शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय वृत्तसंस्थेच्या पत्रकाराने भारताच्या आरोपावर प्रश्न विचारला, अन् ट्रम्प यांचे तोंड बंद झाले...
2
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे', ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही
3
प्रियकरासोबत संबंध बनवताना प्रायव्हेट पार्टला इजा; महिलेने मुंबई पोलिसांना गंडवलं, सत्य भलतेच निघाले
4
वाहन विमा नाही? मग भरा पाचपट दंड...! ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरणासाठीही नवीन अटी
5
पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा
6
फक्त रशियचां तेल नाही, तर 'या' ३ कारणामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचा तिळपापड; भारताला पुन्हा धमकी
7
'पाच महिन्यात पाच युद्ध थांबवली आता...'; ट्रम्प यांनी पुन्हा घेतले भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे श्रेय
8
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
9
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
10
हिंगोली रेल्वेस्टेशनवरील उभ्या बोगीला आग; संपूर्णतः जळून खाक
11
Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार
12
राजा रघुवंशी २.०; बॉयफ्रेंडसोबत थाटायचा होता संसार, पत्नीने पतीला जंगलात बोलावलं अन्...
13
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
14
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
15
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
16
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
17
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
18
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
19
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
20
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान

शिरस्त्राणाय...

By admin | Updated: February 11, 2016 03:51 IST

हेल्मेटसक्ती हा विषय पुण्याला नवा नाही. मात्र, लोकानुनयाची भूमिका घेताना किती वाहवत जायचे याचे भान नसणाऱ्या राजकारण्यांकडून ही सक्ती हाणून पाडली जात आहे़

- विजय बाविस्करहेल्मेटसक्ती हा विषय पुण्याला नवा नाही. मात्र, लोकानुनयाची भूमिका घेताना किती वाहवत जायचे याचे भान नसणाऱ्या राजकारण्यांकडून ही सक्ती हाणून पाडली जात आहे़.‘ज्याचे करावे भले, तो म्हणतो माझेच खरे’ ही उक्ती सध्या पुण्यातील हेल्मेटसक्तीबाबत खरी ठरू लागली आहे का, असे वातावरण आहे. मोटार वाहन कायद्यातील एक नियम आणि त्यावर पुन्हा न्यायालयाचा आदेश असताना पुण्यामध्ये हेल्मेट घालण्याची सक्ती करणाऱ्या पोलिसांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जात आहे. हेल्मेटसक्ती हा विषय पुण्याला नवा नाही. वाहतूक पोलिसांनी अनेकदा याबाबत पावले उचलली आहेत. मात्र, लोकानुनयाची भूमिका घेतानाही किती वाहवत जायचे याचे भान नसणाऱ्या राजकारण्यांकडून ही सक्ती हाणून पाडली गेली. मुळात प्रश्न असा आहे की, एखादा नियम, कायदा असताना तो पाळणार नाही म्हणणे लोकानुनयाच्या कोणत्या तत्वात बसते? केवळ थोड्याशा रुपयांची गुंतवणूक आणि थोडीशी गैरसोय (खरे म्हणजे हा देखील कांगावाच) यामुळे एखाद्याचे प्राण वाचत असतील तर त्याला विरोध कशासाठी करायचा? रस्त्यावर होणाऱ्या अपघातांनी अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाल्याच्या अनेक कहाण्या आहेत. सध्याची वाहतूक व्यवस्था पाहाता सुरक्षा म्हणून किमान शिरस्त्राण वापरण्यास काय हरकत आहे. पोलिसांची आकडेवारी तर सांगतेच, पण प्रत्येकाने अगदी आपल्या सभोवतालच्या घटना बघितल्या तरी हेल्मेट नसल्याने काय घडू शकते? एखाद्या कुटुंबावर काळाचा घाला कसा पडू शकतो, हे दिसून येते. काही महिन्यापूर्वीच पुण्यात ज्येष्ठ गझलकार प्रदीप निफाडकर यांची मुलगी प्रांजली हिचा मृत्यू झाला. सकाळच्या वेळी ट्रॅफीक नसताना दुचाकींच्या धडकेत प्रांजलीला प्राण गमावावा लागला. आई-वडील, पतीवर दु:खाचा डोंगर कोसळला आणि तिचे दीड वर्षांचे बाळ पोरके झाले़ या घटनेपासून निफाडकर हेल्मेट वापराबाबत जनजागृती करीत आहेत. त्यांच्यासारख्याच अनेक कुटुंबांचे दु:ख पाहिल्यावर हेल्मेटसक्तीला विरोधाची हिंमतही कोणाला होणार नाही. मात्र, सार्वजनिक हिताच्या प्रश्नातही राजकारण आणले जाते. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी संपूर्ण राज्यात हेल्मेटसक्ती केल्यावर कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेसपासून सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनीही विरोधासाठी रस्त्यावर येण्याची भूमिका घेतली. महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून शिवसेनेचे शहरप्रमुख विनायक निम्हण यांनाही आंदोलनात सहभागी होण्याशिवाय पर्याय राहिला नाही. राज ठाकरे यांनीही भाजपावर टिकेची संधी म्हणून या सक्तीकडे पाहिले़ एवढी मोठी राजकीय फळी विरोधात उभी राहिल्यावर सक्तीच्या बाजूने उभे राहणे कोणालाही शक्य झाले नाही. रावते यानाही तातडीने पुण्यात येऊन बैठक घ्यावी लागली. मात्र, त्यांनी हेल्मेटसक्तीचे मूळ केंद्राच्या कायद्यात असल्याचे सांगत भाजपाच्या कोर्टात चेंडू भिरकाविला. हे राजकारण सुरू असताना हेल्मेट वापराविरोधात ठोस मुद्देच कोणाकडे नाहीत. पुण्याच्या वाहतूक कोंडीपासून ते हेल्मेटमुळे टक्कल पडते, श्वास कोंडतो, मागचे दिसत नाही येथपासून काहीही कारणे दिली जातात. चष्मा वापरणाऱ्यांना सुध्दा सुरूवातीला त्रास होतो. म्हणून कोणी चष्म्याला नाही म्हणत नाही़ हेल्मेटवापरासाठी जनजागृती करायला हवी, मग ती करायची कोणी? कोणत्या राजकारण्याने आजपर्यंत सभेत हेल्मेट वापराचे आवाहन केले आहे. २००४ साली सिम्बॉयसिसच्या विद्यार्थ्यांच्या याचिकेवर न्यायालयाने हेल्मेट वापरणे सक्तीचे असल्याचा निर्णय दिला होता. एक तप जी जनजागृती झाली नाही ती आता कशी आणि कधी करणार? आम्हीच विरोध करणार आणि पुन्हा पुणेकरांच्या ट्रॅफीक सेन्सबाबत शेरे मारत चीनच्या कम्युनिस्ट सरकारचे दाखलेही देणार. एक मात्र खरे की हेल्मेटसक्तीचा निर्णय हा घाईगडबडीत राबविला गेला. पुण्याचे पालकमंत्री आणि खासदार यांनीही याच भावना व्यक्त केल्या आहेत. विरोधकांकडून हेल्मेट उत्पादकांच्या कंपन्यांची लॉबी या निर्णयामागे असल्याचा आरोप होत आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनीही चर्चेविना हा निर्णय थोपविला. त्यामुळे त्यांनाही एकच विचारावेसे वाटते..बेकरारी बेवजह नहीं गालिब, कुछ तो है जिसकी पर्दादारी है!