शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

पुरावे न सापडणे लाजिरवाणे

By admin | Updated: August 21, 2016 00:20 IST

एन. डी. पाटील : निर्भय मॉर्निंग वॉक; शहीद पानसरे संघर्ष समितीतर्फे आयोजन

कोल्हापूर : डॉ. नरेंद्र दाभोलकर, ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे, डॉ. एम. एम. कलबुर्गी यांच्या खुन्यांना न्यायालयात आरोपी म्हणून उभे करण्याएवढे पुरावे सरकारला गोळा करता आले नाहीत, ही लाजिरवाणी गोष्ट आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी शनिवारी निषेध व्यक्त केला. शहीद गोविंद पानसरे समता संघर्ष समितीतर्फे ‘हिंसा के खिलाफ, मानवता की ओर’ या अभियानांतर्गत ‘निर्भय मॉर्निंग वॉक’ झाला. यावेळी डॉ. पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी प्रा. डॉ. मेघा पानसरे, माजी प्राचार्य टी. एस. पाटील, दलितमित्र व्यंकाप्पा भोसले, दिलीप पवार यांच्यासह विविध स्तरांतील मान्यवर उपस्थित होते. डॉ. पाटील म्हणाले, अन्यायी व्यवस्था बदलण्यासाठी हयात खर्च केलेल्या विचारवंतांच्या हत्येच्या तपासाबाबत सरकारमध्ये उदासीनता दिसून येते. उच्च न्यायालयाने आदेश देऊनही तपास गंभीरपणे होताना दिसत नाही. अधिकाऱ्यांच्या विनाकारण बदल्या केल्या जातात. जनतेचा व्यापक लढा उभारून सरकारला जागे करण्यासाठी मॉर्निंग वॉक होत आहे. सविनय कायदेभंगाची किंमत सरकारला कळत नसेल तर हे लोकशाहीला घातक आहे. विचारवंतांच्या हत्या होऊन आता बराच कालावधी होत आला तरी तपास यंत्रणेला या हत्येमागील सूत्रधारांपर्यंत पोहोचण्यात यश आलेले नाही. सर्वसामान्यांसाठी बलिदान देणाऱ्या विचारवंतांना न्याय मिळत नसेल तर सर्वसामान्यांना न्याय कसा काय मिळत असेल? असा प्रश्न डॉ. पाटील यांनी उपस्थित केला.सकाळी सात वाजता केशवराव भोसले नाट्यगृह येथून ‘मॉर्निंग वॉक’ला सुरुवात झाली. चळवळीतील गाणी म्हणत व ‘शहीद गोविंद पानसरे अमर रहे’, ‘लडेंगे जितेंगे,’ ‘भारतीय संविधानाचा विजय असो’च्या घोषणा देत मंगळवार पेठ, देवणे गल्ली, तस्ते गल्ली, कोष्टी गल्ली, मंडलिक गल्ली, राम गल्ली, शाहू बॅँक, नंगीवली चौक, पाण्याचा खजिना, लाड चौक, बजापराव माने तालीम, सणगर तालीम, पोतनीस बोळ, मिरजकर तिकटी या मार्गावरून काढण्यात आलेल्या रॅलीचा समारोप केशवराव भोसले नाट्यगृहाच्या प्रवेशद्वारात करण्यात आला.यावेळी रणजित कांबळे यांनी ‘फक्त कामगार सेना होती आमच्या पाठीशी’ हा पोवाडा सादर केला. या फेरीत तनुजा शिपूरकर, उमेश सूर्यवंशी, कृष्णात कोरे, अभिषेक मिठारी, स्वाती कोरे, अरुण पाटील, सीमा पाटील, एम. बी. पडवळे, कपिल मुळे, संघसेन जगतकर, रमेश वडणगेकर, दत्ता पाटील, निशांत शिंदे, अनिल पाटील, गौतम कांबळे, बिजली कांबळे, सुभाष वाणी, एस. बी. पाटील, उमेश पानसरे, निहाल शिपूरकर, आदी मान्यवर सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)