शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

टायगर कॅपिटलमधील मानव-वन्यप्राणी संघर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 02:26 IST

गेल्या वर्षभरात ७ वाघ आणि सुमारे १२ विबट्यांचा मृत्यू शेतातील कुंपणात सोडलेल्या वीज प्रवाहामुळे झाल्याची धक्कादायक नोंद वन खात्याच्या लेखी आहे. जंगलालगत मानवाचे वास्तव्य धोक्याचे आहेच

गेल्या वर्षभरात ७ वाघ आणि सुमारे १२ विबट्यांचा मृत्यू शेतातील कुंपणात सोडलेल्या वीज प्रवाहामुळे झाल्याची धक्कादायक नोंद वन खात्याच्या लेखी आहे. जंगलालगत मानवाचे वास्तव्य धोक्याचे आहेच; पण वन्यप्राणीदेखील गावाच्या दिशेने कूच करू लागल्याने हा संघर्ष आता पुन्हा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.जेवणाच्या ताटावरून शिर्शी गावातील चिमुकल्या खुशीला एका वन्यप्राण्याने उचलून नेले. खुशीच्या रक्ताने माखलेल्या कपड्यांशिवाय काहीही हाती न आल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील नागरिक प्रंचड दहशतीत वावरत आहेत. तर परवा चिमूर वन परिक्षेत्रालगत एका शेतात अर्धवट जळालेल्या स्थितीत आढळून आलेला पट्टेदार वाघाचा मृतदेह टायगर कॅपिटल म्हणून ओळख असलेल्या विदर्भात मानव- वन्यप्राणी संघर्षाची भयावहता अधोरेखित करणारा आहे. गेल्या वर्षभरात ७ वाघ आणि सुमारे १२ विबट्यांचा मृत्यू शेतातील कुंपणात सोडलेल्या वीज प्रवाहामुळे झाल्याची धक्कादायक नोंद वन खात्याच्या लेखी आहे. जंगलालगत मानवाचे वास्तव्य धोक्याचे आहेच; पण वन्यप्राणीदेखील गावाच्या दिशेने कूच करू लागल्याने हा संघर्ष आता पुन्हा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. सर्वाधिक वनक्षेत्र असलेल्या विदर्भात वाघाचे हल्ले वाढले आहेत. माणसं मरत आहेत तर शेतातील कुंपण त्याच वाघाच्या जीवावर उठले आहे. हल्ली शिकारीच्या घटनांवर आळा घालण्यास वन खात्याला बºयापैकी यश आले असले तरी शेतातील वीज प्रवाहामुळे वन्यजीवांचा मृत्यू मात्र चिंतेची बाब आहे. आधीच अस्मानी आणि सुल्तानी संकटात भरडल्या जाणाºया शेतकºयाला हाती आलेले पीक वाचवायचे कसे, हा प्रश्न सतावत आहे. त्यामुळे पीक वाचविण्यासाठी वीज प्रवाही कुंपणाचा आधार घेण्यापलीकडे पर्याय उरत नाही. अर्थात वीज प्रवाही कुंपणाचे समर्थन कदापि करता येणार नाही. वीजप्रवाह सोडणे हे बेकायदेशीर कृत्य आहे. मात्र पीक वाचविण्याचा दुसरा मार्ग कोणता, या प्रश्नाचे उत्तर वनखात्याकडे नाही. त्यातून हे प्रसंग उद्भवू लागले आहेत. वर्धा जिल्ह्यात तर अनेकांच्या नरड्यांचा घोट घेणारी वाघीण जेव्हा वीज प्रवाही कुंपणात अडकून मरण पावली तेव्हा ‘त्या’ शेतकºयाविरुद्ध गुन्हा दाखल केल्याच्या विरोधात अख्खे गाव वनखात्यावर चालून गेले होते. ज्या नरभक्षक वाघिणीला ठार करण्यासाठी चंद्रपुरातून हत्तीला पाचारण केले, हैदराबादहून शॉर्प शूटर बोलविला, या मोहिमेवर लाखो रुपये खर्च केले, ती वाघीण जर वीजप्रवाही कुंपणात अडकून मरत असेल तर त्यात त्या शेतकºयाचा दोष तरी काय, अशी संतप्त भावना व्यक्त करीत गावकºयांनी वनाधिकाºयांना फैलावर घेतले. एकंदरीत मानव- वन्यप्राणी संघर्षाची धग आता वनविभागातही पोहोचू लागली आहे. त्यामुळे शेतकºयाच्या पिकाचे नुकसान होणार नाही आणि वन्यजीवही सुरक्षित राहतील, यावर रामबाण उपाय अधिकाºयांना शोधावा लागेल. सौरऊर्जेचे कुंपण हा एक पर्याय असू शकतो. विदर्भात सुमारे ७० टक्के शेती जंगलालगत आहे. याच शेतीवर कास्तकार संसाराचा गाडा हाकतो. त्यामुळे शेतीच्या संरक्षणासाठी सौरऊर्जेचे कुंपण लावण्याकरिता शासनाने अनुदान द्यावे, ही मागणीदेखील पुढे येत आहे. अन्यथा सहा जिल्ह्यात वाघांची वाढलेली संख्या अशा अपघातांची बळी ठरेल आणि शिकारी नव्हे तर आपणच त्याच्या मृत्यूला खºया अर्थाने कारणीभूत ठरू.

टॅग्स :Tigerवाघ