शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

प्रासंगिक : आरोग्य व्यवस्थांपुढचे नवे आव्हान हिपॅटायटीस : ‘वी आर नॉट वेटिंग’

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2023 08:02 IST

वेगवेगळ्या विषाणूंमुळे यकृताला होणारा हिपॅटायटीस हे जगभरातल्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थांपुढचे मोठे आव्हान आहे. आज ‘हिपॅटायटीस दिन’! त्यानिमित्त..

डॉ. चेतन कलाल, हिपोटोलॉजिस्ट यकृत, पित्ताशय, स्वादुपिंड तज्ज्ञवेगवेगळ्या विषाणूंमुळे यकृताला  होणाऱ्या हिपॅटायटीस या आजारामुळे जगभरात लक्षावधी लोक मृत्युमुखी पडतात. आज २८ जुलै रोज जगभर ‘हिपॅटायटीस दिन’ साजरा होतो. या आजाराविषयी जागृती करणे हा त्यामागचा उद्देश आहे. यंदाचा ‘हिपॅटायटीस दिन’ हा ‘वी आर नॉट वेटिंग’ हे घोषवाक्य घेऊन पाळला जाणार आहे. निदान न झालेले हिपॅटिटिसचे रुग्ण शोधून त्यांच्यावर तत्काळ उपचार करण्यावर यंदा भर देण्यात येईल. ‘सायलेंट किलर’ मानल्या जाणाऱ्या या आजाराचा  प्रभावी सामना करणे हे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थांपुढचे मोठे आव्हान आहे.

बी आणि सी प्रकारच्या विषाणूजन्य हिपॅटिटिसने  मोठा आरोग्यविषयक प्रश्न उभा केला आहे. आतड्याचा कर्करोग होऊन मृत्युमुखी पडणाऱ्या दोन तृतीयांश लोकांना बी आणि सी प्रकारचा हिपॅटायटीस झालेला असतो. ९१ टक्के लोकांना बी प्रकारचा हेपॅटिटिस झाल्याचे लक्षात येत नाही. सी च्या बाबतीत हे प्रमाण ८० टक्के आहे. अनेक देशांत मुलांना द्यायच्या लसीच्या कमतरतेमुळे हा आजार बळावतो. जगभरात सुमारे २९ कोटी लोक या संसर्गासह जगतात आणि त्यांना या संसर्गाची कल्पनाही नसते, असे आकडेवारी सांगते. २०३० पर्यंत या दोन्ही प्रकारच्या संसर्गांना  आळा घालण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

हिपॅटायटीस या आजाराचा सामना भारतालाही मोठ्या प्रमाणावर करावा लागतो. त्यात ए आणि ई या प्रकारचे जास्त रुग्ण दिसतात. यामागे अस्वच्छता, पिण्याचे असुरक्षित पाणी, भेसळीचे अन्न आणि व्यक्तिगत स्वच्छतेची काळजी न घेणे ही कारणे प्रामुख्याने आहेत. देशातील मृत्यूचे कारण असलेल्या आजारांत यकृताचे विकार १०व्या क्रमांकावर असल्याचे जागतिक आरोग्य संघटना सांगते. देशातल्या पाचपैकी एकाला तरी यकृताशी संबंधित आजार झालेला असतो. देशात पाच कोटींहून जास्त लोक या विषाणूजन्य आजाराचे वाहक आहेत. ए आणि ई प्रकारचा हिपॅटायटीस मुखावाटे विषाणू आत जाऊन होतो. थकवा, फ्लूसारखी लक्षणे, पोटात दुखणे आणि काविळ ही त्याची लक्षणे आहेत. या प्रकारचा आजार पावसाळ्यात आपल्याकडे वाढलेला दिसतो.हिपॅटायटीस बी आणि सी चा संसर्ग रक्त, वीर्य आणि अन्य शारीरिक स्त्रावांतून होतो. दूषित रक्त दिले जाणे, असुरक्षित शस्त्रक्रिया किंवा औषधांचा वापर ही त्याची कारणे आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांना चुकून सुई टोचली जाणेही संसर्गास कारणीभूत ठरते. शरीरसंबंध आणि आईकडून मुलाला संसर्ग जाणे ही प्रसाराची आणखी महत्त्वाची कारणे आहेत. हेमोडायलिसिसवर असलेल्या रुग्णांना या आजारांपासून जास्त धोका संभवतो. कित्येक वर्षे हे विषाणू कोणतीही लक्षणे न दाखवता शरीरात राहतात. पुरेशी काळजी घेतल्यास टोकाचा आजार बरा होऊ शकतो.

मात्र, घरगुती उपाय हानिकारक ठरू शकतात. आजार झालेल्यांवर कोणतेही खाण्यापिण्याचे निर्बंध नाहीत. सर्वसाधारण समजूत आहे त्यानुसार पिवळ्या रंगाचे पदार्थ (उदाहरणार्थ हळद) पोटात गेल्याने आजार बळावत नाही. घर किंवा कार्यालयात रुग्ण असला तरी बी आणि सी प्रकारांचा संसर्ग होत नाही. लवकर निदान आणि उपचार तसेच या आजाराला लागलेला सामाजिक कलंक कमी करणे महत्त्वाचे आहे.

हिपॅटिटिसच्या उपचारावर बऱ्यापैकी खर्च होतो. रुग्णाचे मानसिक आरोग्य बिघडते. म्हणून वेळीच निदान आणि उपचार गरजेचे असतात. भारतात एक तर याविषयी पुरेशी जागृती नाही, निदानाच्या सुविधा अपुऱ्या पडतात; तरी सरकारने ‘नॅशनल व्हायरल हिपॅटायटीस नियंत्रण कार्यक्रम’ राबवून मोफत निदान आणि उपचार उपलब्ध करून दिले आहेत. जागृती आणि वेळीच उपचार हेच हा आजार रोखण्यासाठी महत्त्वाचे आहे.

ए आणि बी प्रकारच्या हिपॅटिटिसवर लसही उपलब्ध आहे. सी वर प्रभावी उपचार होऊ शकतात. हा असाध्य आजार नाही. नियमित चाचण्या, वेळीच उपचार आणि लसीकरण यावर भर देऊन यंदा ‘वी आर नॉट वेटिंग’ असा उद्घोष करण्यात आला आहे. म्हणून आजच्या जागतिक हिपॅटायटीस दिनी आपण सर्व मिळून जगाला या विषाणूजन्य आजाराच्या विळख्यातून सोडविण्यासाठी वचनबद्ध होऊया. निदान झालेले रुग्ण शोधून त्यांना उपचार देऊन, प्रतिबंधात्मक उपाय योजून लक्षावधी लोकांचा जीव आपण वाचवू शकतो.