शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, प्रस्ताव मिळताच मदतनिधी देणार; PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
2
आजचे राशीभविष्य, २७ सप्टेंबर २०२५: जमीन, घर अथवा वाहन खरेदीसाठी आजचा दिवस अनुकूल नाही
3
ठाण्यात भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष; एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेत बैठकीला गणेश नाईकांचा ‘बहिष्कार’
4
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक
5
१६५ तोळे सोने, दोन किलो चांदी अन् ११ लाख राेख देऊनही छळ; मायानगरी मुंबईत विवाहितेचा गर्भपात
6
मढ बेट बनावट नकाशा प्रकरणाची गहाळ फाइल शोधा, अन्यथा गुन्हा दाखल करा; हायकोर्टाचे निर्देश
7
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच संपवत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
8
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
9
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
10
पीएनबी घोटाळा: सीबीआय न्यायालयात अर्जास मान्यता; नीरव मोदीचा मेव्हणा ‘माफीचा साक्षीदार’
11
‘सीएसएमटी’वरील १८ नंबरचा प्लॅटफॉर्म ३ महिने बंद राहणार; १ ऑक्टोबरपासून पायाभूत कामे
12
दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वेचा मेगाब्लॉक; तिन्ही मार्गांवर रविवारी होणार ‘प्रवासखोळंबा’
13
तीन कोटी खर्चून ‘उपचार’, तरीही आईची प्रकृती सुधारेना; मुलाची पोलीस स्टेशनला तक्रार, तपास सुरू
14
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
15
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
16
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
17
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
18
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
19
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
20
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!

राजकीय ‘अ‍ॅनिमल फार्म’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 00:19 IST

​​​​​​​जॉर्ज आॅर्वेल या प्रख्यात इंग्लिश लेखकाने विसाव्या शतकात लिहिलेली ‘अ‍ॅनिमल फार्म’ ही कादंबरी बहुदा भारतातील वर्तमान राजकीय परिस्थितीचे पूर्वाकलन करूनच लिहिली असावी, अशी शंका घेण्यास पुरेपूर वाव आहे.

- नंदकिशोर पाटीलजॉर्ज आॅर्वेल या प्रख्यात इंग्लिश लेखकाने विसाव्या शतकात लिहिलेली ‘अ‍ॅनिमल फार्म’ ही कादंबरी बहुदा भारतातील वर्तमान राजकीय परिस्थितीचे पूर्वाकलन करूनच लिहिली असावी, अशी शंका घेण्यास पुरेपूर वाव आहे. किंबहुना, या कादंबरीतील पात्रं आणि आशय बघता तशी खात्रीच पटते. रामराज्याची स्वप्नं दाखवून एखाद्याने आपणास चक्क कीर्र जंगलात सोडावे आणि अवतीभवतीची श्वापदं, वन्यप्राणी बघून आपली घाबरगुंडी उडावी, अशी आपली गत हल्ली राजकीय नेत्यांची भाषणं ऐकताना होते. आपापल्या समर्थकांना ‘पंचतंत्रा’तील गोष्टी ऐकवून जे काही राजकीय मंथन घडविले जाऊ पाहात आहे, ते ऐकून समर्थकांची नव्हे, तर श्वापदांचीच पाचावर धारण बसण्याची वेळ आली आहे. विरोधकांना साप, मुंगूस, उंदीर आणि श्वानाची उपमा देऊन स्वत:ला सिंह म्हणवता येत असेलही; पण इवलासा ससाही सिंहाला कधीकधी भारी ठरू शकतो. इसापनीतीची ही गोष्ट सिंहानी (शहांनी नव्हे!) वाचवी अशी-एका जंगलातील सिंहाचे पोट भरलेले असतानाही तो केवळ शक्तिप्रदर्शन करण्यासाठी दररोज अनेक प्राण्यांना ठार मारत असे. एके दिवशी कोल्ह्याच्या नेतृत्वाखाली प्राण्यांचे एक शिष्टमंडळ सिंहाकडे गेले. कोल्हा म्हणाला, ‘महाराज, आपणास शिकार करण्याचे कष्ट पडू नयेत, म्हणून आम्ही सर्वांनी मिळून ठरवलं आहे की दररोज आमच्यापैकी एक प्राणी आपल्याकडे येईल आणि आपले भोजन बनेल.’ कोल्ह्याचा हा प्रस्ताव ऐकून सिंह मनोमन आनंदीत झाला. त्याने प्रस्ताव मान्य केला. सर्व प्राणी निर्भय होऊन परतले. ठरल्याप्रमाणे पाळीपाळीने रोज एक प्राणी सिंहाकडे जाऊ लागला. एके दिवशी सशाची पाळी आली. सशाची घाबरगुंडी उडाली. रोज मनसोक्त बागडणारा ससा सिंहाचे भक्ष्य होण्यास सहजी तयार नव्हता. त्याच्या मनात विचार आला. खरंच! सिंहाला मारण्याचा काही उपाय मिळाला तर? वाटेत सशाला एक विहीर दिसली. त्याने विहिरीत डोकावून पहिले असता त्याला स्वत:चे प्रतिबिंब दिसले. सशाला शक्कल सापडल्याने तो वाटेमध्ये मुद्दामहून थोडा वेळ बसून राहिला. एकडे सिंहाला सपाटून भूक लागलेली. आपल्या भक्ष्याची वाट पाहत बसलेला असताना समोरून ससा येत असताना त्याला दिसला. चवताळेल्या सिंहाने विचारले, ‘काय रे सशा, तू एवढा वेळ का लावलास?’ अत्यंत विनयशील होत ससा उत्तरला, ‘महाराज, यात माझा मुळीच दोष नाही. आपण मला परवानगी दिलीत, तर मला उशीर होण्याचं कारण मी आपणास सांगू शकेन’ ‘जे सांगायचे असेल, ते लवकर सांग’ सिंह गरजला. ससा म्हणाला, ‘महाराज, रस्त्यात अचानक एक दुसरा सिंह भेटला. तो म्हणाला, जंगलाचा राजा तर मी आहे. तू कुठे जात आहेस? जर दुसरा कुणी स्वत:ला राजा म्हणत असेल तर त्याने माझ्याशी आधी युद्ध करावं आणि मला हरवावं!’ सशाचे हे निवेदन ऐकून सिंहाचे पित्त खवळले. सशाने सिंहाला त्या विहिरीपाशी नेले. सिंहाने विहिरीत डोकावून पाहिले. त्याला वाटले, खरंच!आपला प्रतिस्पर्धी विहिरीत लपून बसला आहे. लागलीच तो स्वत:च्या प्रतिबिंबावर झेपावला आणि विहिरीत बुडून मेला! सर्व प्राण्यांना खूप आनंद झाला. त्यांनी सशाचे आभार मानले अन् सर्वांनी मिळून आनंदोत्सव साजरा केला!(तात्पर्य: तुम्हीच काढा!)