शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
3
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
4
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
5
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
6
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
7
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
8
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
9
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
10
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
11
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
12
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
13
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
14
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
15
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
16
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
17
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
18
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
19
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
20
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
Daily Top 2Weekly Top 5

एक विमान पाडले म्हणून दचकायचे कारण नाही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2019 17:34 IST

भारतीय हवाई दलाच्या कारवाईनंतर पाकिस्तानचा प्रतिहल्ला

- प्रशांत दीक्षित

भारत व पाकिस्तान यांच्यातील नियंत्रण रेषेवर दोन्ही देशांतील वायूदलांमध्ये बुधवारी सकाळी हवाई चकमक झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे. भारताने याला पुष्टी दिली. त्याआधी भारतीय वैमानिकाला पकडल्याचे पाकिस्तानने जाहीर केले आहे.आजच्या चकमकीत भारताने एक मिग-21 विमान गमावले आहे व आपला एक वैमानिक पाकच्या ताब्यात आहे. हे जुने विमान आहे. हवाई हल्ल्यामध्ये वापरलेले विमान नाही. पाकिस्ताननेही एक विमान गमावल्याचे भारताच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. हे विमान पाकिस्तानच्या हद्दीत कोसळले. हे एफ-16 नावाचे अत्याधुनिक विमान आहे असे म्हणतात. पाकिस्तानने याला पुष्टी दिलेली नाही.अशा चकमकी यापुढे होत राहणार व त्यामध्ये थोडेबहुत नुकसान होणार हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे. वायूदलातील तज्ज्ञांच्या मते भारताची सतर्कता व ताकद अजमावून पाहण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न असावा. दोन विमाने भारतीय हद्दीत मुद्दाम घुसवून भारत काय करतो हे पाकिस्तानी वायूदलाने तपासून पाहिले.या पाकिस्तानी विमानांना भारतीय वायूदलाच्या मिराज विमानांनी अटकाव केला असावा आणि त्यानंतर पाक विमानांचा पाठलाग केला असावा. असा पाठलाग करायला लावून शत्रूराष्ट्राच्या विमानांना स्वतःच्या देशात आणून त्या विमानावर अन्य विमानांतून वा जमिनीवरून मारा करून पाडण्याचे डावपेच नेहमी खेळले जातात. पूर्वी हा प्रकार अधिक होत असे. मात्र आता अत्याधुनिक रडार यंत्रणा असल्याने असे पाठलाग कमी झाले आहेत.माजी हवाई दल प्रमुख कृष्णस्वामी यांच्या मते आजची चकमक हा पाठलागाचाच प्रकार असावा. भारताचे मिग आणि पाकिस्तानचे एफ १६ यांच्यात पाठलाग चालू असताना हवाई चकमक झाली असावी. चकमक सुरू असताना दोन्ही विमाने पाक हद्दीत गेली किंवा भारतीय विमानाला पाकिस्तानी एफ-१६ने सफाईने पाक हद्दीत ओढून घेतले. या चकमकीत ही दोन्ही विमाने कोसळली व भारताचा वैमानिक पाकिस्तानच्या कैदेत गेला. पाकिस्तानच्या कोसळलेल्या विमानातील वैमानिकाचे काय झाले हे अद्याप कळलेले नाही.कुमारस्वामी यांनी दिलेल्या माहितीनुसार १९६५ व १९७१च्या युद्धात असे पाठलाग अनेकदा केले गेले. पाकिस्तानच्या विमानांना भारतीय हद्दीत खेचून आणण्यासाठी पाकच्या प्रदेशात खोलवर मुसंडी मारली जात असे. भारतीय विमाने तेथे घुसताच पाकिस्तानची विमाने हवेत झेपावत. मग त्यांना चकवत भारतीय विमाने भारताच्या हद्दीकडे येत. त्या पाठलागात पाकिस्तानी विमाने अनेकदा भारतीय हद्दीत घुसत. मग त्यांच्यावर जमिनीवरील तोफांतून प्रखर मारा करण्यात येई. हाच प्रकार पाकिस्तानी वायूदलही करीत असे.यातील मुख्य भाग म्हणजे असे प्रकार यापुढे सुरू राहतील. हवाई चकमकीत भारताचा एक वैमानिक हाती आल्यामुळे पाकिस्तानच्या लष्कराला हायेसे वाटले असेल. तेथील जनतेमधील रोष कमी होण्यास यामुळे थोडी मदत होईल. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष वेधून घेण्यास व भारताविरुद्ध कांगावा करण्यास पाकिस्तानला बळ येईल. पाकिस्तानला तेच करायचे आहे, कारण युद्ध करण्याइतका पैसा सध्या पाकिस्तानजवळ नाही. म्हणून या चकमकीनंतर इम्रान खान यांनी लगेच चर्चा करण्याची तयारी दर्शविली.अशा चकमकीमधील विमानाचे कोसळणे वा वैमानिक शत्रूच्या हाती लागणे या गोष्टी युद्धमान परिस्थितीत नेहमी होतात हे जनतेने लक्षात घेतले पाहिजे. पाकिस्तानचे लष्करही सक्षम व अतिशय व्यावसायिक आहे. तसेच ते धर्मांध असल्यामुळे कोणत्याही थराला जाण्याची लष्कराची तयारी असते. भारताचे तसे नाही. कोणताही प्रतिहल्ला न करता पाकिस्तान शरण येईल असे समजणे वेडेपणाचे होईल.भारताने केलेल्या दाव्यानुसार खरोखर पाकिस्तानचे विमान पाडले गेले असेल, ते एफ १६ सारखे अत्याधुनिक असेल आणि भारताच्या मिग २१सारख्या जुन्या विमानाने ही कामगिरी केली असेल तर तीही भारतासाठी अभिमानाची बाब आहे. आपले सैन्यदल सक्षम व सतर्क असल्याचा हा पुरावा ठरेल. 

टॅग्स :indian air forceभारतीय हवाई दलIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकPakistanपाकिस्तानImran Khanइम्रान खानsurgical strikeसर्जिकल स्ट्राइक