शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

फोर्थ इडियट राज...

By राजा माने | Updated: January 29, 2018 00:31 IST

स्वर्गलोकी विश्व व्यंगचित्रकार संघटनेचे सर्व सदस्य ‘थ्री इडियट’ हा सिनेमा एन्जॉय करत होते. एवढ्यात ‘स्वर्गलोक व्यंगचित्रकार व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप’वर नारदांचा मेसेज पडला. तो फक्त पिलईनीच पाहिला आणि ते चक्क ओरडलेच ‘अवर जिनिअस... फोर्थ इडियट....’ सर्वांचे लक्ष त्यांच्याकडे गेले.

स्वर्गलोकी विश्व व्यंगचित्रकार संघटनेचे सर्व सदस्य ‘थ्री इडियट’ हा सिनेमा एन्जॉय करत होते. एवढ्यात ‘स्वर्गलोक व्यंगचित्रकार व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप’वर नारदांचा मेसेज पडला. तो फक्त पिलईनीच पाहिला आणि ते चक्क ओरडलेच ‘अवर जिनिअस... फोर्थ इडियट....’ सर्वांचे लक्ष त्यांच्याकडे गेले. त्यांचे पाहून सर्वांनीच आपल्या मोबाईलवर मेसेज पाहिला आणि सर्वजण एकमेकांकडे पाहू लागले. कळीच्या नारदांनी केलेली काडी यशस्वी झाली होती. ‘परत सांगतो, सोडून जाईन’ हे राज ठाकरे यांचे व्यंगचित्र नारदांनी ग्रुपवर टाकले होते. आपला जिनिअस आपलं क्षेत्र सोडून राजकारण क्षेत्रात गेलाच कसा? हाती कुंचला घेण्याऐवजी फाळकुटे घेऊन फेरीवाल्यांच्या मागे लाग, टोलवाल्यांची टाळकी फोड, रेल्वेची इंजिनं घासत बस... खळ्ळ्खट्टाक करीत नकलाही करतोय! बुद्धी आणि करिअर वाटपात इंद्रदेवांकडून घोटाळा झालाच कसा? असा सूर सर्वांमध्ये उमटला. सिनेमा बंद करून याच विषयाचा सोक्षमोक्ष लावण्याचा निर्णय झाला. आमचा जिनिअस आम्हाला द्या, ही मागणी इंद्रदेवांकडे करण्याचे एकमताने ठरले. इंद्रदेवांच्या नावे तसे निवेदन तयार करण्यात आले. संघटनेचे संस्थापक लिओनार्दो, बेनीनीपासून ते थेट शंकर पिलई, आर. के. लक्ष्मण, मंगेश तेंडुलकरांपर्यंतच्या अनेक व्यंगचित्रकारांच्या सह्या निवेदनावर घेण्यात आल्या. व्यंगचित्रकार बाळासाहेबांनी मात्र सही मागायला गेलेल्या पदाधिकाºयांना सही न देताच माघारी धाडले. ही वार्ता समजताच नारदांनी मराठी भूमीवरील इंद्रलोकाचा स्टार रिपोर्टर येमकेला मोबाईल केला. नारदांचा आनंदी मूड लक्षात आल्याने आता आपल्यावर काहीतरी बालंट येणार या चिंतेतच येमके नारदांचे बोलणे ऐकत होता. इंद्रदेवांनी संघटनेचे निवेदन पाहून अपेक्षेप्रमाणे त्यांनी ब्रह्मदेवाशी संपर्क साधला. ‘सार्वजनिक पृथ्वीलोक बुद्धी व करिअर वितरण खाते’ त्यांच्याकडे असल्याने हा तिढा सोडवण्याची जबाबदारी त्यांचीच होती. हा विषय दरबारातच मांडण्याची गळ ब्रह्मदेवांनी घातली. इंद्रदेवांनी मराठी भूमीतील कोणालाच दरबारात पाचारण केले नाही. येमकेला मात्र नारदांसोबत हजर राहण्याचे फर्मान काढले. ब्रह्मदेवांच्या मागणीनुसार दरबार भरला.इंद्रदेव : ब्रह्मदेवा, स्वर्गलोकातील व्यंगचित्रकार संघटनेच्या मागणीचे काय करायचे?ब्रह्मदेव : देवा, बुद्धी व करिअर वितरण करताना राज ठाकरे या वत्सास ‘जिनिअस पोलिटिकल व्यंगचित्रकार’ याच हेडखाली मी वितरण केले होते. प्रत्यक्षात आॅर्डर निघताना जिनिअस, पोलिटिकल आणि व्यंगचित्रकार या सर्वच शब्दांमध्ये ‘स्वल्पविराम’ टाकण्याची चूक चित्रगुप्तांकडून घडली...इंद्रदेव : मग आता चूक दुरुस्त कशी करायची? राज आपण ‘जिनिअस पोलिटिकल व्यंगचित्रकार’ असल्याचे विसरून इंजिनाचे डब्बेच घासण्यात वेळ दवडत आहेत...ब्रह्मदेव : देवा, चित्रगुप्तांकडून अशा चुका यापूर्वीही घडलेल्या आहेत. पण त्यातून फळे मात्र चांगली निष्पन्न झाली होती. अनेक कलाक्षेत्राच्या बाबतीत तसे घडले. एम. जी. रामचंद्रन, जयललितापासून बाळासाहेब ठाकरेपर्यंतची उदाहरणे आहेत देवा!इंद्रदेव : मग आता ‘फोर्थ इडियट’ राजला सिनेमे पाहणे अन् खळ्ळ्खट्टाक एवढाच वेळ कुंचल्यासाठी द्यायला सांगा. 

टॅग्स :Cartoonistव्यंगचित्रकारMaharashtraमहाराष्ट्र