शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

गौरीवर लादली ‘खुनी सेन्सॉरशिप’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 00:10 IST

खून ही सर्वाधिक परिणामकारक आणि अखेरची सेन्सॉरशिप आहे. ती टीकाकाराची भाषा बंद पाडते, त्याची लेखणी हिरावून घेते आणि त्याचे प्राण घेऊन त्याचा भविष्यकालीन बंदोबस्तही करून टाकते.

खून ही सर्वाधिक परिणामकारक आणि अखेरची सेन्सॉरशिप आहे. ती टीकाकाराची भाषा बंद पाडते, त्याची लेखणी हिरावून घेते आणि त्याचे प्राण घेऊन त्याचा भविष्यकालीन बंदोबस्तही करून टाकते. खून करून सेन्सॉरशिप लादणे ही बाब देशात आणीबाणी लावण्याहून व ती अमलात आणण्याहून सोपी आहे. घटनेची कलमे शोधा, राष्ट्रपतींचा वटहुकूम काढा आणि पोलिसांसह तुरुंगाच्या सगळ्या यंत्रणा सज्ज करा, एवढे सारे करण्यापेक्षा आपल्या विश्वासातल्या चारदोन माणसांना सुपारी आणि त्यांनी मागितलेली किंमत एवढे दिले की ही सेन्सॉरशिप कोणावरही व कधीही लादता येते. शिवाय खुनाचे परिणाम मोठे व साºयांना कायमची दहशत बसविणारेही असतात. गौरी लंकेश या ५० वर्षे वयाच्या महिला पत्रकाराची तिच्या राहत्या घरी काही मोटारसायकलस्वारांनी गोळ्या घालून केलेली हत्या हा अशा सोप्या व घटनाबाह्य सेन्सॉरशिपचा ताजा नमुना आहे. नरेंद्र दाभोलकर आणि गोविंदराव पानसरे या दोन मराठी विचारवंतांच्या पाठोपाठ एम.एम. कलबुर्गी या कानडी विचारवंताची याच सेन्सॉरवाल्यांनी हत्या केल्याची प्रकरणे पोलीस तपासात रखडत असतानाच त्यात गौरी लंकेश या दुसºया कानडी पत्रकाराच्या खुनाच्या तपासाची भर पडली आहे. या सेन्सॉरशिपचे महत्त्वाचे वैशिष्ट्य हे की ती लादणारे व त्यांच्या पाठीशी असणारे लोक पोलिसांना व सरकारला कधी सापडत नाहीत. मरणारे मरतात, त्यांचा आवाज तात्पुरता थांबतो, त्यांची लेखणीही स्थिरावते. मग त्यांना मारणारे सरकारच्या कृपेने आनंदात जगतात व सुरक्षित होतात. गौरीचा अपराध कोणता? ती सरकारवर टीका करते, नोटाबंदी, परराष्ट्र व्यवहारातील अपयश, वाढती महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार या साºयांवर ती आपल्या साप्ताहिकातून कोरडे ओढते आणि त्यासाठी होणाºया आंदोलनात आपल्या लोकशाही अधिकारांचा वापर करून ती भागही घेते. (त्यातून या गौरीवर भाजपचे एक खासदार प्रल्हाद जोशी यांनी काही काळापूर्वी बदनामीचा खटलाही दाखल केला होता) मात्र लोकशाही हाच ज्या समाजात टवाळीचा विषय होतो, घटना आणि कायदे जेथे कागदावर राहतात आणि झालाच तर त्यांचा वापर सरकारच्या विरोधकांविरुद्ध, टीकाकारांविरुद्ध आणि सत्ताधाºयांच्या राजकारणाला गैरसोयीचे ठरणाºयांविरुद्धच जेथे होतो तेथे असे खून व अशी मरणे काही काळ चर्चेत राहून विस्मरणात जातात. त्यांचे समर्थन करायलाही काही नामवंत निर्लज्जपणे पुढे येतात. सरकारने दिलेली दोन अभियांत्रिकी महाविद्यालये ताब्यात ठेवून त्यावर ऐश करणाºया एका मराठी पत्रकाराने ‘गौरीचा खून खासगी कारणावरूनही झाला असेल’ असे जे आपल्या पत्रकारितेच्या व्यवसायाचा द्रोह करणारे विधान केले त्याला नवे सरकार आणखी काही देईलही. परंतु तेवढ्याने दाभोलकर ते गौरी यांच्या बलिदानाची सर त्याच्या श्रीमंतीला गाठता येणार नाही. सरकारच्या बाजूने बोला, तसेच लिहा, त्यावर टीका नको, त्याची आरती हवी. ते तुम्ही करणार नसाल तर तुम्ही देशद्रोही किंवा पाकिस्तानी. तरी गौरी लंकेश ही हिंदू होती आणि सरकारवर टीका करण्याचा अधिकार साºयांसारखाच येथील हिंदूंनाही आहे. दाभोलकर, पानसरे व कलबुर्गी हेही हिंदूच होते. गौरीही त्यातलीच. तिचा अपराध एवढाच की ती हिंदू असूनही हिंदुत्ववादी नव्हती. झालेच तर ती विश्व हिंदूही नव्हती. आपल्यासारखी साधी हिंदू होती आणि वादाचा चष्मा डोळ्यावर नसल्याने तिला सरकारचे दोष आणि जनतेच्या हालअपेष्टा दिसत होत्या. आपल्या साप्ताहिकातून ती त्यांनाच वाचा फोडत होती. पण सत्ताधारी मग्रूर असले की त्यांना टीका करणारी कविताही सहन होत नाही. त्यातून सरकारला असंख्य हात असतात. त्यातले बरेचसे दिसणारेही नसतात. लष्कर व पोलीस हे त्याचे दिसणारे हात तर पक्ष कार्यकर्ते, सहयोगी आणि अनुकूल असणाºया संघटनांमधील असंख्य अज्ञात माणसे यातले कोणीही अशा खुनात सत्तेचे हस्तक म्हणून भाग घेऊ शकतात. अशी माणसे संघटनांचे व सत्तेचे आश्वासन मिळाले आणि त्यांना हवे ते दिले गेले की मालेगावात बॉम्बस्फोट घडवतात आणि पंजाबातील रेल्वेगाड्यात हिंसाचार उभा करतात. गायीखातर शंभरावर माणसे ठार मारतात आणि सरकार सोडा पण न्यायालयेही त्यांना हात लावत नाहीत. पोलीस त्यांना भिऊन असतात. ते राजकीय व्यासपीठांवर वावरतात आणि त्यांना देशभक्तीचे सर्टिफिकेट दिले जाऊन त्यांचे यथाकाळ सन्मानपूर्वक पुनर्वसनही केले जाते. त्यामुळे गौरी लंकेश गेल्या तरी त्यांचे मारेकरी सरकारला सापडणार नाहीत. सरकार त्याविषयी दु:खही व्यक्त करणार नाही. सरकारचा पक्ष ती घटना कोरड्या डोळ्याने पाहील आणि न पाहिल्यासारखे करील. तशाही सरकारच्या अनेक टीकाकारांच्या अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या हत्या आता दफ्तरजमा आहेत. त्यांचा पोलिसांसह तपास यंत्रणांनाही विसर पडला आहे. सरकार त्याविषयी बोलत नाही आणि विरोधकांच्या बोलण्याकडे ते फारसे लक्षही देत नाही. सबब, गौरीच्या हत्येमुळे सरकारवर टीका करणाºयांच्या हत्या थांबतील यावर कोणी विश्वास ठेवण्याचे कारण नाही. त्या यापुढेही चालू राहतील. वृत्तपत्रे काही काळ त्यांच्या बातम्या छापतील आणि त्याची सवय झालेले लोक पुढे ‘अरे, आता हे असे चालणारच’ असे म्हणून गप्प होतील. म्हणून आपणच गौरीला श्रद्धांजली वाहू या.

टॅग्स :Gauri Lankesh Murderगौरी लंकेश हत्या प्रकरणGauri Lankeshगौरी लंकेश