शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

मुंबईतील नगरसेेवकांना भाषेचे भान किती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2019 17:39 IST

कुशल कारागीर दर्जेदार उत्पादन तयार करतात.  त्याचप्रमाणे उच्च शिक्षित देशाच्या प्रगतीला पोषक ठरतात. प्रत्येक क्षेत्रात शिक्षणाचा दर्जा तपासूनच नोकरी दिली जाते. ही अट राजकारण्यांना मात्र लागू नाही. परिणामी शिक्षणासाठी आग्रही भूमिका मांडणाऱ्या राजकारण्यांची संख्या बोटावर मोजण्याइतकीच आहे.

- विनायक पात्रुडकरकुशल कारागीर दर्जेदार उत्पादन तयार करतात.  त्याचप्रमाणे उच्च शिक्षित देशाच्या प्रगतीला पोषक ठरतात. प्रत्येक क्षेत्रात शिक्षणाचा दर्जा तपासूनच नोकरी दिली जाते. ही अट राजकारण्यांना मात्र लागू नाही. परिणामी शिक्षणासाठी आग्रही भूमिका मांडणाऱ्या राजकारण्यांची संख्या बोटावर मोजण्याइतकीच आहे. महापालिका शाळांचा एका खासगी संस्थेने केलेल्या सर्व्हेक्षणात ही बाब प्रामुख्याने जाणवली. एप्रिल २०१७ ते मार्च २०१८ या कालावधीत पालिकेच्या सर्वसाधारण बैठकीत मुंबईच्या नगरसेवकांनी शिक्षणाबाबत विचारलेल्या प्रश्नांची संख्या अगदीच तुरळक आहे. काही मोजक्याच नगरसेवकांनी शिक्षणाबाबत प्रश्न विचारले. पालिकेच्या शाळांना गेल्या काही वर्षांपासून गळती लागली आहे.  ही गळती का लागली?, याची नेमकी कारणे काय आहेत?, याबाबत एकही प्रश्न विचारला गेला नाही. याचा अर्थ मुंबईतील नगरसेवकांना ना मराठी भाषेशी घेणेदेणे आहे, ना मराठी शाळांशी.

एकीकडे मराठी वाचवा, मराठी वाढवा, या एका मुद्दयावर शिवसेना मोठी झाली. सत्तेत आली. मात्र आता त्यांना मराठीचा आणि मराठी अस्मितेचा विसर पडला आहे. या पक्षाचे संख्याबळ पालिकेत मोठे आहे. असे असताना किमान या पक्षाच्या सर्व नगरसेवकांनी तरी मराठी शाळा टिकविण्यासाठी, वाढविण्यासाठी आग्रही राहायला हवे. सर्वसाधारण बैठकीत या मुद्दयावर चर्चा घडवायला हवी. मात्र तसे झाले नाही. इंग्रजीच्या आक्रमणामुळे मराठी शाळा बंद पडत आहेत, मराठी शाळांचा दर्जा घसरला आहे, तेथे पायाभूत सुविधा नाहीत, अशी कारणे आपण सर्रास देतो. पालकही याला जबाबदार आहेत, हेही सांगायला आपण विसरत नाही. प्रत्यक्षात सत्ताधारीच उदासीन असतील तर सर्वसामान्यांमध्ये मराठीची अस्मिता टिकवणे अशक्य आहे.

  महापालिकेचा अर्थसंकल्प एका छोट्या राज्याऐवढा आहे. पालिकेकडे पैशाची कमी नाही. मात्र मानसिकतेची कमतरता आहे. पैसा असूनही दर्जेदार शिक्षण पद्धती आपण उभी करू शकत नसलो तर पालकांना दोषी धरणे योग्य नाही़ पैशाचा योग्य वापर करत दर्जेदार शिक्षण यंत्रणा उभी केली जाऊ शकते. बहुतांश पालिका शाळांचा परिसर मुबलक आहे. तेथे विविध उपक्रम राबवले जाऊ शकतात. अत्याधुनिक यंत्रणा उभी राहू शकते. व्हर्च्युअल क्लास रूमद्वारे तसे प्रयत्न सुरू आहेत. मात्र हे प्रयत्न तोकडे पडत आहेत.  यासाठी प्रशासकीय अधिका-यांपेक्षा नगरसेवकांनी आग्रही राहायला हवे. मुळात लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची निवड विकासासाठीच केली गेली आहे. हा विकास केवळ पायाभूत सुविधांचा नसून सर्वच अंगांनी व्हायला हवा. त्यात शिक्षण हे तर अग्रस्थानी असायला हवे. तरच मराठी शाळा व मराठी भाषा टिकेल.

 

टॅग्स :MumbaiमुंबईMumbai Municipal Corporationमुंबई महानगरपालिकाmarathiमराठी