाल्या असाव्या. २०१९ मध्ये भाजपची गाडी अशीच सुटेल, असे मॅसेज सोशल मीडियावर व्हायरल झाले. अ‍ॅट्रॉसिटी, महागाई, बेरोजगारी आणि जातीय दंगलीवर देशभरात वादंग सुरू आहे. मात्र भाजपाचे यावर मौन आहे. त्यामुळे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ३५० जागांचा पल्ला गाठण्यासाठी भाजपाला संघाने सुचविलेल्या ‘सामाजिक समरसता एक्स्प्रेस’मधून प्रवास करणे गरजेचे आहे. अन्यथा नागपुरातील घटनेचा प्रत्यय भाजपाला २०१९ मध्ये येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :BJPभाजपाBJP rally in Mumbaiभाजपाचा महामेळावा 2018Politicsराजकारण