शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
5
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
6
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
7
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
10
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
11
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
12
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
14
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
15
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
16
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
17
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
18
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
19
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
20
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा

जागतिक व्यापार जातोय रसातळाला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2020 00:42 IST

आयातीवर जसा परिणाम झाला आहे, तसाच निर्यातीवरही झाला आहे. जागतिक व्यापार संघटनेच्या अभ्यासानुसार, आधीच बहुसंख्य आशियाई देशांची निर्यात आयातीपेक्षा खूपच कमी आहे;

ठळक मुद्देसर्वाधिक फटका आशियाला; भूकबळींची संख्या वाढणार

‘कोरोना’ कथा‘कोरोना’मुळे अख्ख्या जगाचा व्यापारउदीम जवळपास ठप्प झाला आहे. जागतिक व्यापार संघटनेनंही याबद्दल तीव्र चिंता व्यक्त केलीआहे. जगातला कोणताही देश यातून सुटणार नाहीअसं सांगताना ही संघटना वस्तुस्थितीवर नेमकंबोट ठेवते आहे. आजच्या घडीलाच कोरोनामुळे जागतिक व्यापारालासुमारे तीस टक्के फटका बसला आहे.जग/आशियाकोरोना व्हायरसनं अख्ख्या जगालाच अस्थिरतेच्या उंबरठ्यावर आणून ठेवलं आहे. ही अस्थिरता कधी संपेल, जीवन सर्वसामान्य कधी होईल, काहीच सांगता येत नाही. अजूनही अनेक देश आपापल्या अपुऱ्या आरोग्यसेवेनिशी कोरोनाशी लढण्याचा प्रयत्न करताहेत. मृतांची संख्या रोज वाढतेच आहे. अख्ख्या जगाचा व्यापारउदीम जवळपास ठप्प झाला आहे.जागतिक व्यापार संघटनेनंही याबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. जगातला कोणताही देश यातून सुटणार नाही असं सांगताना जागतिक व्यापार संघटना वस्तुस्थितीवर नेमकं बोट ठेवते आहे. आजच्या घडीलाच कोरोनामुळे जागतिक व्यापाराला सुमारे तीस टक्के फटका बसला आहे. अनेक देशांसाठी हा आघात वेगवेगळा असला तरी कोणत्याही देशासाठी दोन आकड्यांपेक्षा कमी नाही.

आयातीवर जसा परिणाम झाला आहे, तसाच निर्यातीवरही झाला आहे. जागतिक व्यापार संघटनेच्या अभ्यासानुसार, आधीच बहुसंख्य आशियाई देशांची निर्यात आयातीपेक्षा खूपच कमी आहे; पण जी काही निर्यात आहे, तीही ठप्प झाली आहे. याचा आशियाई देशांच्या अर्थव्यवस्थेवर मोठा विपरित परिणाम झाला आहे. उत्तर अमेरिकेच्या निर्यातीलाही प्रचंड मोठा फटका बसला आहे. आशियाई देशांना या संकटातून सावरायचं तर त्यासाठी त्यांना लवकरात लवकर आणि अनेक आघाड्यांवर तातडीनं प्रयत्न करावे लागतील. तज्ज्ञांचं म्हणणं आहे, नाहीतर आशियाई देशात भूकबळी वाढायला फार वेळ लागणार नाही. जागतिक व्यापाराच्या अनिश्चिततेची ही परिस्थिती किमान वर्षभर तरी चालेल, असा अंदाज आहे. तरीही खात्रीनं अजून काहीच सांगता येत नाही. कारण कोरोना आपली विखारी पंजे अधिकाधिक आवळतोच आहे आणि त्यावर रामबाण इलाज अजून सापडलेला नाही.केवळ दोन महिन्यांतच जागतिक व्यापारातील उलाढाल १२ ते ३२ टक्क्यांनी कमी झालेली आहे. आंतरराष्टÑीय नाणेनिधीनंही यासंदर्भात धोक्याची घंटा वाजविलेली आहे. त्यांचं म्हणणं आहे की, कोरोनानं जगाच्याच डोळ्यांत पाणी आणलं आहे. केवळ तीन महिन्यांपूर्वी जागतिक विकास यावर्षी किमान ३.३ टक्क्यांनी वाढेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता; पण विकास दूरच, आताच्या घडीला जागतिक विकासात तब्बल तीन टक्क्यांनी घट झाली आहे.एका अभ्यासानुसार, इंग्लंडच्या अर्थव्यवस्थेचंही कंबरडं कोरोनानं मोडलं आहे. केवळ दुसºया तिमाहीतच त्यांच्या अर्थव्यवस्थेला किमान ३५ टक्के भगदाड पडेल असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. एकीकडे अर्थव्यवस्था मोडकळीस आलेली, तर दुसरीकडे लोकांचे रोजगारही झपाट्यानं जाताहेत. उद्योगधंदे बंद पडल्यामुळे लाखो लोक बेघर होताहेत. सरकारच्या अधिकृत माहितीनुसार, दोन महिन्यांत इंग्लंडमधल्या वीस लाख लोकांना रोजगार गमवावा लागला आहे.जागतिक अर्थव्यवस्था रुळावर आणायची तर आधी सर्व उद्योगधंदे पूर्ण क्षमतेनं सुरू व्हायला हवेत. ते सुरू झाले तरी लोकांची त्याला मागणी असली पाहिजे. कारण कोरोनानं आता लोकांचे प्राधान्यक्रमच पूर्णत: बदलून टाकले आहे. या परिस्थितीतून सावरायचं तर संपूर्ण जगालाच आपापले मतभेद बाजूला ठेवून जागतिक कल्याणाच्या द्ृष्टीनं पावलं उचलावे लागतील, असा सल्लाही तज्ञांनी दिला आहे. 

 

टॅग्स :businessव्यवसायcorona virusकोरोना वायरस बातम्या