शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

हायकोर्ट व‘किल’ नैतिकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 02:00 IST

दीडशे वर्षांची विधि परंपरा असलेल्या मुंबई उच्च न्यायालयात खुद्द राज्य शासनाने विद्यमान न्या़ अभय ओक हे पक्षपाती असल्याचे म्हणत अविश्वास दाखविला़ हे नाट्य शासनानेच नंतर न्य़ा़ ओक यांची जाहीर माफी मागून संपविले.

-अ‍ॅड. डॉ़ गुणरत्न सदावर्तेवकील संघटनांनी न्यायालयाची जाहीर माफी मागितली आहे़ न्यायमूर्तींचा अवमान केला, म्हणून वकील संघटनांच्या विरोधात न्यायालयाच्या अवमानतेची याचिका दाखल होते़ आता तर उच्च न्यायालयाच्या वकील संघटनांनी राज्य शासनाच्या एका भूमिकेचा विरोध केला आहे, म्हणजेच न्यायदानावर अडथळा निर्माण केला आहे़ राज्य शासन या एका पक्षकारावर आवाजाच्या याचिका प्रकरणात दबाव आणला आहे़न्याय हा सहज मिळत नाही, हा आजवरचा इतिहास आहे़ तरीही या देशातील सर्वसामान्य नागरिकांचा न्यायपालिकेवर दृढ विश्वास आहे़ अशा न्यायपालिकेत कोणावरही बिनधास्त आरोप करण्याचा अधिकार आहे़ या अधिकाराचा आजवर अनेक वकिलांनी आधार घेतला आहे़ न्यायमूर्तींवर आरोप होणे हेही नित्याचेच आहे़ अशा परिस्थितीत न्या़ ओक यांच्यावर राज्य शासनाने दाखविलेला अविश्वास ही वकिलांसाठी नवीन गोष्ट खचितच नाही़दीडशे वर्षांची विधि परंपरा असलेल्या मुंबई उच्च न्यायालयात खुद्द राज्य शासनाने विद्यमान न्या़ अभय ओक हे पक्षपाती असल्याचे म्हणत अविश्वास दाखविला़ हे नाट्य शासनानेच नंतर न्य़ा़ ओक यांची जाहीर माफी मागून संपविले.या नाट्य प्रयोगात न्यायालयाचे बार असोसिएशन प्रसिद्धीच्या झोतात आले़ वेस्टर्न युनियन बार असोसिएशन व बॉम्बे बार असोसिएशनने शासनाचा निषेध केला़़ हा निषेध न्या़ अभय ओक यांना पाठिंबा देण्यासाठी होता़ मात्र, या निषेधाला अनेक वकिलांचा विरोधही होता़ नैतिकता हा वकिली पेशाचा मूलभूत आधार आहे़या माध्यमाकडे आरोप करण्याचे व आरोप सहन करण्याचे विशेष प्रावीण्य असते़न्यायमूर्तींवर आरोप होणे हेही नित्याचेच आहे़ अशा परिस्थितीत न्या़ ओक यांच्यावर राज्य शासनाने दाखविलेला अविश्वास ही वकिलांसाठी नवीन गोष्ट खचितच नाही़ असे आरोप होतच राहतात़ या आरोपाचा वकील संघटनेने जाहीर बैठक करून विरोध करावा, म्हणजे वकील संघटनांनी नैतिकतेला विरोध करण्यासारखे आहे़ हे विरोध नाट्य एवढे रंगले की, राज्य शासनाने थेट माफीनामा सादर केला़ एवढेच काय, तर शासनाने आरोप केल्यानंतर मुख्य न्यायमूर्ती मंजुळा चेल्लूर यांनी न्या़ ओक यांच्याकडून हे प्रकरण काढून घेतले होते़ त्यांची ही कारवाई न्यायिक होती़ मुख्य न्यायमूर्ती चेल्लूर यांनी याची प्रशासकीय स्तरावर चौकशी करणे गरजेचे होते, पण तसे झाले नाही़ झाले असते, तर ती संविधान सुसंगत भूमिका ठरली असती़ मात्र, वकील संघटनेने विरोध केल्यानंतर, मुख्य न्यायमूर्ती चेल्लूर यांनी आवाजाची मर्यादा ठरविण्यासाठी स्थापन केलेल्या पूर्णपीठात, न्या़ ओक यांनाच प्रमुख केले़, हे न पटणारे आहे़ सर्वोच्च न्यायालय याबाबत प्रशासकीय स्तरावर काय भूमिका घेते, ते पाहावे लागेल़, तसेच हे प्रमुखपद न्या़ ओक यांनी स्वीकारलेदेखील आहे. आवाजाची मर्यादा ठरविण्यावरूनच शासन व न्या़ ओक यांच्यात जुंपली होती़ असे असताना न्या़ ओक तेच प्रकरण ऐकण्यासाठी पुन्हा स्थानापन्न होतात़ सर्वसामान्यपणे आरोप झाल्यानंतर, पुन्हा तेच प्रकरण ऐकणे हे कोणाच्या नैतिकतेला पटण्यासारखे नाही़ न्या़ ओक यांची कारकीर्द आदर्श घेण्यासारखी आहे़ कायद्याच्या चौकटी बाहेर जाणाºया प्रत्येकाला त्यांनी चांगलाच धडा शिकविला आहे़ त्यांचे अनेक निकाल समाज व्यवस्थेवर परिणाम करणारे ठरले आहेत़ अनेक वंचितांना त्यांच्या निकालांनी न्याय मिळवून दिला आहे़ अशा न्यायमूर्तींनी आरोप झाल्यावर, पुन्हा तेच प्रकरण ऐकावे हे एक न सुटणारे कोडे आहे़ न्या़ ओक यांच्या नैतिकतेवर पुढे प्रश्न चिन्हही निर्माण होऊ शकतात. महत्त्वाचे म्हणजे, कोल्हापूर खंडपीठासाठी तेथील वकील संघटनांनी आंदोलन केले होते़ त्या वेळी माजी मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा यांनी याबाबत ठोस निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते़ हे आश्वासन पूर्ण न करताच ते सेवानिवृत्त झाले़ त्यानंतर, संतप्त झालेल्या वकील संघटनांनी मुख्य न्यायमूर्ती शहा यांच्या प्रतिकृतीची अंत्ययात्रा काढली होती़ याची गंभीर दखल घेत, न्यायालयाने स्वत:हून या वकिलांच्या विरोधात न्यायालयाच्या अवमानतेची याचिका दाखल करून घेतली़ याची सुनावणी न्या़ ओक यांच्यासमोरच सुरू आहे़ ़या प्रकरणात न्या़ ओक यांच्यासमोर महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी हे डोळ्यातून अश्रू ढाळ्याचे राहिले होते़ छातीचा कोट करून मी तुम्हाला वाचवले, असे महाधिवक्ता कुंभकोणी यांनी जाहीरपणे न्या़ ओक यांना सांगितले़ याचा अर्थ शासन या पक्षकाराचा खरोखरच न्या. ओक यांच्यावर विश्वास नाही, हे स्पष्ट होते़, तसेच हे शासनाच्या प्रतिष्ठेसाठीही हानिकारक आहे़ या वकील संघटनांविरोधात न्यायालयाच्या अवमानतेची याचिका दाखल होणार की नाही, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे़ कारण कोणतीही भूमिका घेण्याचा शासनाला अधिकार आहे़ या प्रकरणी वकील संघटनेविरुद्ध कोण कारवाई करणार? हे आता बघावे लागेल़ अशाप्रकारे विरोध करून वकील संघटनेने नैतिकतेचा बळी घेतला आहे? की मुख्य न्यायमूर्तींवर दबाव आणून काय साध्य केले याचा उलगडा होणे महत्वाचे ठरणार आहे.

(लेखक मॅट वकील संघटनेचे अध्यक्ष आहेत.)

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय