शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: पुन्हा अतिवृष्टीचे संकट? आज, उद्या 'या' जिल्ह्यांत पाऊस घालणार धुमाकूळ, IMD सतर्कतेचा इशारा
2
"उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक
3
काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केली तर २४ महिन्यांनंतर किती रुपये मिळतील? पटापट पाहा कॅलक्युलेशन
5
केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, प्रस्ताव मिळताच मदतनिधी देणार; PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
6
चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा
7
राज्यातील ८९ फार्मसी महाविद्यालयांची मान्यता रद्द; तंत्रशिक्षण विभागाचा मोठा निर्णय
8
आजचे राशीभविष्य, २७ सप्टेंबर २०२५: जमीन, घर अथवा वाहन खरेदीसाठी आजचा दिवस अनुकूल नाही
9
ठाण्यात भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष; एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेत बैठकीला गणेश नाईकांचा ‘बहिष्कार’
10
आधी नगरपालिका की जिल्हा परिषद?;निवडणूक आयोगाची दोन्हींसाठी तयारी सुरू
11
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक
12
१६५ तोळे सोने, दोन किलो चांदी अन् ११ लाख राेख देऊनही छळ; मायानगरी मुंबईत विवाहितेचा गर्भपात
13
मढ बेट बनावट नकाशा प्रकरणाची गहाळ फाइल शोधा, अन्यथा गुन्हा दाखल करा; हायकोर्टाचे निर्देश
14
पीएनबी घोटाळा: सीबीआय न्यायालयात अर्जास मान्यता; नीरव मोदीचा मेव्हणा ‘माफीचा साक्षीदार’
15
आता पहिलीपासूनच शिका शेती; शालेय अभ्यासक्रमात टप्प्याटप्प्याने कृषी विषयाचा समावेश
16
दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वेचा मेगाब्लॉक; तिन्ही मार्गांवर रविवारी होणार ‘प्रवासखोळंबा’
17
तीन कोटी खर्चून ‘उपचार’, तरीही आईची प्रकृती सुधारेना; मुलाची पोलीस स्टेशनला तक्रार, तपास सुरू
18
चिंताजनक ‘लडाख फाइल्स’! सोनम वांगचुक यांना देशद्रोही ठरवून तुरुंगात सडविणे दिसते तितके सोपे नाही
19
ट्रम्प, जिमी किमेल आणि गुदगुल्यांचा ‘खंजीर’! ही एकी जगभरातील माध्यमांसाठी एक संदेशच...

नंगे को खुदा भी डरता है

By admin | Updated: January 31, 2016 01:05 IST

इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रोहानी यांच्या भावनांची कदर करण्यासाठी इटलीमध्ये सौंदर्याचे उत्कृष्ट नमुने म्हणून पाहिल्या जाणाऱ्या नग्न पुतळ्यांना झाकून ठेवले गेले, पण यात अब्रू गेली,

(सोळा आणे सच)

-  विनायक पात्रुडकर (लेखक मुंबई आवृत्तीचे कार्यकारी संपादक आहेत.)

इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रोहानी यांच्या भावनांची कदर करण्यासाठी इटलीमध्ये सौंदर्याचे उत्कृष्ट नमुने म्हणून पाहिल्या जाणाऱ्या नग्न पुतळ्यांना झाकून ठेवले गेले, पण यात अब्रू गेली, ती कलासक्त रोम शहराचीच.आपल्या घरात जर कुणी पाहुणे येणार असतील, तर साहजिकच आपण घर आवरतो. नीटनेटके दिसेल, इतपत घराची झटपट रचना करतो. घरात येणाऱ्या पाहुण्याच्या मनात आपण गबाळे नाहीत, अशी भावना निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. हे स्वाभाविकही आहे. तीच गोष्ट देशात येणाऱ्या पाहुण्यांची असते. एखाद्या देशाचा पंतप्रधान अथवा राष्ट्राध्यक्ष आपल्याकडे येणार असेल, तर आपणही रस्ते झाडून साफ करतो. पाहुण्यांपुढे आपल्या देशाची प्रतिष्ठा कमी होणार नाही, याची काळजी घेतो. पाहुण्यांच्या स्वागतासाठी सांस्कृतिक कार्यक्रमही ठेवतो. आपल्या देशाच्या कला-संस्कृतीचे प्रदर्शनही या निमित्ताने घडवतो. कलेच्या माध्यमातून देशाच्या महान परंपरेचा संदेशही देतो. आपल्या देशाला कलेचा उत्तम वारसा कसा लाभलेला आहे, याची साग्रसंगीत माहिती पाहुण्यांना देत असतो. हे झालं सार्वत्रिक चित्र, पण तिकडे इटलीमध्ये वेगळेच घडले.इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रोहानी तब्बल १७ वर्षांनंतर प्रथमच इटलीच्या दौऱ्यावर गेले. इटलीची राजधानी रोममध्ये पंतप्रधान मतेओ रेन्झी यांच्याशी व्यापारी करारही केला. इराण रूढीप्रिय मुस्लीम राष्ट्र असल्याने, त्यांच्या राष्ट्राध्यक्षांना अप्रतिष्ठित वाटू नये याची काळजी इटलीने घेतली होती. खरं तर रोमन साम्राज्याची जगाला मोठी देणगी आहेच. ग्रीक शिल्पाकृतीची तर जगभर चर्चा होतच असते. जगाच्या कलाजगताचा अभ्यास करताना रोमच्या कलाकृतींशिवाय अभ्यास पुढे सरकत नाही. ग्रीक शिल्प असो, चित्र असो, त्यांच्या आखीव-रेखीव इमारती असो, या साऱ्यांमध्ये इटलीने एके काळी जगाचे नेतृत्व केले होते, हा इतिहास आहे. ग्रीक थिंकर असो वा पीळदार पुष्ठ स्नायूंचे नग्न पुतळे असो, या कलाकृतींनी जगभर भुरळ पाडली. जगभरचे कलासक्त रसिक रोमची आणि अलीकडच्या काळात पॅरिसची सफर केल्याशिवाय राहत नाहीत, हे तितकेच खरे आहे. इटलीच्या नग्न शिल्पाकृतीचा त्या देशालाही तितकाच अभिमान आहे. जगातील सर्वात जुने शहर असलेल्या रोमने शेकडो लढाया होऊनही शिल्पाकृतींचा वारसा मोठ्या ममत्वाने जपला आहे.जगाच्या पुरोगामी विचारांची लढाई जिंकणाऱ्या इटलीला परवाच्या घटनेने थोडा कलंक लागला आहे हे मात्र नक्की. इराणचे राष्ट्राध्यक्ष रोहानी आणि इटलीचे पंतप्रधान रेन्झी यांची संयुक्त पत्रकार परिषद रोमच्या कॅपिटोलाइन म्युझियममध्ये ठेवण्यात आली होती. या म्युझियममध्ये प्रवेशाच्या वेळी देखणे नग्न पुतळे होते. रूढीप्रिय रोहानी यांना कदाचित या नग्न पुतळ्यांमुळे अप्रतिष्ठित वाटू शकते, अशी शक्यता लक्षात घेऊन, तिथल्या सांस्कृतिक विभागाने हे नग्न पुतळेच झाकून ठेवले. इराणबरोबर पूर्वी इटलीचे व्यापारी घनिष्ठ संबंध होते. त्यानंतर अणुऊर्जा करारावर स्वाक्षरी करण्यास नकार देणाऱ्या इराणवर आर्थिक निर्बंध टाकण्यात आले होते. गेल्याच महिन्यात हे निर्बंध उठविण्यात आले. इराण हा व्यापारासाठी प्रचंड सक्षम असलेला प्रदेश असल्याने, युरोपियन राष्ट्रांनी इराणसाठी पायघड्या घातल्या. त्याची पहिली सुरुवात इटलीच्या दौऱ्यातून झाली. इटलीबरोबर इराणने तब्बल १७०० दशलक्ष युरोचा व्यापारी करार केला. हा करार व्हावा, म्हणून इटलीची धडपड सुरू होती. त्यासाठी कोणतीही तडजोड करण्याची तयारी होती. त्याचाच परिणाम म्हणून नग्न शिल्पाकृतीही झाकून ठेवण्यात आल्या, परंतु या घटनेची युरोपात नव्हे, तर जगभर दखल घेतली गेली. सोशल मीडियावर इटलीची खिल्ली उडविण्यात आली.नग्नतेमध्ये सौंदर्य पहायचे की लैंगिकता, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. लैंगिकता ही आदिम भावना आहे. जिथे-तिथे ती दाबण्याचा प्रयत्न झाला. तिथल्या समाजामध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली, हा इतिहास सांगतो. या आदिम भावनेला ग्रीक कलाकारांनी सौंदर्याचे अप्रतिम वळण दिले आणि जगानेही त्याचे स्वागत केले. त्या पुढारलेल्या ग्रीकला हे नग्न पुतळे झाकण्याची वेळ का यावी? इतकी व्यापारी हतबलता इटलीवर यावी? या घटनेची जगभरच्या माध्यमांनी नोंद घेतल्यानंतर, दोन्ही देशांनी सारवासारव करण्याचा प्रयत्नही केला. इटलीच्या पंतप्रधान कार्यालयातून या घटनेचा दुरान्वयानेही संबंध नसल्याने पत्रकच काढण्यात आले. इटलीच्या सांस्कृतिक मंत्र्यांनीही अधिकाऱ्यांवर जबाबदारी ढकलून दिली. इटलीच्या रोहानींचा त्यानंतर फ्रान्सचा दौरा झाला. त्या वेळीही सांस्कृतिक संघर्षांची ठिणगी पडली. फ्रान्सचे पंतप्रधान ओलांद यांनी रोहानी यांच्या आगमनानिमित्त मेजवानी ठेवली होती. त्या भोजनाच्या यादीत फ्रान्सची प्रसिद्ध वाइनही होती. इराणच्या अधिकाऱ्यांनी वाइनला आक्षेप घेतला. फ्रान्सने ती मेजवानीच रद्द केली. या घटनेचीही जगभर दखल घेतली गेली.फ्रान्सचाही इराणबरोबर व्यापारी करार झाला, पण फ्रान्सने इराणपुढे लाळघोटेपणा केला नाही. त्या पार्श्वभूमीवर इटलीची घटना अधिक गडद झाली. टीकेचा चौफेर मारा झाला. नग्न पुतळे झाकण्याची गरज नव्हती, उलट ते झाकल्यामुळे अधिक अब्रू गेली. इटलीच्या त्या अधिकाऱ्यांवर आता कारवाईची भाषा सुरू झाली आहे, पण ‘हौदसे गई वो बुंदसे नही आती’. कारण इटलीने नग्न सौंदर्य शिल्पे झाकून ‘नंगे को खुदा भी डरता है’ या म्हणीचा जणू प्रत्ययच दिला. इटलीला ज्याचा अभिमान होता, तीच त्यांच्या लज्जेची गोष्ट बनली. यावरून प्रागतिक देशाची अधोगती मात्र झाली, हे म्हणण्याला जागा उरली हेही तितकेच खरे. या घटनेच्या निमित्ताने मानवी श्लील-अश्लीलतेच्या विचारांचे नग्न दर्शन पहायला मिळाले.