शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
4
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
5
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
6
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
7
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
8
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
11
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
12
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
13
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
14
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
15
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
16
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
17
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
18
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
19
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन

साई इतना दे दे

By admin | Updated: June 11, 2016 04:45 IST

कुठलेही घर सोडताना मनाला फार यातना होतात. मी आजपर्यंत कधी घर कधी मोजले नाही.

कुठलेही घर सोडताना मनाला फार यातना होतात. मी आजपर्यंत कधी घर कधी मोजले नाही. मुंबईला येण्यापूर्वी घर मोजत असतात हेच माहिती नव्हते. फूटपट्टी कधी लागायचीच नाही. तिचे दोनच उपयोग, एक भूमितीसाठी आणि दुसरा मास्तरांकडून मार खाण्यासाठी. वडिलांची बदलीची नोकरी होती. वडील आधी जाऊन घर बघत. आम्ही मागून समानसुमान घेऊन जायचो. बैठकीची खोली, लांब ओसरी आणि स्वयंपाकघर की झाले घर ! कधीकधी सामानाची किंवा बाळंतिणीची अंधारी खोली असायची. त्यामध्ये दुपारी लपाछपी खेळायला मजा यायची. इथेच अडगळही असायची. आणि प्रशस्त अंगण. औरंगाबादला आल्यावर वडिलांनी स्वत:चे घर बांधले. स्वातंत्र्य सैनिक कॉलनीतील या आमच्या घराशी मात्र खूप आठवणी जोडल्या गेल्या. पुढे लग्न झाल्यानंतरही बदलीच्या निमित्ताने अनेक गावे आणि घरे बदलली. नवे घर आधी परके वाटते. मग थोड्या सोईसवलती करून घेतल्या, सामान लावले की त्याला घरपण येते. बाहेर वावरताना यश मिळाले किंवा अपयशाला सामोरे जावे लागले तरी घर एका मायेने तुम्हाला स्वत:त सामावून घेत असते. मग कधी अचानक ‘प्रशासकीय कारणास्तव आणि जनहितार्थ’ बदलीचा आदेश येतो आणि पुन्हा बांधाबांध करत आपण नव्या घराच्या शोधात निघतो. सुरुवातीला अनोळखी वाटलेले घर सोडताना आता मात्र डोळे भरून येतात. ओक्याबोक्या भिंती आणि त्यांचे रितेपण घराला केविलवाणे करून टाकते. मी डोळ्यातले पाणी निकराने आवरून, हसत घराला नमस्कार करते. ‘येईन तुला परत भेटायला’ असे मनाशी पुटपुटते आणि बांध फुटायच्या आत चुपचाप खाली मान घालून चालायला लागते. मुंबईत मात्र घराच्या नव्या व्याख्या कानावर आल्या. ‘मी ३४० स्क्वेअर फूटमध्ये राहातो’. ‘माझे घर ७०० स्क्वेअर फूटचे आहे’. तर कधी केवळ ‘वन बी.एच.के’ ‘टूबी.एच.के’ असे ऐकू येऊ लागले. घराचा मोठा आकार असणाऱ्यांचा चेहरा कर्तबगारीने फुललेला तर लहान घरवाल्यांच्या चेहऱ्यावर ‘चाललयं कसबसं’ असे भाव. मला मात्र घराचे मोजमाप करायची कल्पना रु चत नाही. आईच्या प्रेमाची किंमत कुणी पैशात किंवा आकड्यात करू शकते का? डोक्यावरच्या छताची सावली महत्वाची, तिचे मोजमाप कशाला काढायचे? मला आजही माझ्या घराचे क्षेत्रफळ माहित नाही, कधी ते मोजलेच नाही व मोजणारही नाही. संत कबीरांनी म्हटले नाही का, ङ्क्त ‘साई इतना दे दे,जामे कुटूम समाय,मै भी भुखा न रहू,साधु भी भुखा न जाय !’ -श्रद्धा बेलसरे-खारकर