शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

हुडको कर्जाचा तिढा सुटला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 13:13 IST

मिलिंद कुलकर्णी जळगाव महापालिकेच्यादृष्टीने महत्त्वाचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. घरकुलांसाठी तत्कालीन पालिकेने हुडकोकडून घेतलेल्या कर्जाची एकरकमी परतफेड करण्यात ...

मिलिंद कुलकर्णीजळगाव महापालिकेच्यादृष्टीने महत्त्वाचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. घरकुलांसाठी तत्कालीन पालिकेने हुडकोकडून घेतलेल्या कर्जाची एकरकमी परतफेड करण्यात येणार असून हा निधी राज्य सरकार उपलब्ध करुन देणार आहे. या निधीतील निम्मी रक्कम महापालिकेने दरमहा तीन कोटी रुपये या प्रमाणे राज्य शासनाला परत करायची आहे. २७१ कोटी ७३ लाख रुपयांचे कर्ज हुडकोला परत करायचे आहे. दंडनीय व्याज वगळण्याची विनंती महापालिकेने केली असून ती मान्य झाल्यास ही रक्कम २३३ कोटी ९१ लाख रुपये असेल.यापूर्वी जिल्हा बँकेच्या कर्जातून महापालिका मुक्त झाली आहे. त्यापाठोपाठ हुडकोच्या कर्जाचा तिढा सुटल्याने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप आमदार सुरेश भोळे यांच्यादृष्टीने हा मोठा दिलासा आहे. त्यांच्या पत्नी सीमा भोळे या महापौर असल्याने ही जबाबदारी त्यांच्यावरदेखील होतीच. महापालिकेच्या व्यापारी संकुलांच्या प्रश्नात अशीच राज्य शासनाने सहकार्याची भूमिका घेतल्यास व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. महापालिकेला लागलेले आर्थिक ग्रहण सुटण्यास मदत होणार आहे.जिल्हा बँक आणि हुडकोच्या कर्जाविषयी ठोस निर्णय झाल्याने विरोधकांकडील एक मुद्दा कमी झाला आहे. त्यामुळे या विषयातील त्रुटी शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. जिल्हा बँकेने एकरकमी तडजोडीचा प्रस्ताव न स्विकारल्याने आणि लिकिंग शेअरसंदर्भात आग्रही भूमिका ठेवल्याने महापालिकेचे आर्थिक नुकसान झाल्याचा विरोधकांचा आरोप आहे. तर हुडकोच्या संदर्भात ५० टक्के नव्हे तर संपूर्ण १०० टक्के रक्कम राज्य शासनाने भरायला हवी होती, असे विरोधकांचे म्हणणे आहे. विरोधक म्हणून त्यांनी त्यांची भूमिका बजावली, असे म्हणायचे तर जिल्हा बँकेत सर्वपक्षीय संचालक आहेत, मग कोणत्या संचालकाने महापालिकेची बाजू लावून धरली तेही एकदा कळू द्या. संचालक मंडळाच्या इतिवृत्तासह पुरावे देऊन हे जळगावकरांना पटवून द्या. तीच गोष्ट हुडकोच्या कर्जाची. या कर्जाला शासन हमी होती, त्यामुळे राज्य शासनाला जबाबदारी टाळून चालणार नव्हते हे तर खरे आहेच. पण १९८९ ते २०१९ या ३० वर्षांत सर्व पक्षीयांची सत्ता राज्यात येऊन गेली. अगदी काँग्रेस, राष्टÑवादी, भाजप आणि शिवसेना या चार पक्षांना मतदारांनी संधी दिली होती, हा निर्णय एवढ्या कालावधीत का झाला नाही. या पक्षांच्या स्थानिक नेत्यांनी त्यासाठी काय प्रयत्न केले, हेदेखील एकदा जळगावकरांना कळू द्या . टीका करणे, आरोप करणे खूप सोपे आहे, रचनात्मक काम करणे, प्रलंबित प्रश्न सोडविणे हे खूप कठीण आहे. त्यामुळे भाजपने जर पुढाकार घेऊन कर्जविषयक दोन प्रश्न सोडविले असतील, तर निश्चितच त्याचे स्वागत करायला हवे.दरमहा तीन कोटी रुपये सध्यादेखील हुडकोला महापालिका देत आहेच, तेच तीन कोटी रुपये आता राज्य शासनाला द्यावे लागतील. किमान चार वर्षे ही रक्कम परत करायला लागतील. व्याजाशिवाय ही रक्कम द्यावी लागेल, असे सांगितले जाते, हे खरे असेल तर हीदेखील चांगली बाब आहे.झोपडपट्टीवासीय, गरीब लोकांसाठी घरकुलाचा तत्कालीन पालिकेचा चांगला प्रस्ताव असल्याने हुडको आणि राज्य शासनाने पालिकेला १४१ कोटी रुपये कर्ज दिले होते. काही घरकुले झाली. सुरेशदादा जैन यांच्या कार्यकाळात ही कामे सुरु असताना लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून भाजपचे डॉ.के.डी.पाटील हे निवडून आले. सभागृहात बहुमत नसल्याने डॉ.पाटील यांच्यापुढे प्रश्न होताच. पूर्वीच्या पदाधिकाऱ्यांची कामे बंद करण्याचा सपाटा त्यांनी लावला. घरकुलांचे काम बंद पाडले, हुडकोच्या कर्जाचे हप्ते फेडणे बंद केले. त्यामुळे पालिकेचे आर्थिक गणित बिघडले. एकेकाळी पतमानांकनात राज्य शासनापेक्षा चांगले मानांकन मिळालेली पालिका कर्जबाजारी झाली. १४१ कोटींच्या कर्जापोटी आतापर्यंत ३७५ कोटी रुपये पालिकेने हुडकोकडे भरले आहेत. १०-१५ वर्षांत पालिका मुलभूत सुविधा देण्यात कमी पडत आहे. भाजपच्या काळात कर्जाचे हप्ते थांबले होते आणि आता भाजपच्या काळातच त्यातून मार्ग काढला गेला. काळाचा महिमा असेच याचे वर्णन करावे लागणार आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव