शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

फसलेल्या बंडाची नव्याने तुतारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2019 14:30 IST

अनिल गोटे : उमेदवारी लोकसभेची नजर मात्र विधानसभेवर

मिलिंद कुलकर्णीजळगाव : कधीकाळी जनसंघात काम केलेल्या आमदार अनिल गोटे यांचा साडेचार वर्षांपूर्वीचा भाजपाप्रवेश धक्कादायक होता, मात्र त्यांचे बंड अनपेक्षित नव्हते. पक्षीय, संघटनात्मक चौकट न मानवणाऱ्या गोटे यांची वाटचाल महापालिका निवडणुकीच्या तोंडावर बंडाकडे झाली आणि हे बंड फसले तरी आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी नव्याने तुतारी हाती घेतली आहे.अभ्यासू, कार्यक्षम परंतु तेवढेच आक्रमक, आक्रस्ताळे आणि शिवराळ भाषेचा मुक्तपणे वापर करणारे असे अनिल गोटे यांचे व्यक्तिमत्व धुळेकरांसह राज्याला परिचित आहे. जनसंघाचे नेते उत्तमराव पाटील यांच्यासोबत त्यांच्या वर्तमानपत्रात काम करीत असतानाच राजकीय धडे त्यांनी गिरविले. पुढे शेतकरी संघटनेत शरद जोशी यांच्यासोबत सक्रीय झाले. समाजवादी पक्ष (महाराष्टÑ), लोकसंग्राम संघटना या स्वत:च्या पक्ष, संघटनेच्या माध्यमातून बेरोजगार, शेतकऱ्यांसाठी आंदोलने उभारली. अब्दुल हमीद यांचे स्मारक, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, पांझरा नदीतिरावरील कल्पकतेने बनविलेली चौपाटी ही त्यांची भरीव कामे, वाहतुकीला अडथळा ठरणारी खाजगी आणि शासकीय अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यासाठी बेधडकपणे पाठपुरावा करण्याच्या स्वभावामुळे त्यांची नीडर लोकप्रतिनिधी अशी ओळख निर्माण झाली. पत्रकारीतेचा अनुभव असल्याने अभ्यासूपणे अनेक प्रश्न विधिमंडळ आणि बाहेरदेखील लावून धरल्याने प्रशासनात वचक निर्माण झाला. धुळेकरांनी त्यांच्या या व्यकिमत्व आणि कार्यशैलीला उचलून धरत दोनदा अपक्ष तर गेल्यावेळी भाजपाच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून दिले. त्यांच्या पत्नी हेमा गोटे यांना लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून निवडून देत पालिकेची सत्ता दिली होती.मूलत: बंडखोर स्वभाव असल्याने कोणत्याही पक्ष वा संघटनेत ते फारसे रमले नाहीत. पाताळगंगा प्रकल्पविरोधी आंदोलनात शरद जोशींशी बिनसल्यानंतर ते शेतकरी संघटनेतून बाहेर पडले.भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांच्याशी सख्य असले तरी भाजपामध्ये तेव्हाही गेले नाही. बनावट मुद्रांक घोटाळ्यात प्रमुख आरोपी अब्दुल करीम तेलगीसोबत संबंधांवरुन त्यांना ४ वर्षे कारागृहात काढावी लागली. या कारवाईनंतर शरद पवार व छगन भुजबळ यांचे ते कट्टर विरोधक झाले. भाजपा-शिवसेनेच्या जवळ गेले. २०१४ च्या निवडणुकीत भाजपा नेते एकनाथराव खडसे यांच्या आग्रहाने ते भाजपाच्या तिकिटावर धुळ्यातून उभे राहिले आणि निवडून आले.भाजपामध्ये खडसेंचा उतरतीचा काळ सुरु होताच, गोटेंचे महत्व कमी झाले. धुळ्यात केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे व पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांचा दबदबा वाढला. महापालिका निवडणुकीची सूत्रे आपल्याच हाती येतील असा समज करुन घेत गोटेंनी ८५ सभा घेतल्या. परंतु, भामरे व रावल यांनी ‘संकटमोचक’ गिरीश महाजन यांना बोलावून घेत धुळ्यात बाजी मारली. तत्पूर्वी गोटे यांनी बंडाचे निशाण हाती घेतले. आमदारकीचा राजीनामा देऊ केला आणि विधानसभेत अन्यायाचा पाढा वाचला. पण त्यांचे बंड फसले आणि धुळेकरांनी हेमा गोटे यांच्यारुपाने केवळ एक जागा त्यांच्या पारड्यात घातली.महापालिका निवडणुकीत भाजपाला पराभूत करण्यासाठी गोटे यांनी लोकसंग्रामचे उमेदवार रिंगणात उतरविले होते. मनसेकडून समर्थन मिळविले होते. राष्टÑवादीचे माजी आमदार आणि कट्टर प्रतिस्पर्धी राजवर्धन कदमबांडे यांच्याशी हातमिळवणी केली होती. परंतु, तरीही पराभव झाला.आता लोकसभा निवडणुकीत आघाडीअंतर्गत ही जागा कॉंग्रेसकडे आहे. माजी मंत्री रोहिदास पाटील यांचे पूत्र आमदार कुणाल पाटील हे उमेदवार आहेत. पाटीलद्वयींवर टीका करणे गोटे यांनी कायम टाळलेले असताना बंडखोरी त्यांच्या पथ्यावर पडणारी ठरेल, असा कयास व्यक्त होत असला तरी तूर्त त्यात फार तथ्य वाटत नाही.

टॅग्स :Jalgaonजळगाव