शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

गोरक्षकांना समज

By admin | Updated: April 12, 2017 03:24 IST

गोरक्षणाच्या नावाखाली तथाकथित गोरक्षकांनी देशात आणि प्रामुख्याने भाजपाशासित राज्यांमध्ये जो धुमाकूळ घातला आहे त्याची दखल अखेर सरसंघचालकांना घ्यावीच लागली.

गोरक्षणाच्या नावाखाली तथाकथित गोरक्षकांनी देशात आणि प्रामुख्याने भाजपाशासित राज्यांमध्ये जो धुमाकूळ घातला आहे त्याची दखल अखेर सरसंघचालकांना घ्यावीच लागली. गोरक्षण करताना कुणाच्या भावना दुखावतील असे कृत्य अथवा हिंसाचार होता कामा नये. कायद्याचे पालन करूनच गोरक्षण झाले पाहिजे, अशी समज सरसंघचालकांनी या हैदोस घालणाऱ्या गोरक्षकांना दिली आहे. राजस्थानातील अलवरमध्ये गोरक्षकांच्या मारहाणीत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर गोरक्षकांच्या हैदोसाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. केंद्रात मोदी सरकार आणि काही राज्यांमध्ये भाजपाचे शासन आल्यापासून या गोरक्षकांचा उपद्रव प्रचंड वाढला आहे. प्रथम उत्तर प्रदेशातील दादरीकांड झाले. त्यानंतर गुजरातेत उनामध्ये मृत गाईचे कातडे काढणाऱ्या दलितांना बेदम मारहाण करण्यात आली. एवढ्यावरच त्यांची मजल थांबली नाही. कर्नाटकच्या उडिपीमध्ये गायी चोरट्या मार्गाने कत्तलखान्याकडे नेण्याचा ठपका ठेवत एका ग्राम स्थायी समितीच्या प्रमुखास त्याचा जीव जाईपर्यत मारहाण करण्याचा नृशंस प्रकार घडला. ताज्या घटनेत अलवरमध्ये काही लोक गायी घेऊन जात असताना त्यांच्यावर हल्लाबोल झाला. विशेष म्हणजे, त्यांनी गायी अधिकृतपणे खरेदी केल्याची पावती हिंसाखोरांना दाखविण्याचा प्रयत्नही केला. पण स्वत:ला गोरक्षणाचे ठेकेदार समजणाऱ्या या कथित गोरक्षकांची टाळकी एवढी भडकली होती की त्याची शहानिशा करण्याची गरजही त्यांना वाटली नाही. यातील सर्वात मोठे दुर्दैव म्हणजे त्या राज्याच्या गृहमंत्र्यांनी गोरक्षकांनी काम चांगले केले पण कायदा मोडला, असे अत्यंत बेजबाबदार विधान केले. आणि राज्यसभेत विरोधकांनी हा मुद्दा उपस्थित केला तेव्हा संसदीय कामकाज राज्यमंत्र्यांनी अलवरमध्ये असे काही घडलेच नाही असे सांगून जी दिशाभूल केली ती अशोभनीय आहे. आजवरच्या या घटना आणि त्यानंतर भाजपाच्या काही नेत्यांनी केलेल्या वक्तव्यांचा विचार केल्यास प्रत्येक वेळी या हिंसक गोरक्षकांना पाठीशी घालण्याचाच प्रयत्न झाल्याचे निदर्शनास येते. आता खुद्द सरसंघचालकांनीच कान टोचले आहेत. त्यामुळे गोरक्षणाच्या आड होणाऱ्या या हिंसाचाराला आळा बसेल अशी अपेक्षा बाळगण्यास हरकत नाही. अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीसुद्धा यापूर्वी गुजरातेतील घटनेनंतर हिंसाचार करणारे खरे गोरक्षक नाहीतच. त्यांना सच्चा गोसेवकांनी उघड पाडावे, असे आवाहन केले होते. पण त्यांच्या या आवाहनाचा फारसा परिणाम झालेला दिसत नाही. अलीकडच्या काळात गोरक्षण आणि इतर काही मुद्द्यांवरून भाजपा नेत्यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे हा पक्ष बळजबरीने आपली विचारसरणी लादण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप विरोधकांकडून होत असल्यास त्याचा गांभीर्याने विचार व्हायला हवा. कारण भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशात कुणीही आपली श्रद्धा किंवा आस्था दुसऱ्यावर लादणे योग्य ठरणार नाही, हे प्रत्येकानेच समजून घेतले पाहिजे.