शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange: '...तोपर्यंत मुंबई सोडणार नाही', नोटीसनंतर मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा
2
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: बस… आता थांबा, नामुष्की टाळायची असेल तर आंदोलन संपवा, सरकारला सहकार्य करा; जरांगेंना कुणाचा सल्ला?
3
औषधांवर २०० टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्लॅन; भारतावर किती होणार परिणाम?
4
सोन्याने गाठली विक्रमी पातळी! तुमच्या शहरात एक तोळ्याचा आजचा भाव काय? अचानक का आली तेजी?
5
तुळजाभवानीच्या पुजारी मंडळावरून पेटला वाद, आजी-माजी पदाधिकारी आमने-सामने
6
आंदोलनात बेकायदेशीर कृत्ये, लवकरात लवकर मैदान रिकामं करा; मनोज जरांगेंना पाठवलेल्या पोलिसांच्या नोटीसमध्ये काय?
7
UAE चा कॅप्टन Muhammad Waseem नं साधला मोठा डाव! हिटमॅन रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला
8
भारत-रशिया मैत्री पाहून अमेरिका भडकली, ट्रम्प यांचे सल्लागार संतापले; म्हणाले, 'आमच्यासोबत...!'
9
"ती काम करत नाही, पण मी...", मृणालने अनुष्कावर साधला निशाणा? सलमानचा 'सुलतान' नाकारल्याचा दावा
10
Parivartani Ekadashi 2025: ज्यांना आयुष्यात परिवर्तन घडवायचे आहे, त्यांनी 'असे' करा एकादशी व्रत!
11
अनंत चतुर्दशी २०२५: गणेशोत्सवाची सांगता; पाहा, मान्यता, २०२६ मध्ये कधी येणार गणपती बाप्पा?
12
Mitchell Starc T20I Retirement : आगामी टी-२० वर्ल्ड कप आधी स्टार गोलंदाजाने घेतला निवृत्तीचा निर्णय; जाणून घ्या त्यामागचं कारण
13
४ राजयोगात परिवर्तिनी एकादशी: ९ राशींचे कल्याण-भरभराट, सुबत्ता-शुभ-लाभ; धनलक्ष्मी प्रसन्न!
14
GST बैठकीच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात तेजी; रिलायन्समध्ये सर्वाधिक वाढ तर 'हे' स्टॉक्स घसरले
15
अनवाणी चालत बाप्पाच्या दर्शनाला पोहोचला सलमान खान, पळत पळतच कारजवळ आला अन्...
16
Punjab Flood: अर्धा पंजाब पाण्यात! १३०० गावांना पुराचा वेढा, हजारो लोक बेघर; २९ जणांचा मृत्यू
17
Parivartani Ekadashi 2025: परिवर्तनी एकादशी; चातुर्मासाचा मध्यंतर, यादिवशी श्रीहरी श्रीविष्णूंची बदलतात कूस!
18
Maharashtra Rain: राज्यात पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार, आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
19
गणेशोत्सव साजरा करत नाही आलिया? ट्रोल झाल्यानंतर दिलं सडेतोड उत्तर; फोटो शेअर करत म्हणाली...
20
'ही' आंतरराष्ट्रीय बँक भारतातून गाशा गुंडाळण्याच्या तयारीत? ग्राहकांच्या पैशांचं काय होणार?

इकडे आड...!

By admin | Updated: July 16, 2017 23:10 IST

‘इकडे आड, तिकडे विहीर’ या मराठी म्हणीचा अर्थ बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यापेक्षा जास्त चांगला इतर कुणालाही ठाऊक असू शकत नाही;

‘इकडे आड, तिकडे विहीर’ या मराठी म्हणीचा अर्थ बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यापेक्षा जास्त चांगला इतर कुणालाही ठाऊक असू शकत नाही; कारण त्यांनी बरेचदा त्या स्थितीचा सामना केला आहे. बिहारचे उप मुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्याविरोधात केंद्रीय अन्वेषण संस्था म्हणजेच सीबीआयने प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) दाखल केल्याने, नितीश कुमार यांच्यासाठी पुन्हा एकदा ‘इकडे आड, तिकडे विहीर’ अशी स्थिती उभी ठाकली आहे. नितीश कुमार यांनी आयुष्यात सर्वाधिक कोणती गोष्ट जपली असेल, तर ती म्हणजे स्वच्छ प्रतिमा! भ्रष्टाचार प्रकरणात नाव आल्यावर स्वपक्षाच्या नेत्यांचे राजीनामे घेण्यासाठी क्षणाचाही विलंब न लावणाऱ्या नितीश कुमार यांना, बुधवारी तेजस्वी यादव यांच्या मांडीला मांडी लावून मंत्रिमंडळाच्या बैठकीत बसावे लागले, तेव्हा त्यांची स्थिती किती अवघडल्यासारखी झाली असेल. तेजस्वी यादव राजीनामा देणार नाहीत, ही भूमिका राजदने कायम ठेवल्यास, नितीश कुमार यांच्यासमोर दोनच पर्याय शिल्लक उरतात. एक तर भाजपाशी हातमिळवणी करणे, किंवा मध्यावधी निवडणुकीला सामोरे जाणे! हे दोन्ही पर्याय नितीश कुमार यांच्यासाठी हानीकारक आहेत. भाजपाच्या पाठिंब्याची भारी किंमत नितीश कुमार यांना चुकवावी लागेल. या पर्यायाची सर्वात मोठी किंमत म्हणजे पंतप्रधान पदावर आरूढ होण्याच्या स्वप्नास किमान सात वर्षांसाठी तरी तिलांजली देणे! आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला पुन्हा कौल मिळाला तर नरेंद्र मोदीच पंतप्रधान असतील आणि विरोधी पक्षांना कौल मिळाला तरी नितीश कुमार यांना संधी मिळणे नाही! दुसरीकडे भाजपाशी हातमिळवणी न करता मध्यावधी निवडणुकीचा पर्याय निवडल्यास, नितीश कुमार यांना मुख्यमंत्री पदही गमवावे लागण्याचीच शक्यता जास्त आहे; कारण २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत बिहारमध्ये तिरंगी लढत झाली, तेव्हा अवघ्या दोन जागा पदरात पडून, नितीश कुमार यांच्या पक्षाची अवस्था अतिशय दारुण झाली होती. विधानसभेच्या मध्यावधी निवडणुकीतही भाजपाविरोधी मतांची फाटाफूट होऊन, कमीअधिक फरकाने त्याचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. भाजपाच्या चाणक्यांनी बिहारमध्ये अत्यंत चाणाक्ष खेळी केली आहे. लालूप्रसाद यादव यांच्यावर निशाणा धरून, त्यांनी कोंडीत मात्र नितीश कुमार यांना पकडले आहे. नितीश कुमार त्या कोंडीतून बाहेर पडण्यात यशस्वी होतात, की भाजपाला शरण जातात, हे बघणे मनोरंजक ठरणार आहे.