शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

वाघेलाजी, ते रंगा आणि बिल्ला नेमके कोण?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2019 3:43 AM

रंगा आणि बिल्ला या दोन गुन्हेगारांची नावे वापरून शंकरसिंह वाघेला यांनी गोधरा, त्यानंतरच्या दंगली, पुलवामातील हल्ला, बालाकोटमधील हल्ल्याबाबत गंभीर आरोप केले आहेत.

रंगा आणि बिल्ला या दोन गुन्हेगारांची नावे वापरून शंकरसिंह वाघेला यांनी गोधरा, त्यानंतरच्या दंगली, पुलवामातील हल्ला, बालाकोटमधील हल्ल्याबाबत गंभीर आरोप केले आहेत. त्याचा तपशील त्यांच्याकडून मिळवायला हवा.शंकरसिंह वाघेला हे देशातील एक जबाबदार नेते आहेत. काँग्रेस, भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही पक्षांचे लढाऊ व अनुभवी नेते आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री या नात्याने ते देशाला सुपरिचित आहेत. अशा ज्येष्ठ नेत्याने गुजरातमधील गोधरा या ६९ हिंदूंच्या जळीत कांडाला ‘रंगा आणि बिल्ला’ हे जबाबदार आहेत. पुढे त्या दंगलींची प्रतिक्रिया संघटित करून दोन हजारांवर मुस्लिमांची हत्या घडवायलाही तेच कारणीभूत आहेत, असे एका राष्ट्रीय हिंदी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

तेवढ्यावरच न थांबता पुलवामामधील भारतीय जवानांच्या पथकावर झालेल्या हल्ल्याला व त्यात शहीद झालेल्या ४० जवानांच्या मृत्यूलाही तेच कारणीभूत आहेत, असा खळबळजनक आरोपही त्यांनी केला आहे. १४ फेब्रुवारी २०१९ रोजी या जवानांच्या ताफ्यावर आरडीएक्सने भरलेल्या ज्या मालमोटारीने हल्ला चढविला तिचा रजिस्ट्रेशन नंबर गुजरातचा असल्याचे सांगून ही सारी हत्याकांडे निवडणुका जिंकण्यासाठी ‘रंगा व बिल्ला’ यांनीच घडविली आहेत, असे त्यांचे म्हणणे आहे. तेवढ्यावर ते थांबले नाहीत तर पाकिस्तानच्या बालाकोटमधील हल्ल्यात २०० लोक ठार केल्याचा जो दावा सरकार करते तो साफ खोटा असून त्याचा पाठपुरावा आपल्या हवाई दलाला किंवा जगातील एकाही वृत्त वाहिनीला अद्याप करता आला नाही, असे ते म्हणतात. शिवाय बालाकोटवर हल्ला चढवायचाच होता तर त्याआधी पुलवामा घडविण्याचे कारण कोणते होते? हा सारा हिंदू विरुद्ध मुसलमान यांच्यात तणाव उभा करून निवडणूक जिंकण्याचा हव्यास आहे.
गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांची राजवट लोकप्रिय असतानाच्या काळात या ‘रंगा व बिल्ला’ यांना कुणी विचारत नव्हते. पटेलांना बदनाम करणे व निवडणुकीसाठी धार्मिक तणाव उभा करणे यासाठी या दोघांनी हे केले, असा दावा करून त्यांच्या पुढच्या कारवाया याच हेतूने व मुकाटपणे केल्या, असेही ते आपल्या मताच्या पुष्ट्यर्थ म्हणतात. हा सारा तपशील दिल्यानंतरही वाघेला या ‘रंगा व बिल्ला’ची नावे उघड करीत नाहीत. या नावाचे दोन्हीही खुनी इसम पुण्याचे आहेत आणि त्यांना मृत्युदंड झाला आहे. तशीही पुण्यातील या खुनी माणसांची नावे हा देश व जग कधी विसरणारही नाही. वाघेला यांनी त्याचमुळे ही नावे वापरली असणार हे उघड आहे.वाघेलांसारखा माणूस जेव्हा रंगा व बिल्ला यांची नावे पुढे करून असे आरोप करतो, तेव्हा त्यांना नक्कीच या हत्याकांडाची खरी माहिती ठाऊक असणार, त्याबाबतचे तपशील ठाऊक असणार. ती माहिती जगाला समजावी व ते ज्यांचा उल्लेख ‘रंगा व बिल्ला’ असा करतात ते दहशतखोर कोण, हे देशालाही कळणे आवश्यक आहे. त्यांचा आडून उल्लेख करण्यापेक्षा त्यांची नावे, तपशील वाघेला यांनी थेटपणे उघड करायला हवा. एका राज्याचा माजी मुख्यमंत्री असलेला नेता जेव्हा जाहीरपणे असे आरोप करतो तेव्हा त्याला त्याच्या गंभीर परिणामांचीही माहिती असणार. या वक्तव्यासाठी त्यांच्यावर खटला दाखल होऊ शकतो व देशाची न्यायालये त्यांना ‘हे तुमचे रंगा व बिल्ला कोण?’ हे विचारू शकतात.
वाघेला तेथे ही माहिती शपथेवर सांगतीलही. तशी त्यांनी ती सांगितली पाहिजे. अन्यथा ते उगाच देशात गोंधळ माजवीत आहेत म्हणून त्यांच्यावर कारवाई होऊन त्यांना कठोर शिक्षाही झाली पाहिजे. तशीही रंगा आणि बिल्ला ही बदनामी करणारी नावे आहेत. वाघेला यांनी ज्यांना ती लावली आहेत, ती माणसे सामान्य नसणार, ती राजकारणातील उच्च पदावरच असणार. अशी माणसे देशाचे राजकारण चालवीत असतील तर ते देशासाठीही हानिकारक आहे. सबब वाघेला यांनी पुढे होऊन ही माहिती जाहीर केली पाहिजे किंवा गुजरातच्या पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ती वदवून घेतली पाहिजे. आपल्या पुढाऱ्यांना हवेतल्या गप्पा करायला आवडतात व त्या जनतेला खºयाही वाटतात. जनतेचा गैरसमज वा कोणत्याही नेत्याची बदनामी करणे हा तसाही अपराध आहे. सबब वाघेलांवर खटला दाखल करणे हे देशहिताचे व जनतेच्या समाधानाचे ठरणार आहे.

टॅग्स :GujaratगुजरातIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्ला