शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
IND vs PAK Asia Cup 2025 : भारत-पाक 'महायुद्ध'! कुठं अन् कसा पाहता येईल जेतेपदासाठीचा ऐतिहासिक सामना?
3
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
4
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
5
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
6
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
7
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
8
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
9
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
10
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
11
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
12
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
13
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
14
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
15
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
16
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
17
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
18
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
19
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
20
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?

चि. गणेशासाठी महादेव शंकर टिळकांशी भांडतो तेव्हा...   

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2018 12:59 IST

आजच्या गणेशोत्सवाच्या स्वरूपावर मार्मिक भाष्य करणारी रचना...

>> ज्योतिर्मय टोमणे

कैलासावर परवा म्हणे भगवान शंकर लोकमान्यांशी भांडला,देव्हाऱ्यातला देव टिळक तुम्ही रस्त्यावर का हो आणला? 

पृथ्वीवर जायला गणेश खूप खूश असायचा,दहा दिवस पाहुणचार घेऊन हसत हसत परतायचा...

पार्वतीलाही नव्हती चिंता, उलट थोडा आरामच होता,मुलाचं कोडकौतुक पाहून, आईला आनंदच होत होता...

महानैवेद्य, महाआरत्यांचा भक्त घालायचे घाट,गणरायाचा आमच्या वेगळाच होता थाट...

टाळ-मृदंगांचा ताल होता, नव्हता बेन्जोचा दणदणाट,साधीच असायची आरास, नव्हता दिखाऊ झगमगाट...

उकडीचे २१ मोदक त्यावर साजूक तुपाची धार,सखेसोयरे जमल्यावर नसायचा आनंदाला पारावार...

आता तर गणेशोत्सव आला की धडकीच भरते,बाळाच्या काळजीने माता पार्वतीही गलबलते...

गणेशाचा पाय कैलासावरून निघत नाही,बाबुराव, शांताबाईच्या भीतीने म्हणतो, नाही जात गं आई!

पण बिच्चारा पडला देव, न जाऊन चालेल कसं?,त्याला निरोप देताना आम्हाला होतं कसंनुसं...

चौदा विद्यांच्या अधिपतीला करून टाकलंय गल्लीचा राजा,दिवसरात्र सुरू असतो शूर्पकर्णांपाशीच बँडबाजा...

तो जाणतो ६४ कला, पण तुम्ही करता नुसता कल्लानृत्य करा, गाणी गा, पण बरा नाही हा हल्ला...

गणेशभक्तांची वाढतेय संख्या, लांबच लांब लागताहेत रांगा,ह्यांना एवढंच विचारायला हवं, का भुलता रे वरलिया रंगा?

गणपती आहे लाडाचा, भक्तांची श्रद्धाही आहे खरी,पण त्यासाठी जायलाच हवं का हो 'राजा'च्या दारी?

देव भक्तीचा भुकेला, देव बुद्धीची देवता,उंचीवरून का मोजता त्याच्या शक्तीची क्षमता?

महादेवाचं म्हणणं ऐकून टिळक महाराज खजिल झाले,'करायला गेलो एक' म्हणत खिन्नपणे खाली बसले...

स्वराज्यासाठी केला होता, देवा सारा अट्टहास,आजचा उत्सव पाहून खरंच होतो मलाही त्रास...

ह्यांना विचारावंसं वाटतं डोकं ठिकाणावर आहे काय?,एक प्रश्न सतत पडतो, सुराज्याबाबत माझंच चुकलं की काय?

लोक जमतात लाखांनी, पण कुठे होतेय जनजागृती,उलट गर्दी पाहून वाटत राहते अपघात-घातपाताची भीती...

इतक्यात बाप्पा आला बाहेर, टिळकांना पाहून आनंदला,मंगलमूर्तीच्या दर्शनाने लोकमान्यांचाही चेहरा फुलला...

ओळखून टिळकांच्या मनीचे भाव देवाने दिला धीर,तुमचं काहीच चुकलेलं नाही नका होऊ अधीर...

तुमचा हेतू उदात्त होता, मनात नाही जराही राग,उलट, तुमच्यामुळेच घेऊ शकलो स्वातंत्र्यलढ्यात सहभाग...

आजच्या गणेशोत्सवाच्या रूपाला नाही तुम्ही जबाबदार,काळजी नसावी... बंद होईल हा भक्तीचा बाजार...

गर्दी, उंची, दिखाऊगिरीवर लिहिलं जातंय बरंच काही,हळूहळू संपुष्टात येईल उत्सवातली राजेशाही...

चला आता जाऊन येतो पाहताहेत सारे वाट,आता दहा दिवस एकच स्टेटस, झालंय झिंग झिंग झिंगाट!

(रेखाचित्रः अमोल ठाकूर)

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवGanesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८Lokmanya Tilakलोकमान्य टिळक