शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
2
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
3
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
4
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
5
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
6
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
7
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
8
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
9
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
10
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
11
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
12
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
13
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
14
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
15
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
16
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
17
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
18
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
19
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...

नौटंकी नेत्यांची जबरदस्त अदाकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 02:32 IST

हॉलिवूडच्या एका फिल्म कंपनीला अभिनेते हवे होते, तेव्हा कुणीतरी सांगितलं की, ‘नौटंकी करणारे एक से एक अ‍ॅक्टर सध्या नागपुरात ठाण मांडून बसलेत.’ मग काय.. हॉलिवूड टीम नागपुरात पोहोचली.

- सचिन जवळकोटेहॉलिवूडच्या एका फिल्म कंपनीला अभिनेते हवे होते, तेव्हा कुणीतरी सांगितलं की, ‘नौटंकी करणारे एक से एक अ‍ॅक्टर सध्या नागपुरात ठाण मांडून बसलेत.’ मग काय.. हॉलिवूड टीम नागपुरात पोहोचली. सुरुवातीला विखे-पाटलांना भेटली. ते अ‍ॅक्टिंगसाठी एका अटीवर तयार झाले, ‘मी सरकारवर टीका करेन; पण काही ठराविक नेत्यांवर करणार नाही.’ टीम ‘शिक्षणात पर्यटन’ शोधणा-या विनोदरावांना भेटली. मात्र, त्यांनीही थंडगार भिलारमध्ये शूटिंग करण्याच्या अटीवरच होकार दिला.टीम धनंजयरावांना भेटली. ते ‘सकाळी कार्यक्रमांच्या, दुपारी भाषणांच्या अन् संध्याकाळी स्वत:च्या कार्यकर्तृत्व गौरवाच्या प्रेसनोट रोजच्या रोज कशा वेळेवर पोहोचल्या पाहिजेत,’ हे आपल्या पीएंना समजावण्यात गुंतले होते. एवढा ‘बिझी कलाकार’ आपल्याला परवडणारा नाही, हे ओळखून टीम देवेंद्रपंतांकडं गेली. मात्र, ‘’मी आॅलरेडी पाच वर्षांच्या मुदतीचा करार केलाय, त्यातली सव्वा तीन वर्षे संपलीत. अजून पावणेदोन वर्षाची अ‍ॅक्टिंग संपली की मग तुमचा विचार करू,’ असं त्यांनी नेहमीच्या स्टाईलनं जोरजोरात सांगितलं. तेव्हा ‘साध्या वाक्यालाही खच्चून ओरडणारा अ‍ॅक्टर आपला पिक्चर सुपरहिट करणार,’ याची टीमला खात्री पटली. त्याच आनंदात टीम सोलापुरात पोहोचली. तिथं शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांसोबत चक्क काँग्रेसच्या तिकिटाची चर्चा करण्यात सुशीलकुमार रमले होते. त्यामुळं ‘काँग्रेसचा उमेदवार सेनेचे कार्यकर्ते ठरवतात की पुरुषोत्तमांची भूमिका काय असावी, हे सुशीलकुमार फिक्स करतात,’ याचा विचार करत टीम बारामतीत पोहोचली. तिथं ‘हल्लाबोल’ शब्द लिहिलेला केक कापण्यात थोरले काका मश्गुल होते. त्यांना पिक्चरविषयी विचारलं तेव्हा त्यांनी अत्यंत विनम्रपणे नकार दिला, ‘माझ्याऐवजी हा रोल तुम्ही आमच्या धाकट्या दादांना द्या. माझा वारसा शेवटी त्यांनाच चालवायचाय,’ असं काकांनी सांगताच दादा जणू हवेत तरंगू लागले. मात्र, पुढच्याच वाक्यानं ते झटक्यात जमिनीवर आले.. कारण काका पुढं बोलले, ‘कारण कितीही केलं तरी अ‍ॅक्टिंगमध्ये ते माझ्यापेक्षा काकणभर सरस आहेत म्हटलं.’ टीम बेशुद्ध पडली, हे सांगणे न लगे. 

टॅग्स :nagpurनागपूर