शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
2
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
3
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
4
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
5
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
6
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
7
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
8
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
9
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
10
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
11
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
12
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
13
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
14
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
15
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
16
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
17
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
18
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
19
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
20
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा

मित्रों... ‘मेरे पास पैसा है’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 12:08 AM

बंगळुरूत एवढ्या मोठ्या संख्येत देशातील बहुतांश बड्या नेत्यांचा मेळा बघून दिल्ली दरबाराला मोठा हादरा बसला.

- दिलीप तिखिले

बंगळुरूत एवढ्या मोठ्या संख्येत देशातील बहुतांश बड्या नेत्यांचा मेळा बघून दिल्ली दरबाराला मोठा हादरा बसला. ५६ इंची छाती तर दडपलीच. बरं हे सगळे नेते केवळ ३७ आमदारांच्या भरोश्यावर मुख्यमंत्रिपदाची लॉटरी लागलेले कुमारस्वामी यांच्या शपथग्रहण सोहळ्यासाठी नक्कीच आले नव्हते. अशा सोहळ्याचे औपचारिक आमंत्रण तसे सर्वांनाच जाते. भाजपालाही ते गेले होतेच. अशावेळी आमंत्रित मंडळींचाही ‘जमले तर बघू, जाऊ ’ असाच सूर असतो. पण यावेळी सर्वजण कसे जमवून आले आणि विशेष म्हणजे एका सुरात वागले, याचाच धक्का भाजपा हायकमांडला जास्त बसला. त्यातल्या त्यात महाराष्टÑ नरेश देवेंद्रबाबू खूष होते. मातोश्रीवर निमंत्रण जाऊनही उद्धवजी बंगळुरूला गेले नाहीत. मात्र गेल्या चार वर्षात एकापाठोपाठ २१ राज्यांत सत्तेत येणाऱ्या नमोंना कर्नाटकातील हा धक्का असहनीय होता.नेमके चुकलंय काय? आपल्याच माणसांनी घात तर केला नाही ना...?नमोंनी मग थेट अमितभार्इंनाच मेमो दिला.(कारण कर्नाटकात तोडफोडीचे संपूर्ण कंत्राट अमितभार्इंनाच देण्यात आले होते.)अमितभार्इंच्या वतीने त्यांच्या पीएचे खुलासावजा पत्र आले.पत्रात म्हटले होते...!अमितभाई अजून शॉकमध्येच आहेत. ‘पीयूषजी...गडबड...’ असे काहीतरी अधूनमधून बडबडतात.काय गडबड आहे हे जाणून घेण्यासाठी मग पीयूषजींना मेमो गेला.पीयूषजी नमोंपुढे हजर...नमो : क्या पीयूषजी... कहा गडबड हुयी!पीयूषजी : कुठे गडबड झाली माहीत नाही... मी तर पूर्ण सेटिंग केली होती. गौडाजींना भेटून त्यांच्या दोन्ही पोरांना जॉब आॅफर केला. एकाला कर्नाटकात उपमुख्यमंत्रिपद आणि दुसºयाला केंद्रात मंत्रिपद.नमो : उपमुख्यमंत्रिपद का...? डायरेक्ट मुख्यमंत्री करण्याचेच गाजर दाखवायचे होते ना!पीयूषजी : सर...पण आपले १०४ असताना......मी ‘गाजर’ म्हणालो...त्यांना पुढं बोलू न देता नमो म्हणाले, ‘गाजर’ का मतलब समजते हो!...नही समझोगे... जाने दो..! बरं आणखी काय केले?पीयूषजी : आणखी काही नाही...(मग काहीतरी आठवून) आणि हो! आम्ही काँगे्रसच्या काही आमदारांच्याही संपर्कात होतो. त्यांनाही लक्ष्मीदर्शनाचे आमिष दिले.नमो : बस्स...! येथेच चुकलंुपीयूषजी : (आश्चर्याने) म्हणजे...?नमो : अरे... तुम्ही एकाच वेळी दोन्ही डफलीवर हात ठेवला. ही कला सर्वांनाच साधते असे नाही. सवडीने या! मी तुम्हाला शिकवीन.ओके, म्हणून पीयूषजी जायला निघाले तोच नमो धीर देत म्हणाले...,डरने की कोई बात नाही. उनके पास नेता लोग है, तो हमारे पास पैसा है. और इलेक्शन जितने के लिये नेतालोग नही पैसा जरुरी होता है. जा..१९ च्या निवडणुकीवर लक्ष केंद्रित करा.नमोंच्या या भाषणाने पीयूषजी कितपत आश्वस्त झाले माहीत नाही पण ‘हमारे पास पैसा है!’च्या त्यांच्या दर्पोक्तीत नक्कीच दम होता.काँग्रेसने नेत्यांची जत्रा तर भरविली पण निवडणुकीसाठी पैसा कुठून आणणार? सगळी सोंगं आणता येतात पण पैशाचे नाही. १४ च्या निवडणुकीत वाताहत काय झाली. लक्ष्मीनेही पाठ फिरविली. परवाच जाहीर झालेल्या एका आकडेवारीनुसार २०१७ च्या अखेरीस भाजपाकडे तब्बल १०३४ कोटी रुपये होते तर काँगे्रसकडे अवघे २२५ कोटी.बिच्चारी...! गरीब काँग्रेस

टॅग्स :Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८Amit Shahअमित शाह