शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

गणराया, तुझ्या उत्साहाला जबाबदारीचे कोंदण मिळेल का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2022 16:07 IST

मातीच्या छोट्या गणेशमूर्तीची पूजा, घरगुती विसर्जन, दिवाळीत फटाके न उडविणे.. हा सुखद बदल आहे. अशा बदलांना सरकारने अधिक वेग दिला पाहिजे.

गणेशोत्सव, दहीहंडी निर्बंधमुक्त करण्याची घोषणा एकनाथ शिंदे सरकारने केल्यामुळे यंदा सगळेच सण दणक्यात साजरे होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यातही गणेशोत्सवाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. कारण गणेशोत्सवाला अलीकडच्या काळात लाभलेली राजकीय परिमाणे! सार्वजनिक लोकमताला बांध घालून आपल्या राजकीय हितसंबंधांना बाधा आणणे राज्यकर्त्यांना परवडत नाही. आजच्या आधुनिक ‘इव्हेंन्टी उत्सवा’बाबत कोणी काही आक्षेप नोंदवला की रूढी, परंपरा, धार्मिक अस्मितांचे मुद्दे अकारण  प्रतिष्ठेचे करून तोंडे बंद केली जातात. त्यामुळे परंपरांमधील वैविध्य हे आपल्या देशाचे वैशिष्ट्य असले तरी तेच आता दुखणे बनले असल्याचे अलीकडच्या अनेक धार्मिक उत्सवांतून दिसून येत आहे. हे सारे बघितले की प्रश्न पडतो की, आपण परंपरा, संस्कृती, धार्मिक अस्मितांचे वारसदार आहोत की भारवाहक? न्यायालयाने उत्सवा दरम्यानच्या आवाजाबाबत काही मार्गदर्शक तत्त्वांची संहिता जारी केली असली, तरी न्यायालयाच्या आदेशाची वासलात लावण्याचे काम कथित उत्सवप्रेमी सतत करत असतात. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गेल्या काही वर्षांत समाजप्रबोधनाची व सांस्कृतिक संवर्धनाची  रूळलेली वाट सोडून इव्हेंन्टीकरणाची वाट धरलेली दिसते. काही सन्मान्य अपवाद वगळता सार्वजनिक उत्सवांना मनुष्य शक्तीच्या सार्वजनिक अपव्ययाचे व निरूद्देश शक्तिप्रदर्शनाचे रूप प्राप्त झाले आहे.  

लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली तेव्हाच टिळकांच्या या कृतीवर आगरकरांनी ‘गणपतीला रस्त्यांवर आणू नका’, अशा कडक शब्दांत टीका केली होती. ही भीती आता सर्वच सण, उत्सवांबाबत खरी ठरू लागली आहे. गेल्या काही वर्षांत गणरायाच्या प्राणप्रतिष्ठेपासून विसर्जनापर्यंत, वीकेंडपासून पिकनिकपर्यंत, घरगुती कार्यक्रमांपासून ते सार्वजनिक उपक्रमांपर्यंत आणि वाढदिवसापासून ते अंत्ययात्रांपर्यंत उन्मादाची कमान चढत चालली आहे आणि विवेकाचा आवाज क्षीण होत चालला आहे. उन्माद हे व्यक्तीचे नव्हे तर समाजाचे लक्षण बनू लागले आहे. उत्सव म्हणजे बेमुर्वत उन्माद दाखविण्याची संधी वाटू लागली आहे.  या सर्वधर्मीय उन्मादी सण-उत्सवांना लगाम घालण्याचे काम मागील दोन वर्षात निसर्गानेच हाती घेतले होते. कोरोनाच्या महामारीमुळे रस्त्यावरच्या उत्सवाचे आणि उत्साहाचे प्रदर्शन  अपरिहार्यपणे रोखावे लागले. त्याही आधीपासून पर्यावरणासाठी काम करणाऱ्या जाणत्या नागरिकांनी लोकप्रिय उत्सवांमध्ये शिरलेल्या अनिष्ट वृत्ती आणि प्रथांबाबत लोकजागराचे काम सुरू केले; त्याला चांगले यश येताना दिसते आहे. मातीच्या छोट्या मूर्तीची पूजा, घरगुती विसर्जन, दिवाळीत फटाके उडवणार नाही, अशा शपथा घेऊन त्या पाळणारी मुले हे एका सुखद बदलाचे चित्र आहे. समाजात स्वयंस्फूर्तीने होत असलेल्या अशा  बदलांना अधिक वेग देण्याची जबाबदारी सरकारने घेतली पाहिजे. अशा बदलांच्या मागे सरकारनेही आपले पाठबळ उभे केले पाहिजे. लोकानुनयाच्या मागे जाणे सरकारने निदान काही बाबतीत तरी टाळायला हवे. उत्सव - मग ते कोणत्याही धर्माचे असोत, उत्साहानेच साजरे व्हावेत याबाबत दुमत असण्याचे कारण नाही. फक्त त्या उत्साहाच्या लाटेत विवेक हरवणार नाही, याची काळजी आपण सर्वांनीच घ्यायला हवी! आनंद आणि उत्साहाला जबाबदारीचे कोंदण देण्याची ‘सुवर्णसंधी’ आपणास प्राप्त झाली आहे, ती दवडता कामा नये. 

- बाळकृष्ण शिंदे, पुणे

टॅग्स :Ganesh Festival Ritualsगणेशोत्सव विधीGanpati Festivalगणेशोत्सव