शहरं
Join us  
Trending Stories
1
दुर्गापूर सामूहिक बलात्कार प्रकरण: "माझ्या म्हणण्याचा विपर्यास करण्यात आला, चुकीचा अर्थ काढला गेला", 'त्या' विधानावर ममतांचं स्पष्टिकरण
2
आजचे राशीभविष्य १३ ऑक्टोबर २०२५ : वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस धनलाभाचा, पण इतर राशींना...
3
बिहारमध्ये एनडीएचे ठरले; भाजप-जदयूला समान जागा, 'लोजपा'ला २९ तर 'रालोमो'ला ६ जागा
4
भारताच्या सरन्यायाधीशांच्या अवमानाचा प्रयत्न निंदनीय, अपमानाच्या अपराधावर काही गंभीर प्रश्न...
5
मुंबई महापालिकेत सध्याचे आरक्षित प्रभाग बदलणार; चक्राकार पद्धतीने सोडत; इच्छुकांना संधीची आशा
6
अत्यंत लाजिरवाणी घटना, भारताच्या भूमीत हे घडावे...?
7
अखेर महिला पत्रकारांना अफगाणिस्तानचे निमंत्रण
8
Viral Video: प्लॅटफॉर्मवर एकाच वेळी ३ ट्रेन आल्या अन्...; बर्दवान स्थानकावर चेंगराचेंगरीसदृश स्थिती, ७ जण जखमी
9
भारतीय संघासमोर ऑस्ट्रेलियाचा ऐतिहासिक विजय! हीलीच्या सेंच्युरीनंतर पेरीनं सिक्सर मारत संपवली मॅच
10
'अश्लील फोटो, मेसेज अन्...', भाजप आमदार शिवाजी पाटलांना 'हनी ट्रॅप'मध्ये अडकवण्याचा प्रयत्न; सख्ख्या बहीण-भावाला अटक
11
Bihar Election 2025: एनडीएचं जागावाटप झालं, पण कोणाला करावी लागली तडजोड? २०२० मध्ये कोणी किती जागा लढवल्या होत्या?
12
नागपूर पोलीस ॲक्शन मोडवर! घरफोडीच्या गुन्ह्यांत तब्बल ५७ टक्के घट, २१७ ढाबे-हॉटेलवर कारवाई
13
"जे हुंडा घेतील ते नामर्द, बायको लक्ष्मी म्हणून घरात आणायची आणि..."; मकरंद अनासपुरेंचे परखड भाष्य
14
Thane: सराईत सोनसाखळी चोरट्यास ठाण्यात अटक; अडीच लाखांचे दागिने हस्तगत!
15
बदली रद्द करण्यासाठी पोलिसाचा 'जुगाड'; बनावट कागदपत्रे जोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल
16
Jemimah Rodrigues Flying Catch : जबरदस्त! जेमीनं हवेत झेपावत टिपला वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वोत्तम झेल
17
"माझ्या आणि प्रकाश आंबेडकर यांच्यातही..." ठाकरे बंधूंच्या भेटीवर रामदास आठवलेंचं मोठं वक्तव्य
18
ऐतिहासिक भागीदारी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध स्मृती मानधना- प्रतीका रावल यांनी रचला विक्रम
19
NDA चे जागावाटप ठरले! BJP-JDU प्रत्येकी 101 जागांवर लढणार; चिराग अन् माझींंच्या पक्षाला किती जागा?
20
बाबासाहेबांचे आर्थिक, सामाजिक समानतेचे स्वप्न पूर्ण होईल: सरन्यायाधीश भूषण गवई

पर्यावरणाच्या ऱ्हासाला मानवी कृतीच जबाबदार

By admin | Updated: June 5, 2016 02:04 IST

पर्यावरणाच्या हानीवरून विकसित देश आणि विकसनशील देश एकमेकांकडे बोटे दाखवत असली, तरी प्रत्येक देशातील नागरिक हा पर्यावरणाच्या हानीला जबाबदार आहे, याकडे लक्ष वेधावे लागेल.

- विजय अवसरे, निसर्गमित्रपर्यावरणाच्या हानीवरून विकसित देश आणि विकसनशील देश एकमेकांकडे बोटे दाखवत असली, तरी प्रत्येक देशातील नागरिक हा पर्यावरणाच्या हानीला जबाबदार आहे, याकडे लक्ष वेधावे लागेल. आपण आपला म्हणजे वैयक्तिक आणि देशाचा विकास करताना पर्यावरणाला हानी पोहोचेल, अशा गोष्टी करतो. प्रथमत: त्या विकासाच्या गोष्टी आपणाला लहानसहान वाटतात. मात्र, याच लहानसहान गोष्टी कालांतराने अक्राळ-विक्राळ स्वरूप धारण करतात. परिणामी, छोट्या-छोट्या मानवी कृतीच पर्यावरणाच्या हानीला जबाबदार ठरतात.जागतिक पर्यावरणाचा दिनाचा विचार केवळ या दिनापुरती जनजागृती झाली, म्हणजे सर्वकाही झाले असे होत नाही. आपण पर्यावरणाच्या हानीला तंत्रज्ञानाला जबाबदार धरतो किंवा तसे ठोकताळे बांधतो. मुळात आपण काहीसा तत्त्वज्ञानाचाही विचार केला पाहिजे. तापमानवाढीच्या समस्येचे उत्तर अंतिमत: तंत्रज्ञानात नसून, ते तत्त्वज्ञानात आहे. खरे तत्त्वज्ञान म्हणते की, इच्छांपासून मुक्त होणे म्हणजे खरे स्वातंत्र्य. मात्र, हे अर्थशास्त्र म्हणते की, इच्छा पूर्ण करत राहणे म्हणजे स्वातंत्र्य. या मूलभूत पातळीवर विचार नेल्यास आता मानवजात व सृष्टी वाचेल. कार्बन ऊर्जेला कार्बनरहित ऊर्जेने उत्तर देण्याचा पाश्चात्यांचा विचार घातक ठरेल. कारण आता त्यासाठी वेळ उपलब्ध नाही, शिवाय अशा ऊर्जेने नैसर्गिक संसाधनाचा, जंगलाचा नाश अधिक वेगाने होईल. तापमानवाढीला शहरीकरण कारणीभूत आहे. अनेक शहरे प्रदूषणाने ग्रस्त आहेत.१९८० सालच्या सुमारास वातावरण बदलाचे परिणाम स्पष्टपणे दिसू लागले. भारतीय मान्सून तेव्हापासून अनियमित झाला. वेळापत्रक चुकू लागले. ऋतूचक्र विस्कळीत झाले. बाष्पीभवनाचा वेग वाढू लागला आणि अवकाळी पावसासह गारपिटीच्या घटनांत भर पडली. १ हजार ५०० शास्त्रज्ञांच्या आंतरराष्ट्रीय अभ्यास गटाने आपल्या चौथ्या आणि अंतिम अहवालात ‘जागतिक तापमानवाढ’ ही वस्तुस्थिती असल्याचे नमूद केले आहे. १७५० सालानंतर कार्बन डायआॅक्साईड आणि उष्णता शोषून घेणारी द्रव्ये व वायू मोठ्या प्रमाणावर वातावरणात सोडण्यात आले आहेत. मानवी कृतीमुळे दरवर्षी एक हजार कोटी टन कार्बन डायआॅक्साईड व तत्सम वायूची भर वातावरणात पडते आहे. १७५० सालाच्या तुलनेत पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या सरासरी तापमानात सुमारे १.५ अंश सेल्सिअस एवढी वाढ झाली आहे. पृथ्वीवर यापूर्वी आलेल्या सर्वात मोठ्या उष्णयुगात म्हणजे, २५ कोटी वर्षांपूर्वी ९० टक्के जीवजाती नाहीशा झाल्या होत्या.मुंबई शहर आणि उपनगरांत मोटारींमुळे शहरात दररोज तब्बल ९०० टन वायुप्रदूषण होत आहे. दुर्दैव म्हणजे, उद्योग आणि वाहने हे दोन घटक वायुप्रदूषणात सातत्याने भर घालत असून, त्यातील ८० टक्के प्रदूषण हे मोटारींमुळे होत आहे. म्हणजेच एवढे प्रदूषण करून आपण पर्यावरणाचा गळा घोटतो आहे. त्यामुळे आता केवळ मुंबईकरांनी नाही तर समस्त मानव जातीने पर्यावरणाचा विचार केला पाहिजे आणि सुरुवात स्वत:च्या घरापासून केली पाहिजे. घरातील कचरा कमी केला पाहिजे. सुका आणि ओला कचरा वेगळा केला पाहिजे. महत्त्वाचे म्हणजे, कचरा सुका आणि ओला कचरा वेगळे करण्याचे आवाहन यापूर्वीच महापालिकेने केले आहे. महापालिकेने केलेल्या आवाहनाचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. केवळ पर्यावरण दिनापुरती पर्यावरणाची जनजागृती केली, म्हणजे पर्यावरणाच्या समस्या मिटतील, असे नाही, तर सर्वच घटकांनी एकत्र येत, यासाठी पुढाकार घेऊन कृती आरंभ करण्याची वेळ येऊन ठेपली आहे.