शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यांवर खर्च किती, टोलवसुली किती? हिशेब कोण देणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2023 10:27 IST

टोलचा पैसा खासगी कंत्राटदारांकडे न जाता सरकारच्या तिजोरीत जमा करण्याचा सर्वोत्तम उपाय म्हणजे संपूर्ण देशात टोल वसुली पूर्णत: डिजिटल पद्धतीने करावी!

सुधीर लक्ष्मीकांत दाणी, बेलापूर, नवी मुंबई  -टोलनाके आणि टोलवसुली हा आपल्या देशात अखंड चर्चेचा विषय आहे.   त्यात काही तातडीच्या घटना घडल्या की हा विषय लगेच पेटतो. एका तरुण राजकीय नेत्याला टोलनाक्यावर ताटकळत राहावे लागल्याने त्याच्या तरुण, उत्साही कार्यकर्त्यांनी टोलनाक्याची नासधूस केली, हे अलीकडेच घडले. आणि आता अख्खा महामार्गच खड्ड्यात गेल्यावर सरकार आणि कंत्राटदार कंपन्या कोणत्या अधिकाराने टोलवसुली करतात, असा पावसाळी प्रश्न पुन्हा तोंड वासून उभा आहे.भारतात समस्येच्या निराकरणाचे दोन मार्ग आहेत : पहिला प्रकार म्हणजे समस्येच्या मुळाशी जाऊन त्यावर सुयोग्य उपाय करत त्या समस्येचे निराकरण करणे. दुसरा प्रकार म्हणजे कारण माहीत असूनदेखील राजकीय- प्रशासकीय स्वार्थासाठी सदरील समस्या जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवणे. टोलवसुली ही दुसऱ्या प्रकारात मोडणारी समस्या आहे.टोलवसुली पद्धत सुरू झाल्यापासून तिच्याविरुद्ध अनेक आंदोलने झाली. टोलनाका तोडफोडीचे प्रकार झाले. टोलनाक्यावर बाउन्सरच्या माध्यमातून दादागिरीचे अनेक प्रकार समोर आले. तरीदेखील टोलवसुली जोमाने सुरू आहे. भविष्यातदेखील टोलमुक्ती असंभव आहे,  याची नागरिकांना खात्री आहे. भ्रष्टाचार निपटण्याची  भीष्मप्रतिज्ञा करणारे सरकार येऊनदेखील टोलवसुलीला कुठलाही धक्का पोहाेचलेला नाही यावरूनच  ही समस्या सर्वच राजकीय पक्षांना कशी प्राणप्रिय आहे हे ध्यानात येऊ शकते.देशात ज्या ज्या ठिकाणी टोलवसुली सुरू आहे त्या त्या ठिकाणच्या रस्त्यांवर किती खर्च झाला आणि आजवर त्या त्या ठिकाणी किती टोलवसुली झाली यावर  श्वेतपत्रिका काढावी, अशी ‘जनमन की बात’ आहे. टोलवसुलीत पारदर्शकता का नाही हा संशोधनाचा विषय आहे. टोलवसुलीतील गुंतागुंतीमुळे सर्वांच्याच प्रामाणिकतेवर प्रश्नचिन्ह उभे राहताना दिसते आहे.नागरिकांची केवळ एकच अपेक्षा आहे की  टोलवसुली ही रस्ते निर्मितीसाठी  केल्या जाणाऱ्या खर्चाच्या प्रमाणात केली जावी. टोलवसुलीत पारदर्शकता हवी आणि टोलमधून वसूल केली जाणारी रक्कम ही शासनाच्या तिजोरीत जमा व्हायला हवी. जमा झालेल्या याच रकमेमधून अन्य ठिकाणी रस्त्यांची निर्मिती केली जायला हवी.येणारा खर्च व केली जाणारी टोलवसुली याचा दूरान्वये संबंध दिसत नाही याचे प्रातिनिधिक उदाहरण म्हणून सायन-पनवेल मार्गावरील खाडीपुलाचे देता येईल. या टोलनाक्यावर टोलच्या रूपाने प्राप्त नोटा खाडीत दोन्ही बाजूला पत्रे ठोकून त्यात फेकल्या असत्या तरी अजून एक पूल तयार होऊ शकला असता आणि पुलावर नोटांचा डोंगर तयार  झाला असता!   टोलचा पैसा खासगी कंत्राटदाराच्या घशात न जाता तो पैसा सरकारच्या तिजोरीत जमा व्हायला हवा आणि त्यासाठीचा सर्वोत्तम उपाय म्हणजे सरकारने टोलवसुलीचे कंत्राट न देता संपूर्ण देशात टोलवसुली पूर्णत: डिजिटल पद्धतीने करावी, जेणेकरून त्यात भ्रष्टाचार, गैरकारभार होणार नाही. फास्टटॅगसारख्या तंत्रज्ञानामुळे ते सहज शक्य आहे. सरकारची प्रामाणिक इच्छा असल्यास टोलवसुलीची पद्धत अधिकाधिक तंत्रज्ञानस्नेही आणि अद्ययावत केली जाऊ शकते.  त्याद्वारे   ऑटोमॅटिक पद्धतीने टोलवसुली सुरू केल्यास  टोलवसुलीत पूर्ण पारदर्शकता येऊन याला सूट, त्याला सूट या प्रकारांनादेखील आळा बसेल.संपूर्ण देशात संपूर्णपणे डिजिटल पद्धतीने टोलवसुली चांद्रयान मोहीम राबवणाऱ्या देशाला अशक्य नक्कीच नाही. त्यासाठी गरज आहे ती जनरेट्याची आणि  राजकीय प्रशासकीय रेट्याची.

 

टॅग्स :tollplazaटोलनाकाGovernmentसरकार