शहरं
Join us  
Trending Stories
1
इसकी टोपी उसके सर और उसकी...; कोकाटे आणि दत्तात्रय भरणे यांच्यातील मंत्रि‍पदाची आदलाबदली!
2
प्रांजल खेवलकरच्या लॅपटॉपमध्ये अनेक महिलांचे पार्टी अन् त्यानंतरचे आक्षेपार्ह व्हिडिओ!
3
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!
4
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
5
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
6
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
7
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
8
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
9
सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी उत्तम संधी, लवकरच ओआयसीएलमध्ये मोठी भरती!
10
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
11
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
12
सात वर्षांत ४२ वेळा तिने दिला नकार, अखेर ४३व्यावेळी त्यानं केलं असं काही, नकारच देऊ शकली नाही ती
13
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
14
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
15
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
16
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
17
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
18
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
19
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
20
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्

जी20 : जागतिक प्रवासात प्रत्येकाला सोबत घेऊ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2023 07:57 IST

जी 20 चे अध्यक्षपद स्वीकारताना प्रत्येक आवाज ऐकला जातानाच जागतिक अवकाश विस्तारण्याची प्रतिज्ञा भारताने केली होती, ती पूर्ण झाली आहे!

नरेंद्र मोदी

‘वसुधैव कुटुंबकम्’-  हे जग म्हणजे एक कुटुंब आहे हा एक सर्वसमावेशक विचार  सीमा, भाषा आणि विचारसरणी यांच्या पलीकडे जाऊन एक सार्वत्रिक कुटुंब म्हणून प्रगती करण्यासाठी आपल्याला प्रेरित करतो. भारताच्या जी 20 अध्यक्षपदाच्या काळात याचे रूपांतर मानवकेंद्री विकासाच्या आवाहनात झाले आहे.  एक पृथ्वी म्हणून आपण सर्व आपल्या ग्रहाचे संवर्धन करण्यासाठी एकत्र येत आहोत. एक कुटुंब म्हणून आपण परस्परांना विकासासाठी पाठबळ देत आहोत आणि आपण सर्व एका सामाईक भवितव्याच्या दिशेने एकत्र वाटचाल करत आहोत.

महामारीपश्चात जगामध्ये तीन महत्त्वाचे बदल झाले आहेत : मानवकेंद्रित दृष्टिकोनाकडे वळण्याची गरज असल्याची भावना वाढीला लागणे, हा पहिला बदल. जागतिक पुरवठा साखळीच्या चिवटपणाचे आणि विश्वासार्हतेचे महत्त्व जगाला पटू लागणे, हा दुसरा बदल.. आणि जागतिक संस्थांमध्ये सुधारणांच्या माध्यमातून बहुपक्षवादाला चालना देण्याचा सामूहिक सूर व्यक्त होणे हा तिसरा महत्त्वाचा बदल!डिसेंबर 2022 मध्ये भारताने इंडोनेशियाकडून अध्यक्षपदाची धुरा स्वीकारली, तेव्हा मी लिहिले होते की, मानसिकतेमधील बदलाला जी 20 ने चालना देण्याची गरज आहे. ग्लोबल साउथ आणि आफ्रिकेतील विकसनशील देशांच्या आकांक्षांना मुख्य प्रवाहात आणण्यासंदर्भात याची विशेषत्वाने गरज होती. 125 देशांचा सहभाग असलेल्या ग्लोबल साउथ शिखर परिषदेमधून घुमलेला आवाज, हा भारताच्या जी 20 अध्यक्षतेखालील उपक्रमांमधील एक महत्त्वाचा उपक्रम होता.  

भारताच्या अध्यक्षपदाच्या कालावधीत जी 20 मध्ये आफ्रिकी देशांकडून आतापर्यंतचा सर्वाधिक सहभाग नोंदवला गेला, एवढेच नव्हे तर आफ्रिकी संघातील देशांचा जी 20 चे स्थायी सदस्य म्हणून समावेश करण्याची मागणीदेखील अधिक ठामपणे मांडण्यात आली. आपले जग एकमेकांशी जोडले गेलेले आहे, त्यामुळे विविध क्षेत्रांतील आपली आव्हानेदेखील एकमेकांशी जोडलेली असणे  अपरिहार्य आहे. वर्ष २०३० साठीच्या कार्यक्रमपत्रिकेतील उद्दिष्टांचा अर्धा प्रवास पूर्ण करण्याच्या या वर्षात शाश्वत विकास उद्दिष्टांच्या (एसडीजी)प्रगतीचा मार्ग काहीसा भरकटला असल्याची चिंता व्यक्त होते. ही उद्दिष्टे साध्य करण्याच्या प्रगतीला अधिक वेग देण्यासाठीची  दिशा दिल्ली शिखर परिषदेमध्ये नक्की होईल. ग्लोबल साउथमधील अनेक देश सध्या विकासाच्या विविध टप्प्यांवर आहेत आणि म्हणूनच हवामानबदलविषयक कृती त्यांना राबविण्यासाठी अनुकूल असली पाहिजे.

हवामान बदलविषयक कृतीच्या आकांक्षा आपल्या हवामानबदलविषयक वित्तपुरवठा आणि तंत्रज्ञानाचे हस्तांतरण यांच्या कृतीशी जुळल्या पाहिजेत. हवामान बदलाचा सामना करण्यासाठी केवळ निर्बंधांच्या चर्चेबरोबरच काय केले पाहिजे त्यावर लक्ष केंद्रित करून अधिक रचनात्मक दिशा स्वीकारण्याची गरज आहे. शाश्वत, तसेच लवचिक सागरी अर्थव्यवस्थेसाठी चेन्नईमध्ये आपले महासागर अधिक निरोगी राखण्यावर लक्ष केंद्रित केले गेले आहे. भारताच्या अध्यक्षपदाच्या काळात हरित हायड्रोजन नवोन्मेष केंद्रासह, स्वच्छ आणि हरित हायड्रोजनसाठीची जागतिक परिसंस्था  देशात  उदयाला येईल. वर्ष २०१५मध्ये भारताने आंतरराष्ट्रीय सौर आघाडी स्थापन केली. आता, जागतिक जैवइंधन आघाडीच्या माध्यमातून आपण चक्राकार अर्थव्यवस्थेच्या फायद्याशी सुसंगत ऊर्जा स्थित्यंतर शक्य होण्यासाठी जगाला मदत करत आहोत.

हवामान बदलविषयक कृतीचे लोकशाहीकरण करणे हा चळवळीला गती देण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. ज्याप्रमाणे नागरिक आपल्या  दीर्घकालीन आरोग्याचा विचार करून  दैनंदिन निर्णय घेतात, त्याचप्रमाणे  ग्रहाच्या दीर्घकालीन आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचा विचार करून ते  जीवनशैलीचे निर्णय घेऊ शकतात. निरामयतेसाठी योगाभ्यास ही  एक जागतिक लोकचळवळ झाली  आहे, त्याचप्रमाणे शाश्वत पर्यावरणासाठी भारतीय जीवनशैलीने जगाला प्रेरित केले आहे. हवामान बदलाच्या परिणामांच्या पार्श्वभूमीवर, अन्न आणि पोषण  सुरक्षा सुनिश्चित करणे महत्त्वपूर्ण ठरते. मिलेट्स अर्थात भरडधान्ये  यासाठी साहाय्यकारी ठरू शकतात. आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षात भारताने भरडधान्यांना  जागतिक स्तरावर ओळख मिळवून दिली. अन्नसुरक्षा आणि पोषणविषयक आव्हानांवर कृती सांगणारी  ‘डेक्कन हाय लेव्हल प्रिन्सिपल्स ऑन फूड सिक्युरिटी अँड न्यूट्रिशन’ ही  तत्त्वेदेखील या दिशेने उपयुक्त आहेत.

तंत्रज्ञान परिवर्तनकारी आहे; पण ते सर्वसमावेशक बनवायला हवे. भूतकाळात, तांत्रिक प्रगतीचे फायदे समाजातील सर्व घटकांना समान रीतीने लाभले नाहीत.   तंत्रज्ञानाचा वापर  विषमता रुंदावण्याऐवजी त्या कमी करण्यासाठी कसा उपयोग केला जाऊ शकतो, हे भारताने गेल्या काही वर्षांमध्ये  दाखवून दिले आहे. उदाहरणार्थ, जगभरातील अब्जावधी लोक जे बँक सेवेपासून वंचित  राहतात किंवा ज्यांना डिजिटल ओळख नसते, अशा लोकांचे  वित्तीय समायोजन डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधेद्वारे (DPI)  करणे शक्य आहे. भारताने  डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या माध्यमातून  तयार केलेल्या  उपायांची दखल  जागतिक स्तरावर घेतली गेली आहे. आता, जी 20 च्या माध्यमातून आम्ही विकसनशील देशांना सर्वसमावेशक विकासाची शक्ती जागृत  करण्यासाठी   डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांसाठी अनुकूलनशीलता निर्माण करण्यात आणि उंचावण्यात  साहाय्य   करू. 

भारत ही सर्वांत वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था आहे, हा योगायोग नाही. भारताने शोधलेल्या साध्या; पण मोठा आवाका असलेल्या आणि शाश्वत उपायांनी समाजातील असुरक्षित आणि उपेक्षित घटकाला आपली विकासाची गाथा पुढे नेण्यासाठी सक्षम केले आहे. अवकाश क्षेत्रापासून ते क्रीडा क्षेत्रापर्यंत, अर्थव्यवस्थेपासून ते उद्योजकतेपर्यंत, भारतीय महिलांनी विविध क्षेत्रांमध्ये मोठी प्रगती केली आहे.  महिलांचा विकास, ही संकल्पना भारतात ‘महिलांच्या नेतृत्वाखालील विकासा’त परिवर्तित झाली आहे. भारताच्या जी 20 अध्यक्षपदाअंतर्गत  लिंगआधारित डिजिटल तफावत दूर करण्याचा, स्त्री-पुरुषांच्या श्रम-सहभागामधील तफावत कमी करण्याचा आणि महिलांचा नेतृर्व आणि निर्णय प्रक्रियेमधील सहभाग वाढवण्याचा प्रयत्न भारतात केला जात आहे.

भारतासाठी, जी 20 अध्यक्षपद हा केवळ उच्चस्तरीय राजनैतिक कार्यक्रम नाही. लोकशाहीची जननी आणि विविधतेचे मॉडेल म्हणून आम्ही या अनुभवाची कवाडे जगासाठी खुली केली आहेत. आज, मोठ्या प्रमाणावर उद्दिष्ट पूर्ण करणे हा एक गुण समजला जातो आणि तो भारताशी जोडला गेला आहे. जी 20 चे अध्यक्षपद यासाठी अपवाद नाही. ही एक लोक नेतृत्वाखालील चळवळ बनली आहे. भारताच्या विशाल भूभागावर, ६० शहरांमध्ये विविध कार्यगटांच्या २०० पेक्षा जास्त बैठका आयोजित करण्यात आल्या.  १२५ पेक्षा जास्त देशांच्या जवळजवळ १००,००० प्रतिनिधींनी या बैठकींना हजेरी लावली. आतापर्यंत कोणत्याही देशाच्या जी 20 अध्यक्षपदाअंतर्गत एवढा विशाल आणि वैविध्यपूर्ण भूभाग व्यापला गेला नाही.      

भारताची लोकसंख्या, लोकशाही, विविधता आणि विकास याविषयी दुसऱ्याकडून ऐकणे ही एक सामान्य बाब आहे. मात्र, त्यांचा प्रत्यक्ष अनुभव घेणे हे पूर्णपणे वेगळे आहे. मला खात्री आहे की जी 20 परिषदेत सहभागी व्हायला आलेले प्रतिनिधी याला नक्की दुजोरा देतील. भारताचे जी 20 अध्यक्षपद एकमेकांना जोडण्याचा, अडथळे दूर करण्याचा आणि जगाचे पोषण करणाऱ्या सहकार्याची बीजे रोवण्याचा प्रयत्न करते! इथे एकता विसंवादावर विजय मिळवते आणि सामुदायिक सहभागाची भावना एकाकीपण दूर करते. जी 20 चे अध्यक्षपद स्वीकारताना प्रत्येक आवाज ऐकला जाईल आणि प्रत्येक देशाचे योगदान राहील, याची खात्री करून भारताने जागतिक अवकाश विस्तारण्याची प्रतिज्ञा केली होती. भारताने आपल्या प्रतिज्ञेला कृती आणि परिणामांची जोड दिली, याबद्दल मी समाधानी आणि अर्थातच आशावादी आहे.

टॅग्स :G20 Summitजी-२० शिखर परिषदNarendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारत