शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
5
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
6
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
7
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
8
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
9
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
10
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
11
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
12
ऑनलाइन गेमिंग विधेयकावरुन अनुपम मित्तल यांची सरकारवर टीका; म्हणाले 'या निर्णयामुळे थेट...'
13
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
14
श्रावण शनि अमावास्या: शनिदोष, प्रतिकूल प्रभाव कसा ओळखावा? ‘हे’ ५ उपाय तारतील, कृपा होईल!
15
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
16
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
17
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
18
युद्ध थांबण्याचे नाव नाही! रशियाचा युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला; एकाच वेळी डागली ४० क्षेपणास्त्र
19
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
20
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!

मित्रांनो, नव्या वर्षात हातावर हात ठेवून बसू नका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 01:56 IST

प्रत्येकाने आपापला मार्ग शोधून आपापली रोजीरोटी कमावली पाहिजे.

- सद‌्गुरु

कुणीतरी आपल्यासाठी काहीतरी करील, ही मानसिकता नष्ट झाली पाहिजे.  प्रत्येकाने आपापला मार्ग शोधून आपापली रोजीरोटी कमावली पाहिजे.

आपल्यापैकी बऱ्याच जणांसाठी गेले वर्ष खूप आव्हानात्मक होते हे खरे; पण अशा संकटकाळी तरुणांची मोठी लोकसंख्या असलेला भारत प्रचंड संधीच्या उंबरठ्यावर उभा आहे. तारुण्य म्हणजे अजून पुरते न घडलेले व्यक्तिमत्त्व. ते लवचीक असतात, प्रौढ माणसांसारखे हटवादी असत नाहीत. ते नव्या शक्यता निर्माण करू शकतात. जगात काही रचनात्मक घडवायचे असेल तर ते तरुणच करू शकतात.

उलट्या बाजूने पाहिले, तर विनाशही त्यांच्याच हाताने घडतो. सळसळती ऊर्जा असलेले तरुण स्वभावाने फार उत्कट, तापट असतात, म्हणून जे घडेल त्याला पटकन प्रतिक्रिया देऊन बसतात. त्यांच्यामध्ये जशी सकारात्मकता भरता येऊ शकते, तशी नकारात्मकताही तितक्याच पटकन शिरते ती  म्हणूनच! त्यांचे मन स्थिर  असेल तर तरुण सकारात्मक आणि सर्जनशील मार्गाने त्यांची ऊर्जा वापरू शकतात.

या देशात सगळ्यात कळीचा प्रश्न कुठला असेल तर आपल्या तरुणांमध्ये असलेली प्रेरणेची कमतरता! प्रेरणा नसलेला माणूस आपल्या मर्यादा ओलांडून जाऊ शकत नाही; मग ती  मर्यादा शारीरिक असो, सामाजिक असो की मानसिक ! उलट स्वप्नांची पेरणी झालेला माणूस आपल्या मर्यादांचा विसर पडून अशक्य तेही सहज शक्य करू शकतो; पण मग तरुणांना प्रेरणा मिळावी कशी? आणि कुठून? पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना स्वत:पलीकडच्या वास्तवाचे भान असले पाहिजे, सभोवतालाशी त्यांचे नाते जोडले गेले पाहिजे.  एखाद्या व्यक्तीची ‘जगण्या’बद्दलची कल्पना फक्त स्वतःपुरतीच मर्यादित असते तर दुसऱ्या व्यक्तीसाठी ‘जगणे’ म्हणजे फक्त स्वतः आणि त्याचे कुटुंब एवढ्यापुरतेच मर्यादित असते.

तरुणांनी आपल्या जगण्याच्या कल्पनेमध्ये त्यांच्या आसपासचा मोठा समाज आणि  अवघ्या जगाचा समावेश करणे महत्त्वाचे आहे. दुर्दैवाने याचा आधुनिक शिक्षणात समावेश नाही. आधुनिक शिक्षण आपल्या मुलांमध्ये फक्त स्वविकासाची कल्पना रुजवते. फक्त स्वत:चा विचार करायला शिकवते.  आपल्या सुखसोयीसाठी आणि समृद्धीसाठी पृथ्वीवरच्या प्रत्येक गोष्टीचा उपभोग कसा घेता येईल हे शिकवणे, हाच आजच्या शिक्षणाचा उद्देश होऊन बसला आहे. एक विचित्र शोषक वृत्ती खोलवर भिनवली जात आहे. हे कसे बदलणार? सर्वांना सामावून घेणारे, सर्वांचा सकल विचार करणारे अधिक सर्वसमावेशक जग घडवायचे, तर त्यासाठी सर्वांचा विचार करणारी, फक्त ‘मी’च्या पलीकडे पाहू शकतील, अशी मने घडवणे आवश्यक आहे. त्यासाठी आपल्या मदतीला येतील दोन गोष्टी : योगशास्त्र आणि अध्यात्म विचार!

कोणत्याही विचारधारेवर विश्वास ठेवणारा माणूस असो, तो कोणत्याही जाती, धर्म किंवा पंथातील असो, या देशातील अनेक समस्यांचे निराकरण कसे होऊ शकते हे प्रत्येकाने पाहण्याची वेळ आली आहे. तुमच्यासमोर जे प्रश्न आहेत, त्यांची उत्तरे तुमचा धर्म किंवा संस्कृती देऊ शकते का, याचा शोध घ्या!  तुमचा धर्म  स्वत:चा शोध घेण्यासाठीचं एक वैयक्तिक साधन असू शकतो. 

स्वातंत्र्यप्राप्तीच्या सात दशकानंतरही एक अब्जाहून अधिक लोकांच्या हृदय आणि मनात भव्य भारताची स्वप्ने अजूनही प्रज्वलित आहेत. जर एक अब्ज लोक या राष्ट्रासाठी उभे राहिले तर जे मानवतेच्या इतिहासात कधीही झाले नाही, असे काही आपण सहज घडवू शकतो. म्हणजेच आपण एका मोठ्या लोकसंख्येला शिडीच्या आणखी वरवरच्या पायरीवर जायला मदत करू शकतो. यापूर्वी कधीही एका पिढीमध्ये वीस वर्षांच्या कालावधीत काही कोटी लोकांना जगण्याच्या एका स्तरातून दुसऱ्या स्तरावर उंचावले गेले, असे झालेले नाही. ही दुर्मीळ संधी या पिढीसमोर आहे.

आपण एक विकसनशील राष्ट्र आहोत. अद्याप पुष्कळ गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. म्हणून तरुणांनी, विशेषत: येत्या दोन वर्षांत हातावर हात ठेवून  रोजगाराची वाट पाहत बसू नये. कुणीतरी आपल्यासाठी काहीतरी करील, ही मानसिकता नष्ट झाली पाहिजे. प्रत्येकाने आपापला मार्ग, आपापला तोडगा  शोधून आपापली रोजीरोटी कमावली पाहिजे. हे तुमच्यासाठी तर आहेच आहे, पण देशासाठीही फार महत्त्वाचे आहे.

टॅग्स :New Yearनववर्षMaharashtraमहाराष्ट्रEmployeeकर्मचारी