शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
5
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
6
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
7
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
8
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
9
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
10
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
11
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
12
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
13
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
14
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
15
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
16
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
17
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
18
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
19
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
20
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू

उदंड जाहले हवशे - गवशे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 07:23 IST

लगाव बत्ती..

- सचिन जवळकोटे

यंदाची निवडणूक पावसाळ्यानंतर आलीय. या काळात गवताप्रमाणं जागोजागी इच्छुकांचं अस्तित्व अकस्मातपणे उगवू लागेल. धरणातल्या पाण्याप्रमाणं नवशांचा उत्साह ओसंडून वाहू लागेल. हौशांच्या महापुरानं अवघा मतदारसंघ ढवळून निघेल...अन् याच महापुरात ‘लक्ष्मी खुळखुळे’वाले ‘गलेलठ्ठ’ मासे आपल्या गळाला लागावेत म्हणून हुश्शाऽऽर गवसे कामाला लागतील. कामाला लावतील.

तेरे-मेरे बीच मेंजमाई का क्या काम ?

  अक्कलकोटमध्ये ‘सिद्रामप्पा-सचिनदादा’ टीम व्हर्सेस ‘सिद्धूअण्णा-विजूमालक’ टीमचा मुकाबला भलताच रंगात आलेला; मात्र यात आता एन्ट्री केलीय ‘राधाकृष्ण नगरकरां’च्या जावईबापूंनी. ‘हन्नूर-दुधनी’ संघर्ष असाच भडकत राहिला तर ‘विखे-पाटलां’चा हा मोहरा म्हणे ऐनवेळी पटावर पुढं सरकवणार. तसा शब्दही ‘नगरकरां’नी जावयाला अर्थात आचेगावच्या ‘गणेशरावां’ना दिलाय. म्हणजे ‘कमळा’च्या दोन्ही ‘देशमुखां’ना बाजूला ठेवून ‘माने-देशमुखां’च्या नावाला ‘जयहिंद’ करणार. ‘नगरकर’ पण भलतेच ग्रेट रावऽऽ मुलगा खासदार, स्वत: मंत्री, आता पत्नीलाही तिकडं तिकीट देणार अन् जावयालाही इकडं उभं करणार. व्वाऽऽ व्वाऽऽ ‘हाता’चीच जुनी संस्कृती आता ‘कमळा’लाही आवडू लागणार...लगाव बत्तीऽऽ

उत्तर’ची ‘केस’ अन्    ‘तारीख पे तारीख’..

 ‘थोबडे’ मालकांच्या गळ्यात बळं-बळंच ‘उत्तर’ची ‘केस’ मारण्याचा प्रयत्न ‘प्रकाशअण्णा अन् संतोषभाऊं’नी सुरू केलाय; परंतु ‘मिलिंद’रावही भलतेच हुश्शाऽऽर. कॉम्प्लिकेटेड केस ढिली करणं एकवेळ सोप्पं असतं; मात्र टफ इलेक्शन जिंकणं खूप त्रासदायक असतं, हे त्यांना पुरतं  ठावूक...म्हणूनच की काय किचकट निवडणूक लढविण्यापेक्षा सोप्पी केस लढविण्याकडेच त्यांचं अधिक लक्ष. तरीही ‘मनोहरपंत-चेतनभाऊ’ हातात हात घालून त्यांच्याकडे अंतिम सुनावणीसाठी हेलपाटे मारताहेत. पाहूया...किती दिवस चालणार ‘मिलिंद’रावांचा ‘तारीख पे तारीख’ सिलसिला.

दक्षिण’मध्येही अजूनएक नवा ‘कॉन्ट्रॅक्टर’..

‘दक्षिण’मध्येही अजून एका नव्या ‘कॉन्ट्रॅक्टर’ची चर्चा सुरू झालीय. आता अगोदरचे दोन कॉन्ट्रॅक्टर कोण हे ‘बापू’ अन् ‘मालकां’ना विचारत बसू नका. मद्रयातील ‘पवारांचे संतोष’ पुण्यात जाऊन ‘बिल्डर’ बनलेले; मात्र त्यांना ‘दक्षिण’मध्ये उभं करण्यासाठी ‘युवराज टीम’ भलतीच कामाला लागलीय. सा-याच पक्षातील अतृप्त आत्म्यांना एकत्र आणून प्रस्थापितांची शांती करण्याचा घाट घातला गेलाय. सत्तेपासून वंचित राहिलेले हे सारे नेते एकत्र आल्यानं ‘दक्षिण’मध्ये किती चमत्कार घडेल, हे याक्षणी कुणाला सांगता येईनासं झालंय...मात्र ‘दोन्ही कारखानदारां’ची डोकेदुखी वाढली हे निश्चित.माळशिरसमध्ये नव्या उमेदवाराचा ‘संकल्प’माळशिरसमध्ये नव्या उमेदवाराचा ‘संकल्प’ ‘अकलूजकरां’नी सोडला असला तरी ‘जानकरां’नीही सतत आपल्या ‘सकट’ राहणाराच नेता हवा, याची ‘उत्तम’ आखणी केलीय. आता या दोघांमध्ये ‘वर्षा’वर कुणाची अधिक चांगली लिंक, यातच नव्या नावाचं उत्तर लपलेलं; मात्र या दोघांच्या वादात ऐनवेळी ‘हाफचड्डी’वाल्यांनी ‘आम्ही सातपुते’ म्हणत नवा चेहरा मुंबईहून पाठवून दिला तर ‘राम’ राम मंडळीऽऽ

थोरले दादा तर अजूनबीजुन्या पार्टीमंदीच हायती न्हवं ?

असो. अकलूजच्या कार्यकर्त्यांना ‘माळशिरस’पेक्षा ‘माढा’ टापूतच अधिक रस. ‘निमगावकर दादा’ ऐनवेळी ‘कमळ’ घेऊन उभारले तर ‘अकलूजकर दादां’नीही ‘घड्याळ’ बांधून ‘माढ्यात’ उतरायला हरकत नसावी, असाही एक नवा मतप्रवाह...कारण म्हणे अधिकृतपणे ‘कमळ’ घेऊन केवळ ‘धाकले दादा’ फिरताहेत. ‘थोरले दादा तर अजूनबी जुन्या पार्टीमंदीच हायती न्हवं ?’ हा सवाल खुद्द कार्यकर्तेच करताहेत. ग्रेटऽऽ माढा लोकसभा मतदारसंघातला कोणता नेता कुठल्या पक्षात, याचं अपडेट ‘गुगल’वाल्यांनी तासा-तासाला करायला हवं.

उजनी जलाशय माढा पट्ट्यात.... मासा टिपणार अकलूजमध्ये !

‘अकलूज’मध्ये नुकतंच मत्स्यविकास प्रशिक्षण शिबीर घेण्यात आलं. यासाठी पुढाकार घेतला होता खुद्द ‘थोरले दादा अकलूजकर’ यांनीच. या शिबिरात माढ्यातूनही सर्वाधिक मंडळी आलेली. परिसंवादाचा विषय मासे जगविण्याची.. खाजगीत चर्चा मात्र ‘तानाजीरावां’च्या गळाला कोणता मासा लागतो त्याचीच. खरंतर, उजनी जलाशय माढा पट्ट्यात. तिथं हे शिबीर घेण्याऐवजी अकलूजमध्ये माढ्याच्या सा-या विरोधकांना एकत्र आणून ‘थोरल्या दादां’नी नेमका कोणता मासा टिपला, याचं उत्तर ‘टेंभुर्णीकर अन् भीमानगर’चे ‘संजू’च देऊ शकतील. लगाव बत्ती...

( लेखक 'सोलापूर लोकमत'चे निवासी संपादक आहेत.)

टॅग्स :Solapurसोलापूरvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकPoliticsराजकारणsolapur-city-north-acसोलापूर शहर उत्तर