शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

जिथे शाळा, त्याच गावात किती शिक्षक राहतात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2021 06:43 IST

शासनाला कर्मचारी कुठे राहतो, हे तपासायचे असते की त्याची गुणवत्ता? जुनाट नियम तसेच ठेवून आपल्याच कर्मचाऱ्यांना खोटेपणा करायला शासन का भाग पाडते?

- सुधीर लंके आवृत्तीप्रमुख, लोकमत अहमदनगर

शासन आपल्याच कर्मचाऱ्यांना नैतिकदृष्ट्या भ्रष्ट बनवतेय? - हा प्रश्न कदाचित अचंबित करणारा वाटेल, पण हा प्रश्न आहे जरूर. अहमदनगर जिल्ह्यातील शंभर टक्के प्राथमिक शिक्षक हे त्यांची नियुक्ती ज्या गावात आहे तेथेच निवासी राहतात, असा अहवाल जिल्हा परिषदेने नुकताच दिला आहे. या अहवालानुसार ११ हजारपैकी केवळ १५ शिक्षक नियुक्तीच्या गावात राहत नाहीत.

हा अहवाल खरा असेल तर, राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी तातडीने येऊन नगर जिल्ह्यातील या सर्व शिक्षकांचे अभिनंदन करायला हवे. पण, त्या तसे करणार नाहीत. कारण हा अहवाल वस्तुस्थितीला धरून नाही याची त्यांनाही खात्री असणार. गावोगाव सुनावणी घेतली तर पन्नास टक्केही शिक्षक त्यांच्या नियुक्तीच्या गावात राहत नाहीत, असे आढळेल. राज्यातही हेच चित्र दिसेल.

मग, जिल्हा परिषद असे खोटे अहवाल का बनवते? मुख्यालयी राहत नसतानाही शिक्षक तरी खोटारडे दाखले प्रशासनाला का सादर करतात? कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहावे, असा एक पारंपरिक नियम आपणाकडे चालत आलेला आहे. ते मुख्यालयी राहिले तरच घरभाडे भत्ता मिळेल अशीही एक अट आहे. या एका अटीपोटी कर्मचारी खोटे दाखले सादर करण्याचे  अनैतिक काम करतात.

मुख्यालयी राहण्याची अपेक्षा अयोग्य नाही. पण, राहायचे कसे व कोठे? हेही शासनाने सांगितले पाहिजे. क्लासवन अधिकाऱ्यांना ते जातील तेथे शासकीय निवासस्थाने असतात. सचिव, मंत्री यांना बंगले मिळतात. आरोग्य कर्मचाऱ्यांचा अपवाद वगळता वर्ग तीन व चारच्या कर्मचाऱ्यांसाठी अशी सुविधा शासनाने ग्रामीण भागात निर्माणच केलेली नाही. अनेक गावांत शाळांना चांगल्या वर्गखोल्या नाहीत. तेथे शासन कर्मचाऱ्यांना कोठून घरे देणार? ज्या गावात कर्मचाऱ्याला सुविधायुक्त घरच मिळणार नाही त्याने काय करायचे? 

मुळात शासनाला कर्मचाऱ्याचे घर तपासायचे आहे की त्याची कामातील गुणवत्ता? शिक्षक कोठे राहतात यापेक्षा ते शाळेच्या वेळा पाळतात का व पूर्ण वेळ उपस्थित राहून गुणवत्तापूर्ण शिक्षण देतात का? त्यांचे वर्तन कसे आहे? ते पालकांशी, ग्रामसभेशी संवाद ठेवतात का? - हे तपासले जाणे महत्त्वाचे आहे. शासकीय कर्मचारी भलेही गावात राहत असतील; पण, कार्यालयात वेळेवर येऊन कामकाज करीत नसतील, फायलींचा निपटारा करीत नसतील तर काय फायदा? ग्रामपंचायतींमध्ये किंवा शाळांमध्ये बायोमेट्रिक मशीन बसवा व त्यावर गावपातळीवरील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना हजेरी नोंदविणे सक्तीचे करा, असा विचार मध्यंतरी व्यक्त झाला होता. पण, हाही यांत्रिकच विचार झाला.मूलभूत मानसिकता घडवायची नाही व केवळ नियम लादून काम करून घ्यायचे, अशी प्रशासकीय नीती गतिमान प्रशासन घडवत नाही. दिव्यांग कर्मचाऱ्यांची बदली करायची नाही, असा एक शासन नियम आहे. याचे फायदे-तोटे शासन तपासताना दिसत नाही. यात गुणवत्तापूर्ण काम करणाऱ्या दिव्यांगांवरही अन्याय आहे व इतर कर्मचाऱ्यांवरही. दिव्यांगांना कमी का लेखले जाते? वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी राहून त्यांची गुणवत्ता कशी वाढेल? या नियमामुळे काही कार्यालयांत पन्नास टक्केहून अधिक कर्मचारी दिव्यांग आहेत. विवाहित महिलेची बदली होते. मात्र अविवाहित असेल तर त्या महिलेची बदली करायची नाही, असाही एक नियम आहे. या नियमामागील तर्कच कळत नाही. असा भेद कसा होऊ शकतो. लग्न करणे हा गुन्हा आहे का? किंवा स्वेच्छेने अविवाहित राहणे ही बदलीसाठी सवलत कशी असू शकते? या नियमामुळे काही कार्यालयांत केवळ विधवा, परित्यक्ता व अविवाहित महिला याच कर्मचारी दिसतात. हे एक प्रकारे या महिलांनाही समाजापासून तोडण्यासारखे नव्हे का? 

प्रशासनाची गतिमानता वाढविण्यावर मनुष्यबळ विकासाच्या अंगाने कामच होताना दिसत नाही. अब्राहम मास्लोचा मनोविकास सिद्धान्त सांगतो की, अगोदर मूलभूत गरजा पूर्ण झाल्या की माणूस उच्चस्तरीय अपेक्षांकडे जातो. या प्रेरणा विकसित करावयाच्या असतील तर कर्मचाऱ्यांना यंत्र समजून चालणार नाही. त्यांना स्वायतत्ता देऊन कामातील गती वाढविण्यावर विचार व्हायला हवा.

टॅग्स :Teacherशिक्षक